एक निर्णय (भाग 5)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
25 Jan 2017 - 9:46 am

एक निर्णय भाग 1

एक निर्णय भाग 2

एक निर्णय भाग 3

एक निर्णय भाग 4

भाग ५

त्या संध्याकाळनंतर मीनाक्षी खूप डिस्टर्ब झाली. आपल्या करियरमुळे आपण आपल्या संसाराला फारसा वेळ देत नाही आहोत हे तिला समजत होत... पण हे सत्य तिला स्विकारता येत नव्हतं. असाच एक एक दिवस जात होता.

एकदिवस प्रशांत संध्याकाळी आठ वाजताच घरी आला. पाहतो तर मीनाक्षीपण घरीच होती. तिला बघुन एकदम खुश झाला तो. दोघांच जेवण आटपल आणि दोघे गॅलरीमधे येऊन बसले. घराला गॅलरी असावी हा प्रशांतचाच आग्रह होता. पण आत्ता अस मोकळेपणी आकाशाकडे बघत असताना मीनाक्षीला देखील त्याचा आग्रह योग्यच होता अस वाटल. कारण तिथे प्रशांत बरोबर बसून तिला खूप बर वाटत होत.

"मिनु..." प्रशांतने हलकेच तंद्री लागलेल्या मीनाक्षीला हाक मारली.

"हम्.."

"डिस्टर्ब आहेस?" त्याने हलकेच तिचा हात हातात घेत विचारलं.

"नाही रे.. का?"

"असच. तू अशी इतक्या लवकर घरी येत नाहीस. चुकून आलिस तरी अशी गॅलरी मधे येण्यापक्षा एखाद्या कॉम्लीकेटेड केस चा अभ्यास करत बसतेस. म्हणून विचारल." प्रशांत तिच्याकडे बघत म्हणाला.

"अरे... आज लवकर आटपल म्हणून आले. इतकेच. रोज नाही ह येऊ शकणार." तिने त्याच्याकडे बघत आपला हात सोडवून घेतला आणि हसत म्हंटल. त्याच्या ओलावलेल्या भावूक आवाजामुळे ती उगाच सावध झाल्यासारखी झाली होती.

"मिनु एक विचारू?" प्रशांतने तिच्याजवळ सरकत म्हंटल. तिच सावरून बसण त्याच्या लक्षात आलं नव्हत.

"अरे अस विचारतोस काय? बोल न राजा..." मिनाक्षीने त्याचा हात धरत म्हंटल.

"मिनु आता सगळच् कस छान चालु आहे. We r very well settled too. तुला नाही का अस वाटत?" प्रशांत म्हणाला.

"अरे छान तर कायमच चालु होत आपल. या आधी तरी कधी कुठे प्रॉब्लम आला आहे का?" मुद्दाम विषय बदलायचा प्रयत्न करत मिनाक्षी म्हणाली. ती बेसावध असताना जणुकाही प्रशांतने तिला खिंडीत पकडले असल्याचा फील आला. "चल... झोपुया. कधी नव्हे ते लवकर झोपता येणार आहे आज." अस हसत म्हणत ती उठायला लागली.

प्रशांतने तिचा हात धरून तिला परत बसवले. "मिनु किती दिवस अस टाळणार आहेस मला? तू हुशार आहेस. आतापर्यंत तुला माझ्या मनातले प्रश्न माझ्या डोळ्यातून दिसले नाहीत का?" त्याने अगदी मनापासून तिच्या नजरेत नजर अड़कवत विचारले.

"काय म्हणतो आहेस तू प्रशांत? आपण घरात आहोत. कसले नाटकातले डायलॉग्स मारतो आहेस..." मिनाक्षी उठायचा प्रयत्न करत तुटक आवाजात म्हणाली.

प्रशांत आत खोल कुठेतरी दुखावला. पण आज स्पष्ट बोलायचच् अस त्याने ठरवले होत. तिला समोर बसवत त्याने स्पष्ट शब्दात तिला विचारले.."मिनु तुला स्पष्ट हव आहे न तर अगदी स्पष्ट शब्दात विचारतो.... मला सांग आता आपण बाळाचा चान्स कधी घ्यायचा? आपण आता तिशीला आलो. सगळ छान आहे. मग काय हरकत आहे?"

"प्रशांत मी अजुन याचा विचार नाही केला." मीनाक्षी शांतपणे म्हणाली.

"मग आता कर. प्लीज... माझ्यासाठी... आपल्यासाठी... मिनु अग शिक्षण... करियर... याच्यापालिकडे देखिल आयुष्य आहे ग. अस काय करतेस? तुला नाही का वाटत आपल बाळ असाव? अग तू स्वतः गायनकोलॉजिस्ट आहेस न ग?" प्रशांत काकुळतीला येऊन म्हणाला.

"प्रशांत मी गायनॅक आहे म्हणूनच आई होण्याचा विचार सध्यातरी माझ्या मनात नाही. तुला हे अस काय सुचत ते मला समजत नाही. तुला हव ते शिक्षण आणि उत्तम करियर सहज मिळाल आहे; म्हणून तुला याच्या पालिकडच आयुष्य वगैरे दिसत आहे. ज्याना हुशारी असूनही काही मिळत नाही त्यांना विचार याच महत्व." मीनाक्षीच्या या वक्तव्यने मात्र प्रशांतला पुरत दुखावल.

त्याने मान खाली घातली आणि शांतपणे म्हणाला,"खर आहे तुझ; ज्याना हे सहज मिळत नाही त्यांना यासर्वाच खुप अप्रूप असेल. अगदी मान्य.पण मिनु तुला आणि मला देवाच्या दयेने सगळच कस सहज मिळाल आहे. मग आपण का नाही संसाराचा मुला-बाळांचा विचार करायचा?"

आता मात्र मिनाक्षीने प्रशांतला स्पष्टपणे सांगितल... "प्रशांत हे बघ... मला मुल नको आहे... निदान आत्ता... अजून काही वर्ष तरी. मला माझ काम अत्यंत प्रिय आहे. तेच माझ मुल आहे अस समज. त्यामुळे मी अजुन पुढचा विचार नाही केला."

अस म्हणून ती उठली आणि जाऊन बेड वर आडवी झाली. प्रशांत तिच्या या कोरडया उत्तराने खूप खूप दुखावला गेला. तिला संसारात... मुल होण्यात.... इंटरेस्ट नाही आहे हे त्याच्या लक्षात आल. त्याला मात्र एक छानस कौटुंबिक आयुष्य हव होत. मीनाक्षी आत जाऊन झोपली तरी तो तसाच तिथेच विचार करत बसून राहिला.

त्या दिवसानंतर दोघांमधे एक तणाव निर्माण झाला. दोघेही एकमेकांना टाळायला लागले. दोघानीही एकमेकांशी अबोला धरला. असेच अजुन काही दिवस गेले.

मिनाक्षीने स्वतःला अजुनच गाढुन घेतले कामात. तिला खूपच उशीर होऊ लागला घरी यायला. ती घरी यायच्या वेळी प्रशांत जेऊन गॅलरीमधे काहीतरी लिहित किंवा वाचत बसलेला असायचा. त्यांच्यात एकूणच संवाद नसल्याने ती तिच उरकुन झोपुन जायची. तो कधी झोपायचा... सध्या काय करतो आहे... याचा तिला काहीच पत्ता नव्हता. असेच काही दिवास गेले. प्रशांतने हॉस्पिटलमधून सुट्टी घेतली होती. त्याने स्वतःहून मीनाक्षीला ते सांगितल नव्हत. पण मात्र त्याने पंधरा दिवसांची सुट्टी घेतली आहे हे तिला त्याच्या हॉस्पिटल मधून समजल होत. तिने त्याविषयीही त्याला काहीच विचारल नव्हत. कारण जर त्याने परत भाऊक होत संसार आणि मुल होण्याबद्धलचा विषय काढला असता तर या वेळी परत काय उत्तर द्यायचे असा तिला प्रश्न पडला होता.

क्रमश:

कथा

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

25 Jan 2017 - 11:01 am | संजय पाटिल

थोडे मोठ्ठे भाग केलेत तर बरं वाटेल.

छान लिहिताय. वाचतेय. पुभाप्र.

ज्योति अळवणी's picture

25 Jan 2017 - 11:57 am | ज्योति अळवणी

पुढील भागात कथा संपते आहे. जर दोन्ही भाग एकत्र केले असते तर ते खूप मोठे झाले असते आणि योग्य ठिकाणी थांबले तरच पुढच्या कथेचा योग्य परिणाम होईल असे वाटले म्हणून हा भाग थोडा लहान केला आहे.

मराठी कथालेखक's picture

25 Jan 2017 - 12:10 pm | मराठी कथालेखक

"चाईल्डफ्री लाईफस्टाईल" या विषयाला स्पर्श करणारी कथा दिसतेय... छान.. हा विषय आता हळू हळू समाजात महत्वाचा होत जाणार आहेच

पद्मावति's picture

25 Jan 2017 - 12:25 pm | पद्मावति

छान रंगतेय कथा. पु.भा.प्र.

यशोधरा's picture

25 Jan 2017 - 12:41 pm | यशोधरा

वाचतेय..

पैसा's picture

25 Jan 2017 - 6:30 pm | पैसा

छान लिहिताय

रातराणी's picture

25 Jan 2017 - 11:23 pm | रातराणी

पुभालटा!