कथा
रात्र…
दामूचं कायतरी बिनसलंय हे तिनं तो संध्याकाळी घरी आला तेंव्हाच ओळखलं होतं. एक दोनदा तिनं तसं विचारायचा प्रयत्नही केला पण दामूने दाद दिली नाही. जेवताना दामूचं लक्ष नव्हतं. आज कित्येक दिवसांनी तो पोरांवर डाफरला ही नव्हता. रात्री विचारू असं म्हणून ती शांतपणे तिची कामं करत होती. अर्थात रात्री दामू तिला विचारायला वेळ कधीच देत नव्हता. अश्या कितीतरी गोष्टही तिने रात्री बोलू,विचारू म्हणून मनातच दाबून ठेवल्या होत्या. रात्री दामू आपला 'कार्यभाग' साधेपर्यंत ती मनातल्या मनातच त्याच्याशी कितीतरी बोलून जायची. तोंड उघडलं तर आवाजाने पोरं उठतील अशी भीती तिला वाटायची.
मोबियस प्रकरणे भाग -२ प्रकरणे ११-१२
त्याचे डोकेच काम करेनासे झाले होते. त्यातच पडलेल्या स्वप्नाने ते पुरते भंजाळून गेले. स्वप्नात तो एका खराट्याच्या काडीवर एका रस्त्यावरुन उडत चालला होता. एखादी स्कुटर चालवावी तशी. पण जशी त्याची नजर रस्त्यावरुन ढळली तसा तो धाडकन जमिनीवर आला. त्याच्या जवळचा रस्ता लाल होता तर दूरवर तो हिरव्या रंगाचा वाटत होता. त्या रंगसंगतीने तो गोंधळून गेला.
मोबियस प्रकरणे ९-१०
सावलीतून एकदम उन्हात आल्यावर तो पायापासून वर वितळू लागल्याचा त्याला भास झाला. पण त्याच्या गाभ्यामधे बर्फाची एखादी लादी असल्यासारखा तो अजून पूर्ण वितळत नव्हता. त्याला एकंदरीत परिस्थितीची लाज वाटली. एक जनावरासारखी बाई, जी फक्त आजचा विचार करतेय, कालचा नाही उद्याचा नाही.जणू काही तिच्या ह्रदयाच्या जागी फक्त एक बिंदू आहे.
मोबियस प्रकरणे ७-८
ती पूर्णनग्नावस्थेत झोपली होती. डोळ्यातील पाण्यामुळे तिची ती आकृती त्याला अंधुकशी दिसत होती. ती एका चटईवर पाठीवर झोपली होती. फक्त डोके सोडून तिचे सर्व शरीर पूर्णपणे नग्न होते. तिने तिचा डावा हात तिच्या पोटावर ठेवला होता. जे अवयव सर्वसाधारणत: झाकले जातात ते पूर्णपणे नग्न होते आणि जे उघडे टाकले जातात ते झाकलेले होते.
आस
पावसाळ्या रात्री, अंधारात त्या घरात कधीपासून त्या दोघांत नुसती झटापट सुरु होती. अचानक विजेच्या लखलखाटात त्याच्या हातातली त्याने उगारलेली लोखंडाची सळई चमकली आणि पुढच्याच क्षणाला त्या बंगल्यात एक आर्त किंचाळी घुमली.
आता सगळं शांत झालं होतं. त्याच्या हातातली सळई जमिनीवर गळुन पडली. तो बधीरपणे तिच्या निश्चल कलेवराकडे पहात होता. बाहेर पावसाची रिपरिप सुरु होती. तो मटकन गुडघ्यावर बसला आणि तिच्याकडे पहात रडायला लागला.
******************************************************************************
डिलाईड रोडच्या चाळीत चिराग आणि निलाक्षी लगबगीने जीना चढत होते. आज त्यांना ज़रा जास्तच उशीर झाला होता.
उल्फत 2
एक
_______________________________________________________________
"तुझ्यासारखा भंगार माणूस एमबीए कसा करु शकतो?" हा प्रश्न होता भालचंद्रला. नेहमीच ऐकू येणारा. यावेळेस तुकारामने विचारला. त्याचं धाडस भलतंच वाढलेलं दिसतंय.
मी अर्धवट झोपेत होतो. आणि या दोघांचीही कुरबूर माझ्या कानावर पडत होती. मी उठून घड्याळ बघितले. अकरा वाजले होते. ते नेहमीच वाजतात. आजही वाजले.
"आणि तू डिप्लोमा करुन लय उपाxली का?" भालचंद्र बहुतेक चिडला होता. त्याच्या बोलण्यात एकप्रकारचा दम होता.
'uthlas ki nahi?' हा एसएमेस होता. माझ्यासाठी.
शतशब्दकथा स्पर्धा २०१७: अडनड
आये , सरकारनी हजार पाचशेच्या नोटा बंद केल्यात.नाय बदलल्यातं त्याला किंमत ऱ्हाणार नाय", किसना म्हातारीला म्हणाला.
"माह्याकं काह्याचा पैका." म्हातारी फणकारली.
"हां ! माजघरात ठिवलेत गठुड्यात. पण अडनडीला म्हून रुपया द्याची वासना झाली नाही" सून आतून कडाडली.
"तू माह्या पैशावंच टपून बस. औशादपाण्याला कवा धीला मोकळ्या मनानी पैका?शतशब्दकथा स्पर्धा २०१७: ब्रेन स्टॉर्मिंग
फॆकॆन्जी कन्सल्टंट्च्या थंडगार कचॆरीतील पॆस कॉन्फरन्स हॉलमध्यॆ टॆबलाभॊवती कॊंडाळॆ.
एक नंबरवरुन पदच्युत झाल्यामुळॆ दुखावलॆल्या आणि हादरलॆल्या एमजी फूड्स्च्या अपयशाचा पंचनामा आणि गर्तॆतून बाहॆर पडायची उपाययॊजना यावर ब्रॆन स्टॉर्मिंग रंगात.
मार्कॆट मॅपींग
व्हाइट स्पॆस ग्रॆ स्पॆस
सॆल्स निंजा
पीआयपी
टार्गॆट टिअर टू
सप्लाय चॆन
कॅश वॉर रूम
रॅडिकल चॆंजॆस
पी एम एस
आर ऍण्ड डी
प्लांट अपग्रॆड
बॊल्ड अॅप्रॊच,....
दरवाजा उघडला, मार्लबोरोचा दर्प आणि सी ई
मिसळपाव