शेवटची प्रेमकथा
सृष्टीच्या अंताच्या वेळची एक अनोखी प्रेमकथा.
प्रकार: अदभुतिका ( फॅंटसी)
अमेरिका व कॅनडाच्या सरहद्दीवरील एखादी रेड इंडियन वस्ती. रात्रीची वेळ, काठ्यांच्या तंबूंची कापडे मंद हवेत हलताएत... शेकोटीसमोर मुले व त्यांचे मिशोमिस (आजोबा) बसले आहेत. मुलांना गोष्ट सांगेन हे आधीच कबूल केले आहे. आकाशात तारे, चांदण्या चमचम करत आहेत व खाली शेकोटीवर ज्वाळांचा खेळ...
मिशोमिस सुरु करतो...
ऐका रे मुलांनोऽऽऽ
चार शिकारी भाऊ होते.