Skip to main content

कथा

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: भेट समुद्रावरची

लेखक अंतु बर्वा यांनी शुक्रवार, 03/02/2017 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
aa खडकापाशी तो उदास बसला होता. इथेच ती महिन्याभरापुर्वी भेटली होती. तीनं जग पहिलेल नव्हतं पण गप्पांना अंत नव्हता, तासनतास बोलायचे दोघं. आमच्याकडे असं तुमच्याकडे कसं? प्रश्नांवर प्रश्न. तो म्हणायचा, चल माझ्याबरोबर. माझं जग आवडेल तुला. शेवटी कुणाला कळु द्यायचं नाही या अटीवर राजी झाली. पण गोष्टी लपत थोडीच असतात? कळलच शेवटी जगाला आणि तिलाही कळलं, सर्वच माणसं त्याच्यासारखी चांगली नसतात. असा परिकथेतला प्रकार लांबुनच पाहिल तो माणुस कसला?

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: अपुर्ण इच्छा

लेखक वरुण मोहिते यांनी शुक्रवार, 03/02/2017 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaa आज जरा खुशीतच होतो.अनेक वर्षांनी माझी इच्छा पूर्ण होईल असे वाटत होते.माझ्या देशात नोटबंदी जाहीर झाली तेव्हापासून एकच विचार होता ह्या नवीन नोटांवरून तरी माझी प्रतिमा हटवावी. जितकी मानहानी माझी हयातीत झाली नाही तितकी मानहानी ह्या नोटांवरील प्रतिमेने केली. माझी मूल्य पायदळी तुडवली. काय काय पाहावं लागलं मला त्याआडून. हे जास्त क्लेशकारक आहे . तसही मी राष्ट्रदोही गुन्हेगार आहे तुमच्यासाठी . मला ह्या जबाबदारीतून मुक्त करा .

पळवाट - भाग १

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 03/02/2017 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
"अजून कशी आली नाही हो? जरा कोपऱ्यापर्यंत येता का जाऊन?" झोप लागल्याचं उगीच नाटक करणाऱ्या तात्यांना काकूंनी जरा घाबरतच विचारलं. "आता काय लहान आहे का ती? तीच तीला कळायला नको?" डोळे उघडून काकूंकडे पाहण्याचे कष्टही न घेता तात्या करवादले. "तरुण पोर आहे, माझ्या जीवाला घोर लागलाय फोन आल्यापासून.. कुठं काही बरंवाईट झालं तर कुणाला विचारता?" काकूंनी रडवेल्या सुरात विनवणी केली पण तात्यांवर काही परिणाम झाला नाही. दार उघडून काकू अंगणात चुळबुळ करीत उभ्या राहिल्या.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: दृष्टीकोन

लेखक मिडास यांनी बुधवार, 01/02/2017 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
a नवी मुंबईचं खारघर रेल्वे स्टेशन. मी रात्री मुंबईला जाणाऱ्या गाडीची वाट बघत होतो. स्टेशन वर त्यामानाने गर्दी नव्हती. इतक्यात समोरच्या प्लॅटफ़ॉर्मवर एक तरुण एका दहा - बारा वर्षाच्या मुलाला मानगुटीला धरून चालताना दिसला. मुलाच्या एकंदर अवतारावरून तो भिकारी दिसत होता. तो तरुण त्या मुलाला रेल्वे पोलिसांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. आत जाऊन त्याने दरवाजा ओढून घेतला. क्षणभर मी चरकलो. तळव्यांना घाम फुटायला लागला.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: सागरकिनारे

लेखक रातराणी यांनी बुधवार, 01/02/2017 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
aa "अगं पण का? माझं काय चुकलंय?" "अरे तुझं नाही काहीच चुकलेलं, पण मी शब्द दिलाय त्याला.." "तुझ्यासाठी सगळ्यांनी सरप्राईज पार्टी अरेंज केलीये... आजतरी नको जाऊस..." "त्यांच्यासाठीच थांबले होते इतकी वर्ष, फक्त एक वाढदिवस मला माझ्या मनाप्रमाणे सेलिब्रेट करू दे..प्लीज" सागरकिनारे...

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: संवाद

लेखक तिमा यांनी बुधवार, 01/02/2017 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaa फोन वाजला. अरे, टीव्ही लावलास का ? मोदीनी तुमच्या कपाळात घातल्यात. तुझ्याकडचे लाखो रुपये आता कागद झाले कागद. पण तुला का एवढा आनंद होतोय ? वाईट रे! आता तुमची पूर्ण नाकेबंदी झालीये, हरामाचा पैसा कधी पचत नाही. बरं, बरं, बघू या. भक्त म्हणून हिणवतोस काय? आता कळेल त्याची ताकद! डिसेंबरचा शेवटचा आठवडा. काय, मग जाळल्या का नोटा ? मी मजेत आहे. तू किती वेळा लायनीत उभा राहिलास ? आम्ही मोजत नाही.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: ऑक्टोबर- मार्च

लेखक मराठी कथालेखक यांनी बुधवार, 01/02/2017 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaa ३० मार्च २०१७: हॉस्पिटलच्या स्पेशल वॉर्डमध्ये विशेष लगबग होती. अ‍ॅन्टी करप्शनच्या मोहिते साहेबांना घरी सोडण्यात येणार होतं. ऑक्टोबर महिन्यात जीवघेण्या अपघातानंतर ते कोमात होते ते काल शुद्धीवर आले. त्यांची अर्धशिक्षित बायको, आई आणि अ॑ठरा वर्षांचा मुलगा किशोर आनंदात होते. साहेबांच्या अपघातानंतर किशोरने मोठं होत घर सांभाळल होतं. काउंटरवर जाण्यापुर्वी रुममध्येच किशोर खिशातून पैसे काढून मोजू लागला. "हे काय आहे ?

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: पैसा पहावा खाउन

लेखक विनीत संखे यांनी बुधवार, 01/02/2017 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaa "खा खा पैसे ... लुबाडा आम्हाला", बाई भलतीच तोंडाला आली होती. मंत्रीमहोदय मात्र चैनीत बसले होते. कातडीचं लेदर झालं होतं. हिनं लाख दिले. दुसऱ्या बिल्डरने त्यादिवशीच आणखीन कोट्यानकोटी चारले. हुश्शार बाईने सुद्धा माणसं पेरली होती. मंत्री निघाले त्यांच्या गाडीतून पण तिच्या गाडीवानाने गाडी नेली थेट कबरस्तानात. मंत्रीसाहेबांनी पैसे देऊन पाहिलं, रडून पडून पाहिलं, राजीनामा देण्यास राजी झाले पण पठ्ठा बाईशी प्रामाणिक होता.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: वेट अ मिनिट!

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 01/02/2017 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
aaa "पूरा शहर खंडर हो चुका है. कई बिल्डिंगोंमे आग सुलग रही है. धुवा धुवासा है यहा. सब बरबाद हो गया जनाब.. ओव्हर" "हिम्मतसे काम लो. खूदा है अपना.. ओव्हर" "जनाब, शहरकी दक्षिणी हिस्सेमे हलचल नजर आ रही है. हुकूम करो..ओव्हर" "आगे बढो. मै बॅकअप ट्रूप भेज रहा हू.. ओव्हर" "ठिक सामने दो छोकरीया दिख रही है. चलती जा रही है रस्तेसे.. ओव्हर" "बचाओ उन्हे. कहिसे भी गोली आ सकती है.. कहीसे बंम्ब गिर सकता है.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: प्रवास

लेखक राघवेंद्र यांनी बुधवार, 01/02/2017 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
aa बाबा म्हणायचे, उत्तरेकडे हिम असतो. त्यांच्या तरुण वयात तिकडे काम करत. सध्या इथे ना हाताला काम, प्यायला साधे पाणीपण नाही. रोज जिवंत परत येऊ की नाही याची शाश्वती नाही. एक दिवस घरी न सांगता निघालो, मिळेल ते वाहन पकडून आणि पोहचलो समुद्रकिनारी. इथून एका मोठया जमावामध्ये सामील झालो. आणि सुरु झाला जीवघेणा प्रवास. एक जुनाट जहाजवर, ना खायला पदार्थ, ना प्यायला पाणी.