Skip to main content

कविता

प्रेम रंग

लेखक तृप्ति २३ यांनी सोमवार, 12/03/2018 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम रंग ही कविता  प्रेमाच्या विविध रंगांवर केली आहे . तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू  शकता.

घरी कधी जायचं?

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 08/03/2018 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्यांवरून फिरताना, मजेमजेत धावताना खिदळत असतो, उधळत असतो आम्ही थकून जेव्हा बसतो तिथेच, बाजूला एखाद्या झाडाखालच्या दगडावर माझ्या मांडीवर बसून सानुली माझी करते चाळा माझ्या शर्टाशी डाव्या हाताचा अंगठा तोंडात तसाच ठेवून माझ्याकडे मान तिरपी करत पाहते आणि विचारते अंगठा तेवढ्यापुरता तोंडातून काढत, "बाबा, आपण घरी कधी ज्यायच्य?" मी हसतो, लगेच दोन्ही हातांनी तिला उचलून घेतो गुदगुल्या करीत तिला खांद्यावर टाकतो खळखळून तिच्या हसण्याने प्रश्न वाहून गेलेला असतो मग आम्ही जातो बागेत बरीच गर्दी असली तिथे जरी हिरवळीवर एक कोपरा धरून आम्ही बसतो पण, मिनीटभरच, कारण... पुन्हा सुरू होते पळापळी सुपारीच्या झाडाभोवती
काव्यरस

कल्लोळती रंगरेषा

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 07/03/2018 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ जांभळ्या कोन्यात क्लांत आदिम श्वापद माझ्या मातीच्या पायांची लाल, रांगडीशी याद कधी शुभ्र झळाळतो एक कोना आरस्पानी अद्भुताची निळी हाक मग गुंजतसे कानी कुतूहलास पारव्या केशरीशी ज्ञानफळे हिर्वळीस सर्जनाच्या किल्मिषांचे खत काळे कल्लोळती रंगरेषा अशा रात्रंदिन मनी इंद्रधनूची कमान शोधू कशाला गगनी
काव्यरस

सातोरी

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 05/03/2018 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
सप्त-समुद्रांमधे मिसळती असंख्य सरिता मधुर जला मार्गावरती समर्पणाच्या करिती पृथ्वीला सुफला सप्त-रंग हे इन्द्रधनूचे क्षणभर दिसती-अन विरती मेघांवरती रविकिरणांचे इन्द्रजाल अद्भूत किती पुनरावर्तन सात दिसांचे जरी मानवा योग्य दिसे अनादि काल-प्रवाह वाहे अंत तयाला कुठे असे? अपूर्व विभ्रम सप्त-सुरांचे राग होउनी अवतरती कोंदणात तालांच्या त्यांची अमूल्य रत्ने झगमगती निर्धाराने परिश्रम करता असाध्य जगती काही नुरे कल्पनेतले सप्त-स्वर्ग मग भूवरी येतिल खरेखुरे

मी तृषार्त भटकत असता

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 03/03/2018 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
मी तृषार्त भटकत असता मृगजळास भरते आले मी मला गवसण्या आधी वैफल्य विकटसे हसले शब्दांच्या इमल्यापाशी सावली शोधण्या गेलो पण शब्दांचे केव्हाचे धगधगते पलिते झाले क्षण क्षणास जोडित जाता वाटले काळ संपेल पण वितान हे काळाचे दशदिशा व्यापुनी उरले
काव्यरस

सप्तश्रृंगी देवी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 03/03/2018 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
सप्तश्रृंगी देवी काल रातीला देवी माझ्या सपनात आली गड देवीचा चढायाला सुरूवात मी गा केली || धृ || रडतोंडीचा घाट होता लई अवघड पाहून छातीमधी बाई व्हयी धडधड रस्त्यामुळं नांदूरीगड चढण आता सोपी झाली ||१|| अठरा शस्त्रे घेतले तू ग अठरा हातामधी सौभाग्याचे अलंकार तुझ्या अंगावरती महिषासुर मारी तू आदिमाया शक्तिशाली ||२|| विडा तांबूलाचा खावूनी मुखी रंगला सप्तश्रृंगीच्या पायी जीव माझा दंगला देवी माझी सोळा शिणगार ग ल्याली ||३|| कुंकवाचा मळवट भरला देवीच्या कपाळी अकरा वार साडी नेसूनी अंगावर चोळी घाई करा दुपारच्या आरतीची वेळ आता झाली ||४|| - पाषाणभेद
काव्यरस

तू पहाट ओली

लेखक परशुराम सोंडगे यांनी शुक्रवार, 02/03/2018 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
तू पहाट ओलीसांज कोवळी येते का गंध अाठवांचा घेऊन उमटीत जाते मनी वेडी हळवी स्वप्नसुरांची धून पदर हा रातीचा ढळता सांडे उरात चंद्र नभीचा ओठानीच कसा चूंबावा प्राण विरता रातराणीचा झरे अशी गात्रागात्रातूनी तू थरथरती पहाट ओली विरून क्षितिजाच्या रेषा आभाळ चुंबते धरा गाली परशुराम सोंडगे,पाटोदा sahitygandha(साहित्यगंधा).blogspot.com prshuramsondge.blogsopt.com
काव्यरस

गारवा - विडंबन

लेखक OBAMA80 यांनी शुक्रवार, 02/03/2018 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या प्रोफेशनल आयुष्याची सुरूवात ज्या डोंबिवलीमध्ये राहून झाली तेथून सकाळची जलद लोकल पकडणे हे एक मोठ दिव्यच. त्या दिव्य अनुभवावरूनच खालील विडंबनाची कल्पना सुचली. मूळ कवी सौमित्र व गायक मिलींद इंगळे यांची माफी मागून सादर करतो....गारवा चे विडंबन. मूळ कविता - गद्य भाग- ऊन जरा जास्त आहे दर वर्षी वाटतं भर उन्हात पाउस घेउन......
काव्यरस

झेब्र्याचा जन्म

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 01/03/2018 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा वाघ शिकारीस निघाला शोधत शोधत शिकार तो कुराणाशी गेला डौलदार अजस्त्र तो, डोळे शिकारीकडे गाढवांचा कळप तेथे चरण्यासी आला हेरली एक बाकदार, सुंदर, नाजूक गाढवीण त्याने असेल फर्लागभर अंतरावर घेऊन पावित्रा मारणार उडी इतक्यात नजरभेट झाली त्या सुंदर गाढविणीच्या नजरेने केली, शिकाऱ्यावरच कडी अन शिकारी खुद्द शिकार झाला तारीख ठरवली गेली लग्नसोहळ्याची घेतल्या आणाभाका शिकार न करण्याच्या यथेच्छ जोड्याने चरण्याच्या मंगला समयी लग्न लागले सोहळ्यास सारे जंगल लोटले सर्व सुखांत ते तृणभक्षक आता भय नसे कुणाचे वाघच आपला रक्षक मंगलाष्टक म्हंटली गेली कालांतराने गाढवीण व्यायली द
काव्यरस

मराठी दिन २०१८: माले का मालूम भाऊ? (झाडीबोली)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी बुधवार, 28/02/2018 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
माले का मालूम भाऊ? 'कोनं बगरवलन बे माह्या सपनाईचा कचरा? डुंगा करूनस्यानी ठेवलो होतो जाराले सोपा जाते. कोनं बगरवलन बे?' माले का मालूम भाऊ! 'साला सपना त सपना सपन्याचा कचरा बी डबल मेहनत कराले लावते!' येवड्या जल्दीमदि कोटी चाल्लास गा? पिक्चर पावाले कोनाय हिरोहिरोईन? भाई अना कतरीना मानुसमाऱ्या वाघ हिंडून रायला ना बे? माले का मालूम भाऊ! टायगर त कसाबी जिंदा रायल, पर तू जिंदा रायसीन का? 'गारा पडतीन म्हून माहीत नोहोता माहित राहून बी का तोफ झाडला रायता मना' अगा बंड्या, गारा काहून पडते गा?' ​'​माले का मालूम भाऊ!​'​ अबे विकास!
काव्यरस