Skip to main content

कविता

ये,बैस ना जराशी...

लेखक सत्यजित... यांनी शुक्रवार, 07/07/2017 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
ये,बैस ना जराशी,कर बात चांदण्याची दररोज येत नाही ही रात चांदण्याची! हिणवून काल मजला,गेलाय चंद्र रात्री दे दाखवून त्याच्या औकात चांदण्याची! कळतेय ना मलाही,होतो उशीर आहे कवळून जा उराशी तादात चांदण्याची! येतेस तू अताशा,स्वप्नात रोज माझ्या स्वप्नांत भेट होते साक्षात चांदण्याची! स्वप्नांत चांदण्याच्या,गेल्या कितीक राती घेवून रात ये तू दारात चांदण्याची! आलीस ना छतावर झटकून केस ओले? शहरात होत आहे बरसात चांदण्याची! —सत्यजित

भवताल

लेखक चंद्रकांत यांनी शुक्रवार, 07/07/2017 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
भवताल भंजाळलेला भवताल, भरकटलेली माणसे आणि अस्वस्थ वर्तमान नियतीने निर्धारित केलेलं प्राक्तन की, स्वतःच आखून घेतलेली वर्तुळं संस्कृती केवळ एक शब्द नाही प्रदीर्घ वाटचालीचा इतिहास सामावलेला आहे त्यात माणसाच्या अस्तित्वाचा पण तोही आक्रसत चाललाय एकेक पावलांनी कुठून कुठून वाहत येणारे प्रवाह अथांग उदरात साठवत राहिला शतकानुशतके कोरत राहिला अफाट काळाच्या कातळावर लेणी सजवत राहिला साकोळलेल्या ओंजळभर संचिताला क्षणपळांची सोबत करीत चिमण्यापावलांनी पळत राहिला सुंदरतेची परिमाणे शोधत दिशा बदलली वाऱ्यांनी अन् पडले मर्यादांचे बांध कणा कणाने निसटतो आहे हातून वर्तमान वाहत्या प्रवाहांना पायबंद घातले आहेत पर

शिवस्तुती

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी गुरुवार, 06/07/2017 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
आदिदेव महादेव नटभैरव नटरंग करी तांडव आंदोलन होई भयकंपन नटराज पंचवदन अतिरुद्र महांकाल दशहस्त काळाग्नी रुद्र गळा सर्पाभरण महातत्व महाप्रचंड जाळितसे मदन वदन विरक्त महायोगी महागुरू जगत्कारण भूतगण शिवगण पूजिती मायेसहित गजानन भावभोळा शिवशंकर होई वरदायक देई शुद्ध भक्ती मुक्ती आम्हां तारक गंगाधरसुत म्हणे होई मज आश्वासक
काव्यरस

II तो स्पर्शच नवा होता II

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी गुरुवार, 06/07/2017 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
तो स्पर्शच नवा होता का कुणास ठाऊक भासे हर एक भेटीची, अपूर्वाई उमजे ना मज कारण का तो कायम हवा होता II चुकून लागलेल्या धक्क्याने भवताली दाट धुके झाले सुचले नाही क्षणभर मन कायमचे मुके झाले भर ग्रीष्मात मज बाधला प्रेम शिशिराचा गारवा कारण , कारण ..... कसं सांगू तुम्हाला तो स्पर्शच नवा होता II शुष्क होते मन माझे सत्वास मी जागलो का जाणे सैरभैर धक्क्यापरी वागलो हळू हळू अंतराने रंग घेतला नवा पालवी ती जागोजागी देठही तो हिरवा कारण , कारण ..... कसं सांगू तुम्हाला तो स्पर्शच नवा होता II सिद्धेश्वर विलास पाटणकर C

II मास्तर म्हणतात पोरांना , पिरेम लय वाईट II

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी बुधवार, 05/07/2017 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
मास्तर म्हणतात पोरांना पिरेम लय वाईट करू नका कधी तुम्ही जाल सर्व खाईत II झाडे लावा, गुरे चारा मायबापास पोसा पिरमामध्ये हे शक्य नाय मग का स्वतःस कोसा ? पिरेम पिरेम करता करता माझी बिनपाण्याची झाली सोन्यासारखी नोकरी जाउनी घंटा हाती आली II हाती छडी अन टोपी घेऊनि शाळेमंधी जातो डोक्याला मॉप शॉट लावूनी घरी घ्यायला परत येतो II पगारपाणी ना येळेवरती वाढला भांडणतंटा छडी घेऊनि फक्त बडवितो म्या शाळेमधली घंटा II सिद्धेश्वर विलास पाटणकर C

एक अधिक एक...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 05/07/2017 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
एक अधिक एक=दोन! डायल केल्यावर लागलाच्च पाहिजे फोन! नेटवर्क बिझी असू शकतं. रेंज नसू शकते. कदाचित स्वीच अॉफ असू शकतो समोरच्याचा फोन! या वास्तविक शक्यता ग्रुहीत धरणार कोण? .. छे! छे! लागलाच्च पाहिजे फोन. कारण,एक अधिक एक=दोन! गणितात आयुष्य पहायचं. पण आयुष्याचं गणित शिकायचं नाही! पहिल्या एक आणी दुसय्रा एकच्या किं~मती मधली तफावत..मूल्यांचं वेगळेपण? त्यांचं मूळ १ असणं,नसणं? त्यांची भूक तहान तर अमान्य, अस्विकार्यच! कारण एक अधिक एक=दोन! यापेक्षा वेगळी जीवननिष्ठा कोण??? ह्हूं!!! लागलाच्च पाहिजे फोन! कारण,एक अधिक एक=दोन! एक अधिक एक=पाच! एक अधिक एक=दहा! कधी कधी मायनस दहा देखील!

बाप हा ताप नसतो, पोरा

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी बुधवार, 05/07/2017 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
बाप हा ताप नसतो, पोरा आईचा पदर पकडून चाललास खूप खूप मोठा झालास विसरलास लेका बापाला आता उगा करतोयस तोरा II घास जरी आईने दिला तरी घासत तो बापच होता त्या तुमच्या पोटासाठी इतरांसमोर वाकत होता त्याच्या वाकण्याने तुला कणा दिला मान मरातब मिळाला अन तू लेका सर्व विसरला II दुध नाही पाजले पोटात नाही वाढवले पण ते दिवस मोजणारा तोच होता तुझ्या आगमनाने आनंदाश्रू गाळणाराहि तोच होता तुला रडताना बघून तळमळणारा पण तोच होता II आरं त्यो जर रडला असता तर तू कसा रं वाढला असता तुमहाला वाढताना बघून तो मात्र जगासमोर कायम वाकत होता तो ताप नव्हता तो तुझा बाप होता , फक्त तुझ

II मी प्रेमपुरीचा विठ्ठल II

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी मंगळवार, 04/07/2017 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी प्रेमपुरीचा विठ्ठल माझी वेगळीच रखमाई तुझं जमणार नाही माझयासंगं का करते उगा तू घाई ? II तू सुखी राहा तुझी बाई लांबच बरी तू वाटते उगा तंगड्या घालू नको मधी सात जन्मात मिळायचो नाही II माझी येगळीच तर्हा तिऱ्हेवाईक मी येगळा रखमा शिवराळ असली तरी तिच्यासंगेचं मी बरा II मला ठावं तुझे डाव नको तिथे डोकं लाव भोळा ढंगाने जरी मी नको मला आजमाव II आत आवाज मज येई तुझया नाटकी शाळेचा नेहेमी दुर्लक्ष करितो धन्य माझी ती रखमाई II सिद्धेश्वर विलास पाटणकर C

..तिथे ती भेटते

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 04/07/2017 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
ढगाच्या आतले विजेचे वेटोळे सुटून मोकळे डोंगरा डसते...तिथे ती भेटते निबिड रानात पोपटी पानात झुकून बघत मोतिया थेंबात ...किणकिण हासते भणाण वाऱ्यात लाटेच्या गाजेत चांदीच्या वर्खात किनारा कोरत ... माझ्याशी बोलते
काव्यरस

II हात सोड कटेवरचे , उचल बडव्यांशी लढावया II

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी मंगळवार, 04/07/2017 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
भ्रम कैवल्याचा साधला भक्ती नामातच तू बांधला कुणी पहिला रे तुला दगडामध्येच अडकला खांब सोनेरी रुपेरी तरी उभा विटेवरी बडवे मातले ते सारे उगा भक्तांसी छळे ऱे दावुनी कोरी नोट त्यांसी उभे माउली दर्शनासी बनवून माऊलीस दासी बडवे राजभोग भोगती तुझा दरबार पातला, दुर्लभ भक्त दर्शनासी स्वतः समजून ते राजे शिवीगाळ गाभारा माजे कैसी शिस्त नाही जाण कोऱ्या नोटेस फक्त मान तुझ्या दरबारी विठुराया फक्त लक्षुमीची छाया हात सोड कटेवरचे उचल बडव्यांशी लढावया सिद्धेश्वर विलास पाटणकर C