Skip to main content

प्रेमकाव्य

प्रिये मी मोर झालो तुझ्यासाठी

लेखक खिलजि यांनी बुधवार, 28/08/2019 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिये मी मोर झालो तुझ्यासाठी प्रिये , मी श्वान झालो तुझ्यासाठी भुंकत राही अवती भवती रागाची गंगा अन शिव्यांची लाखोली तुच वाहिली अन हाणली काठी तरी भुंकत राही अवती भवती प्रिये मी श्वान झालो तुझ्यासाठी मोर होवुनी काय जाहले होते नव्हते धुळीस मिळाले श्वान होवुनी काय जाहले होत ते पण मन पोळले वेडा म्हणुनी ख्याती जाहली शिव्यांची शिदोरी वाढत गेली {{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

स्वरराधा

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 23/08/2019 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
भैरव वा भटियार पहाट फुलवत येती, स्पर्श जणू कान्ह्याचे राधेला उठवुन जाती. ठाऊक तिला सारंग माध्यान्ही झुलवत येतो, "गंध" न त्यास स्वत:चा तरि वृंदावनी घमघमतो. यमन असा कान्ह्याचा यमुनेचे श्यामल पाणी. निनाद गोघंटांचा सांज करी कल्याणी. मालकंस वा जोग, अमृत बरसे गात्री. कान्ह्याच्या ओठी वेणू तिच्याचसाठी रात्री. कणकणात भिनली आहे मल्हाराची आस, मेघ पेटवून जातो मयूरपंखी प्यास. पण सूर भैरवीचा का राधेला माहीत नाही? युगे उलटली, अजुनी राधा तर वाटच पाही..
काव्यरस

मिळता नजरेस नजर

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 03/08/2019 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
मिळता नजरेस नजर मिळता नजरेस नजर श्वास थांबून गेला मनात मन मोराचा पिसारा फुलू लागला * कशी चुकवू नजर जीव गोंधळून गेला त्या हस~या छबीच ध्यास काळजाने घेतला * पुजले प्रेम दैवताला कौमार्य नैवेद्य वाहिला विश्वासू सखा होता तो जिव्हारी घाव देवुन गेला * उतरता धुंदी प्रेमाची जगाचा व्यवहार कळला तो पहिला घाव बरेच शिकवून गेला

तू मी अन पाऊस

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 03/08/2019 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस! पाऊस!! पाऊस! पाऊस!! झाला सारा भणाणलेला त्यासवे आला वारा वारा उडवीतो माझे मन मनामध्ये तू आहेस खरा चिंब मी भिजलेली माझ्यासवे तुझे भिजले तन हिरव्या रानात घेवूनी कवेत मीच हरवले माझे मन पाणी आले पानोपानी झाडे भिजली रानोरानी मिठीत तुझ्या मी आलंगूनी विसरले मी, गेले हरवूनी - बी ऑलवेज लाईक मी - ऑलवेज युवर्स पाभे ०३/०८/२०१९
काव्यरस

झरझर झरझर

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 23/07/2019 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
झरझर झरझर झरणाऱ्या कातरवेळी मुलीला घेऊन मुलाने खेळायला जाऊ नये... तिचे धावते पाय थबकतात, घरातच विलांटी घेऊन मैदानाकाठचे गवत डोळ्यांनी खुडत राहतात...

घनदाट गर्द रेशमी केशकुंतल

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 12/07/2019 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
घनदाट गर्द रेशमी केशकुंतल नेत्रास कोरले काजळ कि सोमल तनुत रातराणीची मादक दरवळ गात्रात मदनाची बेफाम सळसळ * नजर, कधि लाजरी, कधि नाचरी रतिरुप,नखशीकांत तु लावण्य परी वाकलेली लज्जेने तु अबोध रमणी रुप चमके,जशी नभी शुक्रचांदणी * वसने ,गर्भ रेशमी अंगी ल्याली तव उरास काचे ,भर्जरी काचोळी देहात रानवारा,उसळे उधाण लाटा गालास खळी,अशी तु लावण्यकळी * अबोल पौर्णीमा, अन धुंद चांदणी जवळ श्रुंगार वेडी,बेधुंद रागीणी नाचति वक्षावर, चकोर मंडले बेभान मुग्ध ति कुजबुज अन चोरटे अलिंगन , * रोम रोम नशेने फुलले,श्वासात श्वास भिनले.. एक मेकाच्या सहवासात,बहरुन यौवन आले तारुण्य अन यौवनाचा प्राशितो मी कण नी कण ओंजळीत दिले मी त

पूर्वी आपण जिथे भेटायचो , तिथे आता एक टपरी झालीय

लेखक खिलजि यांनी सोमवार, 08/07/2019 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी आपण जिथे भेटायचो तिथे आता एक टपरी झालीय एक तपानंतर पुन्हा कप घेतला हाति पण कटिंग इथली जर्रा बरी झालीय वळणे घेत घेत तू तिथून , तर मी कुठून कुठून यायचो कधी तू तर कधी मी , या इथेच झाडामागे तोन्ड लपवायचो मी घाबरून तुलाच म्हणायचो , हळहळू तुझि डेरिंग बरी झालीय त्या झाडामागे बराच इतिहास घडला तो काळ सुवर्णाक्षरात लिहावा असा पण नंतर तुटलो ते कायमचेच , जणू भेटलोच नव्हतो आज इथे आलो तेव्हा " साठी " माझी पुरी झालीय असेल तीही स्वतःच्या नातवंडांबरोबर खेळत मीही आहे व्यग्र माझ्या जीवनात तिच्या कपाळावर मळवट भरायची इच्छा होती ती मात्र कायम अधुरीच ऱ्हायलीय {{ सिद्धेश्वर विलास

पावसाविषयी असूया

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 07/07/2019 06:24 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाविषयी असूया पाहून माझे खुप हाल झाले पावसाने केले तुझे केस ओले गवतावर पडताच पाऊल शहारले अंग भान हरपले जगा विसरले भिजण्यात दंग पाऊस फिका पडला थेंब पडताच गाली तुझ्या केस झटकण्याने तुषार पडले खाली ओली करून साडी पाऊस मातलेला बरसतो पुन्हा झिम्माड तुझ्या अंगाला गिरकी घेतली, उड्या मारल्या, हात पसरले विषाद वाटला माझाच तु पावसाला कवेत घेतले पाषाणभेद ०७/०७/२०१९
काव्यरस

तुझे शहर

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 02/07/2019 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या नकळत तुझे शहर फिरून आलेय – डोळे न उघडता तुला पाहून आलेय रस्ते ओलांडताना तुझा हात धरला आहे – तुझा हात घामेजला आहे मंदिरातले कासव ओलांडले आहे – तुझ्या हातावर तीर्थ ठेवले आहे दर्ग्यातल्या जाळीतून डोकावले आहे – लोबानचा गंध दरवळत आहे मिठाईच्या दुकानात इमरती घेतली आहे – हात चिकट, तोंड गोड झाले आहे भर बाजारात चिक्कीच्या बांगड्या घेतल्या आहेत – तुझे डोळे चमकत आहेत रसवंतीत पांढऱ्या मिशीचा रस प्याले आहे – तुझा रुमाल पुढे, हसू मागे आहे त्या झाडाखाली क्षणभर थांबलो आहोत – तू सावली, मी नि:श्वास झालो आहोत लाचा घेताना मी गोंधळले आहे – तू म्हणतोस, रंग जाऊ दे, आठवणी राहू देत

कुरबुर झाली

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 23/06/2019 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
कुरबुर झाली (काल रात्री साडे तीन वाजता पाणी बचतीवर एक पथनाट्य लिहीले. एका व्हाट्सअ‍ॅप गृपमध्ये येथील सदस्य दुर्गविहारी अन दीपक११७७ यांनी झोप घेत चला अन काही कुरबुर झाली असेल असे विनोदाने लिहीले.