.. .अक्षय अविरत निर्मळ
लेखनविषय:
- Read more about .. .अक्षय अविरत निर्मळ
- 11 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
या भल्या पहाटे थोडे
मी तुझेच गाणे गावे
अन गात्रा मधले कोडे
अलगद सुटून जावे
ती वीण मखमली मनाची
अन श्वास समर्पित व्हावा
त्या जगनियंत्यासाठी
हा देहच निमित्त व्हावा
विरघळून जावे अलगद
मी पण माझे नुरावे
त्या अक्षय सुखामध्ये मी
अवचित भान हरावे
ते नकोच लौकिक जगणे
अन श्वासही संकोचावा
तू माझा अन मी तुझाच
हा भोगच अक्षय व्हावा
मी भरून पावलो अवघा
ही तुझीच मिठी अवखळ
मी विरून हलका होतो
अक्षय अविरत निर्मळ
- बंगलोर , १ ऑगस्ट २०१७, ०६.३६ वाजता