मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेमकाव्य

"तू " अधिक " मी " किती ?

खिलजि ·
किती सोपा प्रश्न होता माझा "तू " अधिक " मी " किती ? तू उत्तर दिलेस "दोन" अंतर्मुख होऊनि शोधू लागलो आपण आहोत तरी कोण ? मला अपेक्षीत “एक " होते आपल्यात मुळी अंतरच नव्हते दोन देण्यामागे कारण काय होते? जर तू माझ्यात होतीस मग मी तुझ्यात का नव्हतो ? आणि मी तुझ्यात नव्हतो तर मी कुठे होतो ? गणित सोपे जरी वाटले दुरून अवघड झाले उत्तरावरून का दिलेस तू विचित्र उत्तर ? कुढत गेलो पुढे निरंतर जवळ घेतला मद्याचा प्याला शोधत गेलो मला स्वतःला {{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

तुझी कविता

शिव कन्या ·
तुझ्यापाशी जन्मलेली माझी हट्टी, खोडकर, अल्लड कविता तू डोळ्यांत सांभाळून घेऊन ये.... येता येता वाट चुकली तर मला जागं कर...पण मी माझ्याच तंद्रीत असेन तर माझ्या कवितेला वाट विचार.... ती आधी मस्करी करेल, तुला चकवा घालेल, घनघोर गप्पा मारेल, निळावंती होऊन, वाटेवरले झाडमाड प्राणीपक्षी दाखवेल, लपूछपू म्हणत पाठीत गुद्दे घालेल, मिठीत शिरता शिरता एकदम वारा होऊन तुझ्या गळ्यात पडेल, शेवटी थकून तुझ्या दुमडलेल्या हातावर निर्धास्त झोपी जाईल, तेव्हा तू तिला परत डोळ्यांत साठव.... अशी थकून झोपलेली, झोपेतही तुझ्याच डोळ्यांत राहणारी माझी कविता सांभाळून घेऊन ये.... मी असेनच कवितेच्या आसपास. -शिवकन्या

नाना करा व्हाटस ॲप गृप

पाषाणभेद ·
काव्यरस
तुमच्या माझ्या दिलाचा करा व्हाटस ॲप गृप मुक्यामुक्याने करु आपन दोघे चॅटींग || नाना हिचं लवकर ऐका अन गृपचं घ्या मनावर पोर पार सुटली, था-यावर नाही हिचं मन ||को|| गुड मार्निंग करा सकाळी, उठल्यावरून माझी आटवन काढा, विडीओ कॉल करुन नका लावू...अहो नका लावू साधा कॉल, खर्च करा डेटा, टाका सारा रिचार्ज संपवून || मी झाली मेंबर त्याचं अन तुमी आडमिन दोघचं गृपमधी राहू नको तिसरं कोन शेल्फी बघा तुमी अन तुमीच बघा स्टेट्स प्रायव्हेट मेसेज टाका मीच ते वाचन || - पाभे

कारण तू

सिक्रेटसुपरस्टार ·
लेखनविषय:
हल्ली मी कुठेच जात नाही. कारण काय विचारतेस? कारण तूच. सवय लागलीये मनाला, नको तिथे तुझे संदर्भ शोधायची.. तुझ्या पाऊलखुणा, पुन्हा पुन्हा शोधायची. एक दिवस उबग आला तुझा, तुझ्या आठवणींचा, मग ठरवलं आता जायचंच नाही कुठे.. काय म्हणालीस? तसंही मला कुठे हौस होती फिरायची? नव्हतीच ती, आजही नाही मंदिरात जायची तर कधीच नव्हती हौस पण तरी यायचो तुझ्याबरोबर.. गर्दीनं रेटून रेटून देवापुढे आणल्यावर ते एक दोन क्षण काय तृप्त भाव असायचे तुझ्या चेहऱ्यावर ते टिपायला म्हणून यायचो.. तिथून बाहेर पडल्यावर 'छान झालं नाही दर्शन' असं घंटेसारख्या किणकिणत्या आवाजात म्हणायचीस ना?

हि सर पावसाची पुन्हा आज आली.

AjayRGodse ·
काव्यरस
हि सर पावसाची पुन्हा आज आली हि सर पावसाची पुन्हा आज आली पुन्हा आसवांची मोकळी वाट झाली मन व्याकुळ होते, पुन्हा चिंब न्हाते, क्षितिजावरी का तुला ते पहाते ? पुन्हा पावसाशी तुझी बात झाली. हि सर पावसाची, हि ओढ तुला भेटण्याची. हि सर पावसाची पुन्हा आज आली तुझ्या आठवाणी पुन्हा जाग आली मन बेभान होते, तुझे गीत गाते. का मिलनाची तुला साद देते ? तुला भेटण्याची का मना आस झाली ? हि सर पावसाची, हि ओढ फक्त मिलनाची. हि सर पावसाची पुन्हा आज आली. तुझ्या अंतरीचे गुज सांगून गेली. मन बेधुंद होते, विरहात झुरते. स्वप्नी तुझ्या का हळुवार बुडते? निसटून गेली पुन्हा रात्र ओली.

मन यॉडलं यॉडलं! (यॉडलिंगवर गझल)

कुमार जावडेकर ·
काव्यरस
वेड इतकं जडलं, मन यॉडलं यॉडलं! पार पार बिघडलं, मन यॉडलं यॉडलं! स्वप्न मनात फुललं, मन स्वप्नात झुललं स्वप्नरंजनी दडलं, मन यॉडलं यॉडलं! माझं दुरून पाहणं, तुझं चोरून लाजणं कसं कळेना घडलं, मन यॉडलं यॉडलं! तुझं दिवसा टाळणं, माझं रात्रीचं झुरणं... अंगवळणी पडलं, मन यॉडलं यॉडलं! वाटे हवासा होकार; पण नकार स्वीकार! नाही खेटर अडलं, मन यॉडलं यॉडलं! - कुमार जावडेकर

निघताना....

शिव कन्या ·
मी हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनाशी होईन तेव्हा तू चौकट ओलांड, आणि निघताना..... आपल्या हसल्याबोलल्या आवाजांची फूले घेऊन ये आपल्यातल्या गहिवरांचे कढ, न हिंदकळता आण मी न ओलांडलेली अंतरे तू सहजच पार करुन ये माझे न उच्चारलेले नाव चारचौघांत सरळच घे सगळे उठून जातील तेव्हा आपल्यातल्या शब्दांची आरास मांड त्यानंतर आपोआप दिवा लागेल तुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल मग मी मुक्त होऊन रेषा होईन तुझ्या तळहातांवर खोल रुतेन.. तू हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनासा होऊन माझ्याजवळ पोहचेपर्यंत... Shivkanya

भाळी लाल कुंकु

अविनाशकुलकर्णी ·
लेखनविषय:
भाळी लाल कुंकु गळ्यात काळे मणी अस्तित्व तुझे जाणवे साजणे क्षणोक्षणी * अंगणी रोज शेणसडा रेखते नाजुक रांगोळी जोडव्याचा तो पदान्यास भासे तू नाजुक कळी * सकाळची तुझी लगबग चुलीस करी चूल पोतेरे कंकणाचा नाद भिनला अन्नपुर्णा भासे मजला *. तुळशी समोर तेवावी ज्योत दिव्याची मंद अस्तित्व तसं तुझं उजळते माझे जीवन अकुकाका

गर्भार सातव्या महिन्याची

चांदणे संदीप ·
जिच्यासाठी झटून दिनरात दिली परीक्षा प्रीतीची आज भेटली ती, होऊन गर्भार सातव्या महिन्याची! मावळला ध्यास, गळाली आस गळ्यापाशी कोंडला श्वास म्हणतील मामा, तिची लेकुरे भीती मला त्या नात्याची! क्षण पदोपदी झुरण्याचे नकळत मागे फिरण्याचे आता आठवती ते खर्च आणि उसनवार मित्रांची! आता काय, शोधू दुसरी तीही नसेल तर तिसरी करणार काय, मुळातच आहे, बागेत गर्दी फुलांची! - संदीप चांदणे

मंदसा पाऊस झाला

अविनाशकुलकर्णी ·
लेखनविषय:
. झोंबू लागे सुखद गारवा, मंदसा पाऊस झाला जाऊ या लोणावळ्याला, सखीस इशारा केला . मारली दांडी ऑफिसला, अन तिने हि कॉलेजला ठरे भेटायचे ,सकाळीच, जिमखान्याच्या स्टॉपला . लो वेस्ट जिन वर, स्लीव्हलेस टॉप शोभत होता तिच्या मधाळ स्मिताने ,मुड रोम्यान्टीक होता . नेली फटफटी पंपावर, म्हटले कर टाकी फुल्ल सुटे गाडी भन्नाट,बुंगाट .असे वातावरण कूल . चाले रस्ता ,धावे रस्ता, झाडे मागे पडू लागली टेकले उरोज पाठीला, मिठी तारुण्याची घातली. . लय भारी, क्षण भारी, रक्त तारुण्याचे सळसळे. पुणेमुंबई रस्ता आहे , थांबव हे खट्याळ