Skip to main content

कविता

(तो मला खूप आवडतो)

लेखक रुपी यांनी शनिवार, 12/08/2017 03:11 या दिवशी प्रकाशित केले.
तो मला आवडतो जेव्हा लाडिकपणे अंगाशी झोंबतो, तेव्हा तो मला खूप आवडतो. जेव्हा किरकोळ लागलं की बँड-एड लावायला सांगतो, तेव्हा तो मला खूप आवडतो. मी योगासने करताना पोटावर येऊन बसतो, तेव्हा तो मला खूप आवडतो. मी जरासं आवरून बाहेर जाताना "आई...

((तो मला आवडत नाही))

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 11/08/2017 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा- निओ यांची कविता "ती मला आवडते" जेव्हा तो त्याच्या पार्टीनंतर तर्राट होऊन माझ्या अंगाशी कसाही झोंबतो तेव्हा तो मला आवडत नाही जेव्हा किरकोळ वादातून तो मला हिंसकपणे Get out you bitch म्हणतो तेव्हा तो मला आवडत नाही माझ्या खरं बोलण्यावर, समजावल्यावर मलाच लाथाबुक्क्याचा प्रसाद मिळतो तेव्हा तो मला आवडत नाही मी एकटीच आवरून बाहेर जाताना तो एकटक संशयानं बघतो तेव्हा तो मला आवडत नाही जेव्हा माझ्या कुठल्याही कामाचा विचका होतो त्याला कशी जिरली हिची असाच आसुरी आनंद होतो तेव्हा तो मला आवडत नाही माझ्या मनस्थितीचं आणि विचाराचं त्याला काहीच सो

ती मला आवडते

लेखक निओ यांनी शुक्रवार, 11/08/2017 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
ती मला आवडते जेव्हा लाडिकपणे अंगाशी झोंबते तेव्हा ती मला खूप आवडते जेव्हा किरकोळ गोष्टीला खट्याळपणे Oh My God म्हणते तेव्हा ती मला खूप आवडते माझ्या टोमण्यांवर गुद्द्यांचा प्रसाद देते तेव्हा ती मला खूप आवडते मी टकाटक आवरून बाहेर जाताना हूं...

गंमत

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 10/08/2017 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
नवकवितेच्या वाटेवरचे वळण द्यायचे हाक, "गण-मात्रांचे कृत्रिम बंधन सत्वर तोडुनी टाक !" यतिभंगाचे भूत लेखणीस कायम भिववित होते त्या भीतीने तरल काहिसे हातून निसटत होते गोळा करूनी धैर्य, ठरविले, नको अता मळलेली वाट पुन्हा ती छंद-बद्ध कवितांची कोंदटलेली वृत्त-छंद-मात्रांचे अवजड ओझे लेवुनी बसली.. ..होती माझी कविता, विमुक्त होता निर्मळ हसली त्या हसण्याचा खळाळ ध्वनि मज सांगुनी गेला काही, "मुक्तक लिही, पण ध्यानी ठेव..यमकाविण "गंमत" नाही !"
काव्यरस

साडेपाच इंच !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 09/08/2017 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
माझं मन कायम ह्या साडेपाच इंची चौकटीत वावरणारं . . . . आजूबाजूला काय चाललंय हे पाहूनही न पाहिल्यासारखं करणारं . . . काही वेगळं दिसलंच तर डोळे असूनही ह्या स्मार्ट खेळण्यातूनच बघतो. . . मग समोर खाद्यजत्रा असो की प्रेतयात्रा . . तोच निर्विकारपणा असतो ! कधीकधी मरणही टिपतो मी दुसऱ्याचं कारण असं चित्र वारंवार कुठे दिसतं ? कासावीस होतो फक्त तेंव्हाच जेव्हा बॅटरी उतरते किंवा इंटरनेट नसतं ! जगात असूनही जगाशी परत जोडण्यासाठी जपतो मी पासवर्ड. . . . . आपण आणि आपला अंडा "सेल", कोणी माणुसकी करता का फॉरवर्ड ?

पुढील पाच मिनिटात

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 08/08/2017 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
पुढील पाच मिनिटात, हे मानवते "अ" अतिरेकी काळिमा फासतील तुझ्या तोंडाला "ब" बलात्कारी झुकवतील तुझी मान शरमेने खाली "क" कोवळी बालपणं विकली जातील बाजारात "ड" डोकी फुटतील धर्ममार्तंडांच्या एका भृकुटीभंगाने तुझ्या डोळ्यादेखत ई-पेपर्स सांगून थकतील "अ" "ब" "क" "ड" च्या मिनिटागणिक वाढत जाणाऱ्या किंमती रोम-रोम जळताना तुझ्या जीर्ण-शीर्ण त्वचेच॑ हे उत्सवी फिड्ल कोण वाजवतंय न थांबता?
काव्यरस

नाद वारुणी वारुणी, उठे रोमरोमांतुन

लेखक चामुंडराय यांनी मंगळवार, 08/08/2017 04:58 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ कविता - आली कुठूनशी कानी, टाळ मृदुंगाचि धून (कवी - सोपानदेव चौधरी) आली कुठूनशी कानी, चषकांची किन किन नाद वारुणी वारुणी, उठे रोमरोमांतुन स्कॉच व्हिस्की ती भरली, धुंद मद्य चषकांनी थंड बियर फेसाळती, गजर चिअर्स उंचावुनी वारुणीच्या चषकात आईसक्यूब्ज ओले चिंब चखना असे साथीला, काजू चिकन आणि श्रिम्प खंबा दिसला सामोरी, काय सांगू त्याची शोभा मद्य घेवुनी अंतरी, स्वागतास माझ्या उभा चिंता संसाराची सरे, माझ्या साकियाँच्या साथीत माझे मन झाले दंग, उमर खय्यामच्या रुबायांत आली कुठूनशी कानी......
काव्यरस

हॕपी फ्रेंडशिप डे

लेखक निलम बुचडे यांनी रविवार, 06/08/2017 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना फ्रेंडशिप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. **अतूट मैत्री ** मैत्री असावी फुलासारखी, निशब्दपणे उमलणारी.. मैत्री असावी दवासारखी, मोत्यासारखी चमचमणारी.. मैत्री असावी सूर्यासारखी, प्रकाशमय करणारी.. मैत्री असावी चंद्रासारखी, शीतलता देणारी.. मैत्री असावी धाग्यासारखी, वस्त्र साकारणारी.. मैत्री असावी सुईसारखी, नात्यांना गुंफणारी.. मैत्री असावी मेणासारखी, मित्रांसांठी वितळणारी.. मैत्री असावी दगडासारखी, अतूट राहणारी.. -निलम बुचडे. आणखी कविता वाचायच्या असतील तर माझ्या पेजला भेट द्या.

अस्वस्थ बरसात

लेखक रवि बदलापूरेकर यांनी शुक्रवार, 04/08/2017 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
अस्वस्थ बरसात अशीच अवचित आली सर ती पावसाची, सोबत दाटून आली सय तुझ्या आठवणींची तो पाऊस बेफाम तो वारा मदहोश, ती चिंब बरसात असलेली तुझी साथ ते गारठलेले हात ते उष्ण श्वास, होणारे ते स्पर्श हवेहवेसे सारे क्षण आली होतीत मिठीत जेव्हा कडाडली होती वीज, होते मानले किती आभार मी तिचे मनातल्या मनात त्या न संपणार्‍या गप्पा तुझ्या ते न विरणारे हास्य तुझे, आता छळते ही बरसात सदा जेव्हा आठवतात ते क्षण पुन्हा भिजतोय आजही मी तसाच साजणे चिंब तुझ्या आठवणीत, बरसणार्‍या या जलधारात वाहणारे ते स्वप्न इंद्रधनुषी पाहत - रवि बदलापूरेकर
काव्यरस

.. .अक्षय अविरत निर्मळ

लेखक विटेकर यांनी गुरुवार, 03/08/2017 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
या भल्या पहाटे थोडे मी तुझेच गाणे गावे अन गात्रा मधले कोडे अलगद सुटून जावे ती वीण मखमली मनाची अन श्वास समर्पित व्हावा त्या जगनियंत्यासाठी हा देहच निमित्त व्हावा विरघळून जावे अलगद मी पण माझे नुरावे त्या अक्षय सुखामध्ये मी अवचित भान हरावे ते नकोच लौकिक जगणे अन श्वासही संकोचावा तू माझा अन मी तुझाच हा भोगच अक्षय व्हावा मी भरून पावलो अवघा ही तुझीच मिठी अवखळ मी विरून हलका होतो अक्षय अविरत निर्मळ - बंगलोर , १ ऑगस्ट २०१७, ०६.३६ वाजता