Skip to main content

.. .अक्षय अविरत निर्मळ

लेखक विटेकर यांनी गुरुवार, 03/08/2017 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
या भल्या पहाटे थोडे मी तुझेच गाणे गावे अन गात्रा मधले कोडे अलगद सुटून जावे ती वीण मखमली मनाची अन श्वास समर्पित व्हावा त्या जगनियंत्यासाठी हा देहच निमित्त व्हावा विरघळून जावे अलगद मी पण माझे नुरावे त्या अक्षय सुखामध्ये मी अवचित भान हरावे ते नकोच लौकिक जगणे अन श्वासही संकोचावा तू माझा अन मी तुझाच हा भोगच अक्षय व्हावा मी भरून पावलो अवघा ही तुझीच मिठी अवखळ मी विरून हलका होतो अक्षय अविरत निर्मळ - बंगलोर , १ ऑगस्ट २०१७, ०६.३६ वाजता
लेखनविषय:

वाचने 1904
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

'मी विरून हलका होतो अक्षय अविरत निर्मळ' सुंदर..

कविता प्रचंड आवडली आहे...विशेषतः
मी विरून हलका होतो अक्षय अविरत निर्मळ
पैजारबुवा,

मस्त कविता! आवडलीच! Sandy

विटूकाका, नुरावेसारखे थोडे प्राचीन शब्द सोडता कविता/मुक्तक्/प्रकटन प्रचंड आवडलेली आहे. तुम्ही खूप लिहावे अशी प्रार्थना.

सर्वांचे मनःपूर्वक आभार ! मी पहिल्यान्दा कविता लिहिण्याचा प्रयत्न केला , पूर्वी विडम्बने पुष्कळ केली .. पाहतो पुढे कसे जमते ते !