कविता
निर्णय
मान्य आहे ते सत्तेत होते
मान्य आहे त्यांनी स्वप्नं दाखवली
मान्य आहे ते तुमचे 'आदर्श' होते
त्यांच्यातले बरेच जण
खरे असतील
हेतूही स्वच्छ असतील बहुतांशी
आणि काही जण त्यांनीच घेतलेल्या निर्णयाच्या
विरोधातही असतील
पण कदाचित
निर्णायक क्षणी समोर आलेली
त्यांची काही अपरिहार्यता असेल
किंवा त्यांना, तुम्हाला सगळ्यांना
घाईसुद्धा झाली असू शकते...
ईतकी वर्षं लढा दिल्यावर
समोर विजय दिसत असतानाची घाई
सगळं सगळं मान्य आहे
पण तरीही ,
ते मूठभरच होते
तुम्ही तर करोडोंच्या संख्येने होता ना
का नाही सांगितलंत मग
...की आम्हाला नकोय फाळणी
काव्यरस
पहिला पाऊस
ह्या कवितेत मी पावसाच्या थेंबांनी मन कसे बहरते ते सांगितलं आहे .
☔ पहिला पाऊस ☔
पहील्या पावसात भीजतांना
आठवण तुझी होते
पावसाच्या त्या सरीमधे
मन माझे उमलते
☔☔☔☔☔
हाती तुझा हात घेऊन
भीजावेसे वाटते
दाटलेल्या त्या धुक्यांमधे
रमावेसे वाटते
☔☔☔☔☔
पावसाच्या सरीने
दरवळतो सुगंध मातीचा
भीजतांना त्या सरीमधे
विसर पडतो स्वतःचा
काव्यरस
मी
माझा कुठला धर्म, माझा कुठला पंथ
मी कुठल्या तळ्यातला, माझा कोण संत
माझी कुठली जात, कुठली उपजात
नेमकी कुठल्या समईतली, मी वात
निळे अंबर, हिरवा निसर्ग
भगवा सुर्योदय, कोणाचा कुठला रंग
हा संप्रदाय, तो संप्रदाय
ज्याचा त्याचा आपआपुला समुदाय
अनादी मी, अनंत मी
आत्ममग्न, निसंग मी
सुधीर देशमुख
अमरावती
https://sudhirvdeshmukh27.blogspot.in/?m=1
..........पापनिष्ठ ?
देव पाप्यांशी धार्जिणा
जैसी गाय कसाबाशी
पुण्यवान कष्टती जगी
दर्शन भासेही न पावती
रावणे राम पाहिला
शिशुपाले कृष्ण जैसा
कंस तो भाग्यवान
कालिया सहजी उद्धरला
संभ्रमात साधुजन
व्हावे पुण्यनिष्ठ की पापनिष्ठ ?
भेटे देव तामसियांशी
सर्वाआधी .....
सामान्य जन तीर्थाशी जाती
लक्ष्मिचा अपव्यय करिती
संसार व्यवहारी कष्टती
अकारण जन्मोजन्मी
गंगाधरसुत म्हणे प्राधान्य तिमिराशी जगी
मैत्री वाढवावी घट्ट तयाशी
काव्यरस
कृष्ण (भावानुवाद)
ज्याने कधी काळी धरित्रीचे तृषार्त अंतःकरण अनुभवले होते
स्वर्गलोकापल्याडच्या कृष्णचरणांची अभिप्सा धरली होती
त्या मज पामराला या भयावह तरीही सुमधुर भवसागरात
जीवात्म्याने जन्म घेण्याचे प्रयोजन एकदाचे उमगले आहे
त्या सावळ्याच्या डोळ्यातले चिरंतन सौंदर्य मी पाहिले आहे
मी ऐकला आहे त्या प्रेमिकाच्या बासरीतला धुंद आवेग
त्या चिरंतन परमानंदाच्या गूढरम्य अनुभूतीत
माझ्या अंत:करणातली शोकव्यथा कायमची मौनावली आहे
ते दिव्य संगीत जसजसे निकटच्या सान्निध्यात अलगदपणे खेचून घेते आहे
सारे जीवनच जणू त्या सोलिव सुखाने गात्रागात्रातून रोमांचित होते आहे
आपल्या दैवताने स्पर्श करावा, हात हाती घ्यावा, त्याचा सहवास लाभावा
काव्यरस
ती सध्या काय करते ?
ऐका ! ती सध्या काय करते
उठल्या उठल्या वाय- फाय करते
सकाळ पासून खाय खाय करते
तिखट खाऊन हाय हाय करते
बिल आले की नाय नाय करते
रोज नव्या मित्राला 'हाय' करते
संध्याकाळी त्याला 'बाय' करते
रोज नवा ड्रेस 'ट्राय' करते
वय लपावे म्ह्णून 'डाय' करते
खोटं खोटंच 'शाय' करते
दुसऱ्याचा भेजा 'फ्राय' करते
स्वतः मस्त 'एन्जॉय' करते
तीच जाणे कसे काय करते
कळलं ? ती सध्या काय करते ?
------ बाळ ठोम्बरे
काव्यरस
अंत आणि आरंभ
जीर्ण-शीर्ण कातडी सर्प हा टाकतोच. त्यात शेषाने पृथ्वीला उचलून धरले आहे. जीर्ण कातडी टाकण्यासाठी पृथ्वीला समुद्रात बुडवावे लागेलच. माणसाच्या पाशवी कृत्यांमुळे पृथ्वीचा देह हि जीर्ण-शीर्ण झाला आहे. प्रलय पृथ्वीला पुन्हा नवीन चैतन्य मिळवून देणारा आहे...
जीर्ण-शीर्ण कातडी
शेषाने टाकली.
प्रलय अमृतात
धरती न्हाली.
हिरव्या शालूत
नववधू लाजली.
प्रीतीचे गाणे
नभी गुंजले.
अंकुर चैतन्याचे
पुन्हा प्रगटले.
काव्यरस
फक्त एकदा हसून जा...
मोडली ही प्रीत जरी, थांब थोडे बसून जा |
जगेन तुझ्या आठवणीवर, फक्त एकदा हसून जा |
कोमेजले हे फूल जरी, गंध आणखी आहे ताजा ;
दैवाचा हा खेळ सारा ; नाही मुळी गं दोष तुझा.
द्रावले ना हृदया जरी, पापण्यांना पुसून जा ;
जगेन तुझ्या आठवणीवर, फक्त एकदा हसून जा |
लावुनिया जीवास लळा, फुलविलास गं प्रीतमळा;
कापिता केसाने गळा, झालो बघ मी वेडाखुळा.
समजून मला दुधखुळा, हृदय माझे पिसून जा;
जगेन तुझ्या आठवणीवर, फक्त एकदा हसून जा |
मन माझे गुंतले हे, वेड्या खुळ्या आशेमध्ये;
भांबावलेल्या या मनाचे , भाव तुला कसे न कळे.
भावनांची या माझ्या, कदर तू गं करून जा;
जगेन तुझ्या आठवणीवर, फक्त एकदा हसून जा |
तुजविणा हे जग भा
~~~मैत्री~~~
~~~मैत्री~~~
आपसुक ओळख
सगळ्यात निखळ,
आपुलकीचं नातं
सर्व सामावून घेतं,
जीवनाच्या मेळाव्यात
भेटतात अनेक,
मनाच्या कोपऱ्यात
मैत्रीचं विशेष,
रक्ताच्या नात्या पलिकडचं
सर्वात अधिकतमच,
एका हाकेत
निस्वार्थ सोबत,
जणु ओंजळीत
मैत्रीची गाठ,
सुख शांती ची शिदोरी
दुख जाई दूर कोसवरी,
हक्काचं रागावणे
क्षणांत माफ करणे,
हातात हात
कायमची साथ,
अलगद प्रवास
सुखाचा सहवास,
डोळ्यांत आठवणी
अन,निःशब्द मैत्री....
कवी- स्वप्ना..
काव्यरस
मिसळपाव