Skip to main content

अनोळखी

लेखक रवि बदलापूरेकर यांनी गुरुवार, 03/08/2017 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
अनोळखी पलटून तुला पाहताना मज अनोळखी तू वाटे, ती नजर तुझ्या डोळ्यातील का आपली ना भासे क्षितिजातल्या धुक्यात हरवून गेली वाट, वाटे रिक्त जग सारे सुनसान ही पायवाट ते स्वप्न आपले विरले कसे नि कुठे, का वाढला हा अबोला विश्वास का न उरला चुकलो कुठे ग आपण राहिली प्रीत का अधुरी, स्वप्नातले ते सारे भंगले कसे मनोरे वळणावर मी तु़झ्या त्या पाहे वाट अजूनी तुझी, नि तू सोडुनी गेली अशी जशी नव्हतीच कधी माझी - रवि बदलापुरेकर
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1076
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया