अवती भवती तरंगे तुझ्याच श्वासाचा दरवळ
अंतरी फुलते आहे तुझ्याच प्रीतीची हिरवळ.
रस्त्यावर पाऊल खुणा कि होई आभास तुझा
वाऱ्यावर गंध फुलांचा कि दरवळे श्वास तुझा
जिकडे तिकडे दाटली तुझ्याच पदराची सळसळ.
संध्याकाळ ही उधळीत रंग तुझ्या आठवांचे
रात्र दाटता का आठवे मज पळ चांदण्यांचे?
उठता बसता सारखा तुझाच भास मला हरपल.
छेडूनी दुखास माझ्या आता हे सूर लाविले तू
ते माझेच शब्द होते येथे जे गीत गायिले तू
कशास करशी मना तिचीच तू आता कळकळ.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2423
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान कविता!
छान कविता!
धन्यवाद.
In reply to छान कविता! by श्रीगुरुजी
आपले मनःपूर्वक धन्यवाद.
धन्यवाद.
In reply to छान कविता! by श्रीगुरुजी
आपले मनःपूर्वक धन्यवाद.
छान कविता.
लिहिते राहा.
धन्यवाद.
In reply to छान कविता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपले मनःपूर्वक धन्यवाद.
छान कविता
छान कविता
धन्यवाद.
In reply to छान कविता by सागरसाथी
आपले मनःपूर्वक धन्यवाद.