Skip to main content

कविता

|| गुरु महिमा ||

लेखक गबाळ्या यांनी शुक्रवार, 08/12/2017 06:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज असे हा वार गुरु महिना चालू डिसेम्बरू सप्त तारीख कॅलेंडरू लेखणी माझी झाली सुरु कित्ती विशेष हा असे दिनु सहा वर्षांतूनी आगमनु पहा अचंबूनी जाई मनू कवीस पुरेसे हे कारणु टाकुनी मागे त्या 'बुधि'या धाव धावतो हा जरीया धाव संपवी तो 'शुक्रि'या शब्द वाकवी मी लीलया एकेक दिन हा महामेरू वाटे कविता त्याची करू बसलो घेऊन मी बोरू हवा कागदा स्पॉन्सरु

एक कविता

लेखक रामदास यांनी गुरुवार, 07/12/2017 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
अरे , उधार माग , देतो ना चार करकरीत नोटा कधी देणार परत असं न पुटपुटता ... अरे, हिशोब माग , देतो मुकाट सगळ्या सोळभोगाचा इत्थंभूत , पण उंबरठ्यावर अडकण घालून , एक गाणं दे , एक गाणं दे असा, धोशा लावणाऱ्या दिवसाला कसं माघारी पाठवायचं ??
काव्यरस

नवा कवी

लेखक गबाळ्या यांनी बुधवार, 06/12/2017 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा ने सर्व साहित्यिकांसाठी खुला मंच उभा करून या युगातील एक महत्कार्य केले आहे. खुला मंच, फुकटात प्रकाशन आणि फुकटात श्रोते. हे म्हणजे नवकवींच्या हाती लेखणी दिल्यासारखेच झाले. आम्ही या सर्व नवकवींचे खंदे समर्थक आहोत.

व्यथा

लेखक वैभवदातार यांनी मंगळवार, 05/12/2017 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे खूप पाऊस पडतो आहे. अवकाळी पावसाचा पिकांवर वाईट परिणाम होईन खूप नुकसान होते आहे.

||दत्त स्तुती ||

लेखक वैभवदातार यांनी सोमवार, 04/12/2017 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
काल झालेल्या दत्त जयंती साठी मी लिहिलेला अभंग ||दत्त स्तुती || अनसूयानंदन ब्रह्मा विष्णू महेश्वर अवतरले भूवरी दत्त दिगंबर ||धृ || तीन शिरे सहा हात रूप तुझे हाती कमंडलू भगवी वस्त्रे साजे ||१|| अनसूया माता पतीचरणी लीन चरणजल स्पर्शिता बालके तीन ||२|| त्रिशूल डमरू शंख चक्र गदा हाती मागे उभी कामधेनू श्वान पुढे वसती ||३|| भूत पिशाच्चे तुजला पाहुनिया पळती जो ध्यातो भक्तीने हृदयी त्या वसती ||४|| श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती पीठापूर कुवरपूर गाणगापूरी राहती ||५|| वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्थ अक्कलकोटी अवतार दत्तांचे रूपे कोटी कोटी ||६|| औदुंबर वृक्षातळी वास असे निरंतर दर्शन देई भक्

कविराज

लेखक गबाळ्या यांनी रविवार, 03/12/2017 03:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर! मी मिपाचा नवीन सदस्य. तुमच्यासाठी एक रचना घेऊन आलो आहे. तुमच्या प्रतिक्रियेची अपेक्षा आहे. अगदी परखडपणे तुमच्या प्रतिक्रिया मांडा. मग त्या सकारात्मक असोत, नकारात्मक असोत, तटस्थ असोत वा सल्ले/उपदेश असोत. स्वयंसुधारणेसाठी मला त्याचा नक्कीच उपयोग होईल. ( कवीला व्यासपीठ मिळणं, श्रोते मिळणं, हि पर्वणीच आहे. आणि कोणा कवीला जर श्रोते स्वतःहुन म्हणत असतील कि आम्ही तुमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आतुर झालो आहोत, तर ते त्या कवीचं अहोभाग्यच. असं भाग्य एका नवकवीच्या वाट्याला आलं. त्याची हि कविता.

चुकले...

लेखक अजब यांनी शनिवार, 02/12/2017 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
गंध उधळला इकडुन तिकडे, वाऱ्याचे चुकले निखळुन पडला वरून खाली, ताऱ्याचे चुकले दूर जाउनी परतुन आली, वाटेचे चुकले किनाऱ्यावरी विसावली अन लाटेचे चुकले घाव लागला वर्मी, होते बाणाचे चुकले तडफडला पण गेला नाही, प्राणाचे चुकले बुडून गेली वस्ती सगळी, प्रलयाचे चुकले इतके कुणास अपुले म्हटले, हृदयाचे चुकले...

||हुच्चभ्रूंची कैसी लक्षणे ||

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 01/12/2017 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
हुच्चभ्रूंचे कैसे बोलणे | हुच्चभ्रूंचे कैसे चालणे समानांशीच सलगी करणे | कैसे असे ।। दुर्बोध वाङमयाचे आधारू | क्लिष्ट व्होकॅबचे भांडारू। चोखंदळांचे महामेरू | चिवित्रान्न भोगी || उठपटांग ज्ञानराशी | उदंड असती जयांपाशी | गुगलपरिपुष्ट आयक्यूशी । तुळणा कैची ।। यांसी गमे जे रोचक | त्यावरी कमेंटती टंग-इन-चीक शष्प न कळोनि निचभ्रू लोक | वाचनमात्र राहती || हुच्चभ्रू तितुके मिळवावे । नीचभ्रू अवघे इग्नोरावे । समतोलत्वाचे देखावे | परी करावे चातुर्ये ।। अता नीचभ्रूपणाचा त्याग । करोनि साधावा सुयोग।। विदग्धतेची लगबग । येरू म्हणतो करावी ||
काव्यरस

|| गीताबोध ||

लेखक वैभवदातार यांनी शुक्रवार, 01/12/2017 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
संपूर्ण जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणार्या गीतेतील अठरा अध्यायांचे सार अठरा ओव्यांमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. ज्या श्रीकृष्ण भगवंतांनी माझ्याकडून हा गीताबोध लिहून घेतला त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी १९ वी ओवी लिहिली आहे.

एक कागद

लेखक गबाळ्या यांनी सोमवार, 27/11/2017 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला जसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला एक कागद कस्पटासम ||धृ ।। 
 एक बालक हाती घेई, मायेने मग आकार देई, बनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला ।। १ ।। 
 उंच विहरता मन स्वच्छंदी, हीन भासली भुतल रद्दी, वाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला ।। २ ।। 
 वाटे त्यासी उंच उडावे वादळ वारे यांसी भिडावे कांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला ।। ३ ।। 
 इतकी उंची तये गाठली साद मनीची नभी आटली ढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला ।। ४ ।। 
 गगन ठेंगणे खुणवी तारे मांजा परी तो रोखुनी धरे दृढनिश्चय तो मनी करुनी, तोडी त्या नाळेला ।। ५ ।। 
 उंच उंच तो जातच राही स्वानंदी मग