भाळी लाल कुंकु
लेखनविषय:
भाळी लाल कुंकु
गळ्यात काळे मणी
अस्तित्व तुझे जाणवे
साजणे क्षणोक्षणी
*
अंगणी रोज शेणसडा
रेखते नाजुक रांगोळी
जोडव्याचा तो पदान्यास
भासे तू नाजुक कळी
*
सकाळची तुझी लगबग
चुलीस करी चूल पोतेरे
कंकणाचा नाद भिनला
अन्नपुर्णा भासे मजला
*.
तुळशी समोर तेवावी
ज्योत दिव्याची मंद
अस्तित्व तसं तुझं
उजळते माझे जीवन
अकुकाका
वाचने
3183
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
छान आहे. :)
Sandy
उजळते माझे जीवन
अकुकाका
हे वाचलं आणि जरासा दचकलोच ! :)
छान आहे काव्य.अकुकाकांनी प्रथमच काही वाचण्यासारखे लिहीलं आहे. कविता आवडली.
पण
सकाळची तुझी लगबग
चुलीस करी चूल पोतेरे
कंकणाचा नाद भिनला
अन्नपुर्णा भासे मजला
यात इतर िकाणी आहे तसे यमक जुळलेले नाही त्यामुळे थोडी खटकलीIn reply to खूप छान कविता by श्वेता२४
शिवाय, कोनाड्यातल्या हिंदमातेपेक्षा बराच आहे.
;)
Sandy
सकाळची तुझी लगबग
चुलीस करी चूल पोतेरे
कंकणाचा नाद मजला
कशी अंगाई वाटे रे
*.
तुळशी समोर तेवावी
ज्योत दिव्याची मंद
अस्तित्व तसं तुझं
सहाणेला लाभे गंध
..
आता जुळलं का यमक?
येनीवे ह्याच्या पेर्णेने "आमचा लाल कंपू" पाडावे काय?
In reply to सकाळची तुझी लगबग by अभ्या..
आळीपाळीने कुंथु!
असं पण पाडता यील! ;)
खरं तर खेड्यात हे अस्तित्वात आहे का ते माहीत नाही
खुलासेच्छुक नाखु
कविता आवडली.
मस्त..