हरीभाऊंच कोडं
"लका तुला सांगती, हीतं झिट यीती काम करायला. आन ही म्हातारं कदी शेतावर सोड घरीबी येत न्हाई. आता ह्या येवढ्या उनात येकल्या बायनं किती करायचं?"
सुमात्त्यानं चिरकुटात भाकऱ्या बांधल्या. कांद्याची हिरवीगार पात पिशवीत टाकत म्हणाली. "आन ही आवदसा बघावं तवा उंबऱ्यात बसल्याली आसती."
हरीभाऊनं जरा घाबऱ्यानं भाईर बघितलं. राधाक्काला काही ऐकू गेलं तर उगाच पराचा कावळा नको.
"मी काय भीती काय तिला. वाटुळं केलंय भवानीनं माझं"
"आसं, आसं म्हणू नगा सुमात्त्या. संसार मनलं की चालायचंच. हितं कुणाला सुख म्हनून लागून राहिलंय सांगा बरं?"
"तिला लागलंय बग. दारात बसून नुसती नटती आयघाली.
मिसळपाव