Skip to main content

कथा

बोहनी...

लेखक चिनार यांनी मंगळवार, 17/01/2017 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
नंद्या सकाळपासून खुशीत होता. आजपासून त्याला नवीन काम मिळालं होतं. राजाभाऊंकडून एक रिक्षा त्याने भाड्याने चालवायला घेतली होती. नंद्या तसा मेहनती,अंगापिंडाने मजबूत गडी. आजवर कधी हमाल,कधी बांधकामावरचा मजूर, कधी रंगरंगोटी कामगार असे बरेच कामं त्याने केले होते. पण महिन्याभरापासून नंद्या घरीच होता. बांधकामावर मिस्त्रीशी झालेल्या मारामारीनंतर नंद्या दहा-बारा दिवस जेलमध्ये होता. तिथून सुटल्यावर त्याला काहीच कामं मिळालं नाही. बायको चार घरी धुणीभांडी करायची म्हणून जेमतेम निभत होतं. नंद्या खिन्न मनाने घरात स्वतःला दोष देत बसायचा.

अभी ची तनु

लेखक अभी ची तनु यांनी मंगळवार, 17/01/2017 06:58 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ ( अभी गावाकडे ) आज सकाळ पासुनच जाधवांच्या घरी धावपळ सुरु होती . कारण जाधवांचा एकुलता एक मुलगा अभिमन्यु उर्फ (अभी) आज घरी येत होता.

दक्षिण घळ भाग 7 (शेवटचा)

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 16/01/2017 00:53 या दिवशी प्रकाशित केले.

दक्षिण घळ भाग 6

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 15/01/2017 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण घळ भाग 1 दक्षिण घळ भाग 2 दक्षिण घळ भाग 3 दक्षिण घळ भाग 4 दक्षिण घळ भाग 5 दक्षिण घळ भाग ६ "अहो... मी इथे अडकून पडले आहे. कोणी मदतीला नाही आहे. मला इथून बाहेर पडायचे आहे पण रस्ताच माहित नाही.

दक्षिण घळ भाग 5

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 13/01/2017 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण घळ भाग 1 दक्षिण घळ भाग 2 दक्षिण घळ भाग 3 दक्षिण घळ भाग 4 दक्षिण घळ भाग ५ अशीच काही वर्षे निघून गेली. आणि एकदिवस अचानक यशवंता परत गावाकडे परतला होता. परत आलेला यशवंता चांगलाच तरणा बाड गडी झाला होता. गावात आल्यावर त्याने गावच्या मोठ्यांची भेट घेतली.

सुक्ष्म गीतकथा: सुक्ष्मकथांचा मजेदार उपप्रकार

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शुक्रवार, 13/01/2017 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
एक इनंती: आधी २० सुक्ष्मकथा-१ हा दुवा वाचावा. मग पुढे धकावं. सुक्ष्मकथेत अजून काय मजा आणता येईल याचा विचार करतांना एक नवीन उपप्रकार सापडला (मुळात ही कल्पना शैलेंद्र शिर्के यांची. कल्पनाविस्तार अन कथा मात्र माझ्या) संकल्पना अगदी सोप्पीये- कुठल्याही गाण्याच्या धृवपदाची पहिली ओळ (किंवा दोन्ही ओळी) घ्यायची, दुसऱ्या ओळीत असे शब्द घालायचे की गाण्याचा अर्थ पुर्ण बदलून जाईल. शिवाय एक वेगळीच नवीन सुक्ष्मकथा तयार होईल. उदा चंदनाच्या पाटावर, सोन्याच्या ताटावर, मोत्याचा घास तुला भरविते... ही झाली मु़ळ गाण्यातली पहिली ओळ.

लॉलीपॉप - २

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 13/01/2017 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
लॉलीपॉप - १ दुसऱ्याच दिवशी माझ्या डेस्कवर एक जार स्थानापन्न झाला. रंगीबेरंगी लॉलीपॉपने भरलेला. त्यानंतरचा पूर्ण आठवडा मी अद्विकाची फाईल पुन्हा पुन्हा वाचली. न जाणो एखादा दुवा निसटला असेल तर तो लक्षात येईल या आशेने. आदू येणार होती त्यादिवशी मी आठवणीने दुकानातून फुलं आणली. ती आधी बसली होती, त्या खुर्चीतून दिसतील अशा जागी एका कपाटावर फुलदाणीमध्ये ठेवली. यावेळेस मुद्दामचं खिडकीचे पडदे उघडले. कृत्रिम प्रकाश शक्य तेवढा कमी केला. रूममध्ये काय केल्याने एका चार वर्षांच्या मुलीला छान वाटेल तसे बदल केले.