चल उठ रे बेवड्या झाली सांज झाली... बाहेर दारू गुत्त्यांना हलकेच जाग आली
काव्यरस
- Read more about चल उठ रे बेवड्या झाली सांज झाली... बाहेर दारू गुत्त्यांना हलकेच जाग आली
- 7 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
( सुरेश भट _/\_ )
चल उठ रे बेवड्या
झाली सांज झाली...
बाहेर दारू गुत्त्यांना
हलकेच जाग आली
उघडले कधीचे
गुत्त्यांचे द्वार बंद
अन् चोरपावलांनी
आला देशीचा गंध
गल्ल्यावरी गुत्त्याच्या
आंटी येऊन बसली...
बाहेर दारू गुत्त्यांना
हलकेच जाग आली
चल लवकरी आता
पहिल्या धारेचा सहारा
मोसंबी नारंगी ठर्रा
करती तुझा पुकारा
सज्ज साथ देण्या
पापड अंडी चकली...
बाहेर दारू गुत्यांना
हलकेच जाग आली
तव याद करिती सारी
बेवड्यांची मांदियाळी
घे एक घोट नवटाक
चिंता सर्व जाळी
तुज शोधण्यास वेडी
बायको पुन्हा निघाली...
बाहेर दारू गुत्यांना
हलकेच जाग आली