मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

आला पावसाळा आला पावसाळा

पाषाणभेद ·
(आदरणीय कवी कुसूमाग्रजांची क्षमा मागून) || आला पावसाळा आला पावसाळा || आला पावसाळा आला पावसाळा प्रवाशांनो तुमची कंबर सांभाळा मनपाचे रस्ते खड्डेरी दुचाकी तयामध्ये घातली चुकवित चालली पाणी गाळा समोरून पहा कोण येतसे त्याचीही अवस्था तशीच असे उडविल पाणी; त्याला तुम्ही टाळा चारचाकीवालाही सुरक्षित नसे खड्डयात आदळता शिव्या देत असे न जाणो मोठी खोक ये कपाळा जनांच्या स्मृती गौरवे वंदुनी पुढिल ऋतूची वाट पाहूनी आरोग्यासी वित्त आपले जाळा - पाषाणभेद

ही कविता फॉरवर्ड करा

vcdatrange ·
ही कविता फॉरवर्ड करा ही कविता फॉरवर्ड करा, नाही तर पाप येईल रात्री झोपल्यानंतर, तुमच्या घरात साप येईल पाच जणांना फॉरवर्ड करा, हरवलेली वस्तु सापडेल नाही केली तर, भुत तुमच्या कानाखाली झापडेल दहा जणांना फॉरवर्ड करा, सोन्याचा हार मिळेल नाही केली तर, पाठीवर मार बेसूमार मिळेल पंचवीस जणांना फॉरवर्ड करा, स्टॉक मार्केट चढेल, नाही केली तर कावळ्याचं शिट डोक्यावर पडेल पन्नास जणांना फॉरवर्ड करा, नोकरीत प्रमोशन होईल नाही केली तर, सकाळ संध्याकाळ लूज मोशन होईल शंभर जणांना फॉरवर्ड करा, लॉटरी मिळून जाईल नाही केली तर, बायको तिच्या मित्राबरोबर पळून जाईल

या वेड्याला न कसला लोभ , ना कुणाचा राग

सिद्धेश्वर विलास पाटणकर ·
लेखनविषय:
या वेड्याला न कसला लोभ , ना कुणाचा राग नको इस्टेट , नकोय कसला वाद हवाय तो फक्त आणि फक्त वाचकांचा आशीर्वाद भावनांच काय ते त्या तर येतचं असतात काही उमटतात पत्रावर तर काही पंचतत्त्वी विलीन होतात या मनातील लाव्हास जर मिळेल आपुल्या प्रेमाचे इंधन शब्दांचा वणवा मग भडकेल असा काही नसेल त्याला कुठलेच बंधन पर्वणीची त्या वाट पाही सरस्वती ती उभीच राही चारी दिशा बघत राही साद तरी येत नाही साद तुम्ही द्याल तर पेटून उठेन मी अन नाही दिलीत साद तर आतल्या आत मिटेन मी सिद्धेश्वर विलास पाटणकर C

तुझा निरोप घेताना

सिद्धेश्वर विलास पाटणकर ·
लेखनविषय:
तुझा निरोप घेताना मन दाटून आले का कुणास ठावूक पण माघारी फिरताना मनी धैर्य कोठून आले मन हिमाच्छादित गोठले होते विचारांनी वेढले होते हात हलत होते निव्वळ तुझ्या हातांना प्रतिक्रिया म्हणून डोळे स्तब्ध होते हातांचे खेळ बघून आठवणींचा भृंग पिंगाया लागला क्लेशांचा अरी जोर धराया लागला जवळच एका पारावर बसून समस्त आठवणीना एक करून वाज वळू लागलो अश्रुनी दिवा भरून माघारी चालू लागलो सिद्धेश्वर विलास पाटणकर C

ती पण आता पुसट वाटू लागलीय

सिद्धेश्वर विलास पाटणकर ·
लेखनविषय:
विचारांच्या गर्दीत शोधातोय मी कुणाला तिला कि मला स्वतःला ? विचारांच्या गर्दीत शोधातोय मी कुणाला तिला कि मला स्वतःला ? ती पण आता पुसट वाटू लागलीय अवती भवति तिच्या विचारांची गर्दी झालीय स्वतः शोधतोयं त्या मनाला ज्याने साद दिली होती पूर्वी तिच्या भावनांना आढे वेढे घेवून लग्नाचे पेढे वाटले कमी होते कि काय म्हणून राहत्या घराचे दरवाजे पण छाटले छाटून सर्व खिडक्या अन दारें एक सुंदर घरकुल थाटले टाकली भिंत मध्ये उभी पल्याड ते सर्व नातलग अल्याड माझे दोन छकुले जीवलग त्यांनाच घेउनि पुढे जायचे त्यांनाच बघुनी स्वतःशी लढायचे अन लढता लढता कायमचे जायचे सिद्धेश्वर विलास

II शहराकडून "बा" चा फून आला II

सिद्धेश्वर विलास पाटणकर ·
लेखनविषय:
शहराकडून "बा" चा फून आला केल्या केल्या विचारू लागला कोण टाकून गेला लेंडूक आपल्या शेतामंदी ? म्या म्हटलं माझ्याशिवाय हाय कोण इथं ? तुमास्नी ह्ये कोण बोललं तिथं ? "बा"ने घपकंन हासडून शिवी लावली गाडीस चावी निघाला परतीस गावाकडं म्या बी धावलो धपाधप लेंडूक शोधाया शेताकडं घेता वास चहूकडं नाक साफ चोंदून गेलं च्या मारी माझ्या अपरोक्ष कोण ह्ये शेत शिंपून गेलं ? घेतली कुदळ फावडी हाती कराया खाली वर माती फुलं पसरली चहुकडं जागोजागी लावली उदबत्ती सूर्य ढळाया लागला चंद्रमा दिसाया लागला कुदळ चालूच व्हती लेंडकांसाठी अचानक एक मनात इचार आला रोम रोमांच उभा झाला दुरुन

दिंडी

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
अभिजात सुमारांची बहुश्रुत दिंडी लॅपटॉपी कीबोर्डाचे चटचट अहिर्निश टाळ निष्क्रिय मत-मतांतरांचे डब्ब दुतोंडी मृदंग वैचारिक साठमारीचे गुगलपुष्ट निर्दय घोडरिंगण जितं मया च्या एकेकट्या भेसूर आरत्या तिथे सुदूर चंद्रभागेकाठी काळाभोर त्याच्या अट्टल दगडी मौनातल्या शयनी एकादशीत कल्पांतापर्यंत अकिम्बो

परीक्षा

माम्लेदारचा पन्खा ·
लेखनविषय:
परीक्षेला बसवलं आहेस तू अशा देवा किती पानं लिहितोय तरी वेळच संपत नाही इतकी अवघड परीक्षा काय ही कामाची हजारदा वाचला तरी तुझा प्रश्नच कळत नाही ! परीक्षेचं वेळापत्रक तरी आधी सांगायचं असतं कोणालाही असं थेट पेपरला बसवायचं नसतं अभ्यासक्रम वेगळा आणि हे प्रश्न भलतेच आहेत गोंधळ झाला तरीही वर मार्क मिळवायचे आहेत ? मागे एकदा दिला होता मी धैर्याचा एक पेपर त्याचं काय झालं पुढे ते कळलंच नाही नंतर आता चालू आहे सहनशक्तीची अफाट चाचणी करतोस तरी कशी तू असल्या प्रश्नांची जुळवणी ? एक पेपर झाला की मध्ये थोडा वेळ द्यायचा असतोय तुझ्या शाळेत मात्र मी सतत परीक्षेलाच कसा बसतोय पेपर संपव तुझे सगळे आता, सांग मी पास

झाली...पहाट झाली!

सत्यजित... ·
लेखनविषय:
रानात पाखरांची..चर्चा अफाट झाली उगवेन सूर्य आता ही रात्र दाट झाली! फांदीवरुन कानी येतात सूर काही मी ऐकतो भुपाळी जी चिवचिवाट झाली! गेला चुकून ताफा येथून राजशाही इतक्यात राजरस्ता ही पायवाट झाली!

मराठी माणसा झोपलाच राहा

अरूण गंगाधर कोर्डे ·
लेखनविषय:
काव्यरस
मराठी माणसा झोपलाच राहा पॅसे मिळविण्या मात्र तत्पर राहा घरिदारी अन बाजारीही जातीपातीचे राजकारण करी नको तेथे अध्यात्म लावुनी विसरुनी जा तू दिव्य लक्ष्मी हरलास जरी जीवनी तू अध्यात्माचे धडे गिरवी तू वास्तवाचे भान सोडुनी नवा मार्ग शोधू नको तू मिळणाऱ्याचा द्वेष करी तू बाणा आपुला सोडू नको तू बदलू अथवा पेटू नको तू आस प्रगतीची ठेवू नको तू जुने सारे संत पकडुनी कीर्तन भंडारे करी तू मंदिरांपुढे रांग लावुनी वेळ आपुला व्यर्थ दवडी तू वाद घाल तू जयंत्यांवरी शासकीय तिथी दिनांकांवरी इतिहासाच्या मंथनातले शोध कधीही सहन न करी महापुरुषांचे कार्य विसरुनी जीवन त्यांचे उघड करी चविष्ट चर्चा अन संघटना निर्माण करी