वेड इतकं जडलं, मन यॉडलं यॉडलं!
पार पार बिघडलं, मन यॉडलं यॉडलं!
स्वप्न मनात फुललं, मन स्वप्नात झुललं
स्वप्नरंजनी दडलं, मन यॉडलं यॉडलं!
माझं दुरून पाहणं, तुझं चोरून लाजणं
कसं कळेना घडलं, मन यॉडलं यॉडलं!
तुझं दिवसा टाळणं, माझं रात्रीचं झुरणं...
अंगवळणी पडलं, मन यॉडलं यॉडलं!
वाटे हवासा होकार; पण नकार स्वीकार!
नाही खेटर अडलं, मन यॉडलं यॉडलं!
- कुमार जावडेकर
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2498
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे ढिंच्यॅक सचिन ला
झुमरू
In reply to हे ढिंच्यॅक सचिन ला by प्रसाद गोडबोले
कविता वाचून यॉडल यॉडल झाले. ;
दिल