मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेमकाव्य

अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर

पाषाणभेद ·
अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर अहो डॉक्टर काढा की माझे वेंटीलेटर मला काही झाले नाही बघा मी लिहीन सुद्धा लव लेटर (कोरस: हिला द्या हो डिसचार्ज लेटर) न मी आजारी न मी बेचैन डोकेदुखी नाही मला न तापाची कणकण पण मग का देता मला तुम्ही इंजेक्शन? काढा की माझे वेंटीलेटर थोडे औषध मी घेते थोडे तुम्हीपण घ्या ना माझ्या हृदयाची धडधड कान देवून ऐकाना सलाईन ऑक्सीजन दुर करा अन घ्या माझे टेंपरेचर काढा की माझे वेंटीलेटर इसीजी नका करू तुम्ही पल्सही नका पाहू कोणी लॅब टेस्ट नका सांगू, बंद करा तो समोरचा मॉनिटर काढा की माझे वेंटीलेटर पलंगावर स्पेशल रूमच्या, मी आहे झोपलेले काळजी घेण्या

कव्वाली: तुला पाहिले की

पाषाणभेद ·
कव्वाली: तुला पाहिले की किती तुझी आठवण यावी किती मी तुझ्यासाठी झुरावे काही बंधन नाही त्याला तुझ्यासाठी मी मरावे दुर जरी असशील तू माझ्या मनाला तू ओढून नेते पण तुला पाहिले की काळजात धकधक होते किती तू वार केले माझ्या हृदयावर खोल जखमा वरून केल्या त्यावर नाही कधी जरी रक्ताचा थेंब त्यातून वाहीला तुझ्या नजरेचा बाण तेथे गुंतून राहिला त्या कत्तलीने मी कसा मेलो ते माझे मला ठावूक पाहिले एकवार तू अन मी जळून गेलो खाक नको आता तरी तू वेळ लावू पुन्हा सामोरी ये ग ये तुला पाहिले की काळजात धकधक होते सागरामध्ये असते पाणी, पाण्याचीच वाहते नदी मी तुझाच आहे अन तुझ्याविना राहिलो का कधी? तुझा चेहेरा समोर जेव्हा जे

ती सर ओघळता..

आनंदमयी ·
ती सर ओघळता सोबतीस मी झरतो तो मेघ झुरावा तैसा मीही झुरतो आपुलेच काही तुटुन ओघळून जावे खेदात तशा मी कणा कणाने विरतो... ती सर ओघळता विझती स्वप्नदिवेही अन दिवसासंगे विझून जातो मीही अन लख्ख काजळी गगनी दाटून येता मी आशेचे कण शोधित भिरभिर फिरतो ती ओघळता मी सुना एकटा पक्षी पंखांच्या जागी असाह्यतेची नक्षी शेवटास मीही काव्यपंख लेवून आठवांभोवती तिच्या नित्य भिरभिरतो ती सर ओघळता उरे न काही बाकी सहवास सरे अन अंती मी एकाकी ती सरीसारखी चंचल आर्त प्रवाही तिज धरू पाहता मीच दिवाणा ठरतो ©अदिती जोशी

उरलो आता भिंतीवरल्या ...  

चित्रगुप्त ·
तुका म्हणाला  उरलो आता  उपकारापुरता ...  मी म्हणालो उरलो आता  भिंतीवरल्या फोटोपुरता. नुरली शक्ती विरली काया  शिथिली गात्रे  आटली माया ... उरलो आता  भिंतीवरल्या फोटोपुरता.

प्रेम एक अनुभुति..सायुज्जते कडे जाण्याचा प्रवास...

अविनाशकुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रेम एक अनुभुति..सायुज्जते कडे जाण्याचा प्रवास... * प्रेम भावना हि सा~यांनाच हवि हविशी वाटणारी आहे.."पहिलिच भेट झाली,पण ओढ हि युगाची"अशी हि भावना असते..क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा" हे गडक~यांचे म्हणणे किति सार्थ आहे. आपण कुणावर तरी प्रेम करावे..अन कूणी तरी आपणावर जिव तोडुन प्रेम करावे हि मानवाचि उपजत अन निसर्ग दत्त अशी भावना आहे..असते.. * प्रेमाचि सुरवात आपल्या विचारां पासुन होते..प्रेमाच्या विचाराचे तरंग मनात आले कि प्रेमाचा विचार सुरु होतो...मनात घोळणा~या प्रेमाच्या विचाराने प्रेमाची अनुभुति, व प्रेमानुभव निर्माण होतात. * तुम्हि कुठल्याच व्यक्तिवर तो पर्यंत प्रेम करु शकत

जुळे नवरे, जुळ्या नवर्‍या

पाषाणभेद ·
एका पुरूषांच्या जुळ्यांच्या जोडीचे स्त्री जुळ्यांच्या जोडीशी जुळले (जोड्या स्त्री-पुरूषांच्या होत्या. आधीच खुलासा केला.

दो डोळ्यांचे....

शिव कन्या ·
दो डोळ्यांचे झरते पाणी इथून मजला स्पष्ट दिसे त्या पाण्याच्या आवेगावर ओठावरले गीत फिरे डोळ्यांमधल्या रेषा तांबूस पूरी सांगते व्यथा खरी सांगायाला शब्द कशाला झुळूक हळवी एक उरी गदगद्णारे हृदय राजसा तुझा पोचतो इथे हुंदका पाण्यालाही जागर असतो दिव्यात नसते केवळ ज्वाला सहवासाचे अत्तर नाही तरी मिठीचा भास कोवळा इथे तिथेही कुठेच नाही तरी बहराचा शुद्ध सोहळा -शिवकन्या

ओले केस

पाषाणभेद ·
केस ओले न्हालेते आले प्रेमाचे भरते (पावसात केस ओले प्रेमाचे भरते आले) ( आपआपल्या मगदुराप्रमाणे केस ओले करावेत!) शिडकावा ओल्या थेंबांचा चिंब भिजवून देण्याचा गोरी काया ओलेती तुझे लावण्य दाखवती गाली लाज आलेली शृंगाराविना सजलेली अशी सामोरी ललना मन हरखले ना ! साडी लपेटून उभी येते कवेत कधी? - पाषाणभेद २६/०९/२०१९

दुपार

शैलेन्द्र ·
काव्यरस
तिच्या पैंजनाची गाज, त्यात रेंगाळे दुपार, विसावल्या सतारीची जणू छेडियली तार, तिच्या कपाळी जी बट त्याला कुंकवाची तीट, लाल रेशमी लडीची, तिच्या गालाशी लगट तिच्या पाठीची पन्हाळ त्यात घामाचा पाझर, तिच्या नाजूक कटीला, शोभे नाजूकसा भार.. तिच्या बाहूंचा मांडव, लावी मदनाला वेड, तिची महकती काया तिचे ओझे अवघड.. सुस्त दुपारच्या वेळी, ती येते का सामोरी, मन हलते हलते, त्याला सांभाळावे कोणी? - शैलेंद्र.

संध्याकाळी तू गंगेतीरी

शिव कन्या ·
संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर लोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर सोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात घेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.... तुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे बघू देत लोकांना देवांना साधुंना माझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून तिच्या देहात लयदार मिसळताना.....