Skip to main content

कथा

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: ईश्वराचा शोधं

लेखक भृशुंडी यांनी सोमवार, 30/01/2017 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
a "आम्हाला ईश्वराचं सत्यस्वरूप शोधायचेय" एका शिष्याने नम्रतेने प्रस्तावना केली. "ह्म्म्म."- घोसातले एक द्राक्ष गुरूदेवमुखी विलीन झाले. "आपले मार्गदर्शन-" काही क्षण विमर्शात लोप पावले. "हे काय आहे?", एका ललनेचे अनावृतावस्थेतले उन्मादक चित्र पुढे ठेवून गुरूदेवांनी विचारणा केली. "काम", पट्टशिष्याचा उत्स्फूर्त सूर आला. "पाप", दुसर्‍या शिष्याने डोळे मिटले. "मोह", तिसर्‍याने नेत्र विस्फारले. "ज्ञान", पुटपुटत चौथ्याने काही मापे टिपून घेतली. "सौंदर्य"

शतशब्दकथा स्पर्धा-२०१७: ती आणि द्वारकाधीश

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 30/01/2017 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
aa तो निघाला आणि 'ती' वेडीपीशी झाली. तिने आतुर नजरेने त्याच्या नेत्रात स्वतःला गुंतवले. पण तो बधला नाही; तेव्हा मात्र ती शांतपणे म्हणाली,"जातोस? जा! तुला अडवणार नाही. हे अर्थहीन... प्राणहीन....जीवन तुझ्या आठवणींवर कंठेन आणि तुझ्यातच विलीन होईन. मात्र तुला मी आठवेन..मग मात्र......" तिने त्याच्याकडे पाठ केली. यमुनेच्या काळ्या मऊशार वाळूतून तिची सुकुमार पावलं आपली ओळख उमटवत राहिली...... द्वारका वसली आणि तो विसावला.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: नवी सुरुवात

लेखक आंबट गोड यांनी सोमवार, 30/01/2017 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
aaa कडाडकाड.!! आवाज ऐकून गाढ झोपेत असलेली रेश्मा उठून बसली...अंधारात तिला काय घडते आहे ते कळेचना. भूकंप!! सगळीकडे माती , कानठळ्या बसविणारे आवाज, सैरावैरा धावणारी माणसे यात तिचा आक्रोश हरवून गेला. घरातले सगळे ढिगार्‍याखाली जणू लुप्त झाले होते. आक्रोशत ती काठमांडूच्या रस्त्यांवरुन चालत राहिली. अचानक तिला एका ढिगार्‍याखालून बारीक रडण्याचा आवाज ऐकू आला. क्षीणपणे कुणीतरी मदतीची याचना करीत होतं.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: वर्तुळाचा एक कोन

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 30/01/2017 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
a "चवचाल आहे झालं" श्यामल काकू करवादल्या "खरेच सासरच्यांनी बळजबरी केली की हीच गेली होती मागे राम जाणे" शांता मावशी उद्गारली "देहाची भूक चुकत नाही श्यामल. तरुण आहे आपली कुसुम अजुन" दुर्गा आज्जी मुलीला समजावु लागल्या. "भोळी आहे गं कुसुम" वसंतराव कळवळुन म्हणाले. "भोळी कसली?

पुन्हा श्रावण आला

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 29/01/2017 03:30 या दिवशी प्रकाशित केले.
चुलीत निखारा जळत राहतो. जवारीच्या ताटाचं शेंडं जळावं तसं. उलथलेला तवा हसत राहतो. तो खूप मजेदार हसतो. घराच्या सांधीवाश्यात दडलेलं दारिद्र्य तो शोधून काढतो. हा अपशकून आहे. बिऱ्हाडं येतात, जातात, जगतात, भुईला टेकतात. नव्या पायवाटांची गणितं मात्र मागे सोडतात. हे जंगल नाही. हे माजलेलं कुसळ आहे. हिरवा वारा इथेही वाहतो. वैशाखात इथं मृगजळांची भरमार असते. रौद्र भीषण उन्हाळ्यात जीव करपून जातो. कुण्या डोंगराच्या गावात गेलेला नवरदेव, नवरी घेऊन परत आला. चार दिवस नवरी नांदली आणि यानं हाकलून लावली. रत्नाबाईनं आयुष्यभर जीवाला जाच लावून घेतला. मग ती मरुन गेली बिचारी. वावटळींसारख्या वावटळी उठतात.

द मॉडेल मिलियनर -ऑस्कर वाईल्ड (भावानुवाद)

लेखक वहाटूळ यांनी शनिवार, 28/01/2017 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीमंतीशिवाय सौंदर्याला किंमत नाही. प्रेम करणं हा श्रीमंतांचा प्रांत आहे, ते बेकारांचं कुरण नव्हे. गरिबाने नेहमी वास्तववादी आणि निर्मोही असावं. कमाई गलेलठ्ठ असण्याऐवजी आधी नियमित असणं आवश्यक. आधुनिक आयुष्यातली ही महान सत्ये ह्युई अर्स्किनला कधीही कळली नाहीत; बिच्चारा ह्युई! तात्विक पातळीवर विचार केला तर ह्युई हा काही फारसा महत्वाचा माणूस होता असं प्रामाणिकपणे आपल्याला म्हणता येणार नाही. तो कधीही काही ‘उच्च’ सोडा पण वाह्यात असंही काही बोलला नसावा. पण शेवटी तो एक नीट कापलेल्या तपकिरी केसांचा, अचूक शरीरसौष्ठव आणि भुरे डोळे असलेला अतिशय देखणा माणूस होता हे मात्र तितकंच खरं.

ब्रम्मा

लेखक पराग देशमुख यांनी शनिवार, 28/01/2017 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
निराकार, निर्विकार, अनासक्त आणि एकूणच सांगायचं झाल तर अनामिक असा मी एक नदीपात्रातील गोटा. तसा मुळात मी घाटी पण सह्याद्री, मंद्राद्री, निलगिरी नि सातपुडा वगैरे कौतुक आमच्या नशिबात अपवादानेच सापडतील. महाराष्ट्राच्या हृदयस्थानी असणाऱ्या मराठवाड्याच्या मध्यबिंदूशी माझी मुळ अजून घट्ट रुजलेली आहेत.

म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....

लेखक पराग देशमुख यांनी शुक्रवार, 27/01/2017 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
अजून एक काव्यकथा घेऊन आलोय, अजून एक हृदयव्यथा घेऊन आलोय. वेदना जुनीच..., पावसामुळे पुन्हा फुललेली, कॉफीच्या वादळासह, पुन्हा मनात सललेली. अंगणभर पसरलेला पाऊस, कुंपणाशी गुंतलेला गारवा, उंच भिंतीच्या आडोशाला, गारठलेला पारवा | गारठलेला मी, अन् थिजलेल्या स्मृती, जुन्या जखमा पालवण्याच्या, पावसाच्या या जुन्याच रिती || म्हणून हा पाऊस मला आवडत नाही..... रेडिओवर लागलेला मल्हार, नि स्वयंपाकघरातील खमंग वास ऊबदार शालीत लपेटलेला मी, पण आठवणींच्या हुद्क्यांनी विखुरलेला श्वास | निरवलेले डोळे, अन् मनात पावसाच्या सरींचे मंथन भिजण्याच्या भीतीने धावणारी पावले, अन् हळूच किणकिणणारी पैंजण|| त्या दिवशी सार आभा

हरीभाऊंच कोडं

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 26/01/2017 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
"लका तुला सांगती, हीतं झिट यीती काम करायला. आन ही म्हातारं कदी शेतावर सोड घरीबी येत न्हाई. आता ह्या येवढ्या उनात येकल्या बायनं किती करायचं?" सुमात्त्यानं चिरकुटात भाकऱ्या बांधल्या. कांद्याची हिरवीगार पात पिशवीत टाकत म्हणाली. "आन ही आवदसा बघावं तवा उंबऱ्यात बसल्याली आसती." हरीभाऊनं जरा घाबऱ्यानं भाईर बघितलं. राधाक्काला काही ऐकू गेलं तर उगाच पराचा कावळा नको. "मी काय भीती काय तिला. वाटुळं केलंय भवानीनं माझं" "आसं, आसं म्हणू नगा सुमात्त्या. संसार मनलं की चालायचंच. हितं कुणाला सुख म्हनून लागून राहिलंय सांगा बरं?" "तिला लागलंय बग. दारात बसून नुसती नटती आयघाली.

एक निर्णय (भाग 6) शेवटचा

लेखक ज्योति अळवणी यांनी गुरुवार, 26/01/2017 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
एक निर्णय भाग 1 एक निर्णय भाग 2 एक निर्णय भाग 3 एक निर्णय भाग 4 एक निर्णय भाग 5 भाग ६ एकदिवस ती नेहमीप्रमाणे घरी आली, पण घर बंद होते. डायनिंग टेबलावर परत एकदा चिठ्ठी होती... 'उशीर होईल.