Skip to main content

कथा

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: धनुष्कोडी आणि मनकवडा

लेखक पलाश यांनी बुधवार, 08/02/2017 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
aa धनुष्कोडीचा नयनमनोहर समुद्रसंंगम आणि रामसेतूचंं दर्शन फार प्रसिद्ध. ते अनुभवण्यासाठी दोघेजण उत्साहात रामेश्वरला बसमध्ये बसले. बस थांंबली. समोर समुद्र आणि अफाट वाळू. त्या वाळूतून शेवटपर्यंंत नेण्यासाठी खास गाड्या उभ्या होत्या. अवाजवी भाव व अडवणूक खटकल्यानं त्या गाड्यांंनी जायला अजिबात मन होईना. दुसर्या बाजूला इथेपर्यंंत येऊनही धनुष्कोडी पहाण्याचंं नीलसुंंदर स्वप्न अपुरंं रहाणंं पण रुचेना.!! तिच्या बोलक्या चेहेर्यावर सगळंंसगळंं लिहिलेलंं होतंं.

शतशब्दकथा स्पर्धा: पाऊलखुणा

लेखक आनंदयात्री यांनी बुधवार, 08/02/2017 06:47 या दिवशी प्रकाशित केले.
aa तुझ्या पाऊलखुणा पुसू नयेत म्हणून त्या दिवशी त्याने भरती रोखून धरली होती म्हणाला. वाळू तुडवत मी तुझ्या मागे येईन आणि थांबवेन तुला, उद्या तू माझ्यावरचा राग विसरशील अन पुन्हा कातरवेळी आपण त्याला अशीच आजच्यासारखी सोबत द्यायला येऊन बसूत, या आशेने त्याने बराच वेळ वाट पहिली म्हणाला. एकदा तुझ्या पाऊलखुणांबरोबर चालत गेलेल्या माझ्या पाऊलखुणा पाहिल्या की मी निर्धास्तपणे पाटी पुन्हा कोरी करायला मोकळा असेही म्हणाला.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: नोटबंदीचा एक अर्थ असाही

लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 08/02/2017 06:40 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaa घरात तीन हजाराच्या आसपास कॅश असेल,खरेदीसाठी राजेश, तेजसकडे उधारी करता येईल. माझ्याकडे आणि हिच्याकडे कार्डस तर आहेतच, त्यावरचे पॉईंटस बघून घ्यायला हवेत. माझ्या मनातली आर्थिक गणिते अव्याहतपणे चालूच होती. "डॅडा" माझ्या छकूलीच्या आवाजाने मी एकदम भानावर आलो. "या नोटा कॅन्सल झाल्याने किती छान झालयं ना ? " नोटबंदीचा या छोट्याश्या मुलीवर कसा काय परिणाम झाला असेल?

मोबियस...प्रकरणे १-३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 07/02/2017 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
बघावी तिकडे वाळू! त्याच्या मनात विचार आला, ‘छे! ही वाहणारी वाळू काही जीवनासाठी आवश्यक आहे असे वाटत नाही. पण स्थिरता ही आयुष्यासाठी आवश्यकच आहे असेही नाही. जर सगळेच वाहत्या वाळूसारखे वाहत्या जीवनात सामिल झाले तर या जगात स्पर्धाच उरणार नाही.

अंगारा

लेखक शब्दानुज यांनी मंगळवार, 07/02/2017 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे मोहित, जरा सांभाळून. फाडतो का आता तो नकाशा ?" "तू गप रहा रे तेज्या. आज काहीही करुन फायनल करुन टाकू कुठ जायचं ते....हा.. हे बघ" नकाशात छत्तीसगड राज्यातील कुठल्या तरी गावावर मोहितने अखेरीस शिक्कामोर्बत केले. मी , मोहित आणि गजानन आम्ही तिघे लंगोटीयार. दरवेळेसच्या सुट्टीत एखादा अनोळखी गाव फिरुन येणे हा आमचा छंद. नेहमीचीच जगप्रसिदध ठिकाण पाहिण्यापेक्ष्ा वेगळं काहीतरी करावं म्हणून हा खटाटोप. "कुठल आहे रे गाव ?" इति गजानन. "महोज गाव आहे हे छत्तीसगडमधलं. बघू तिथे काय काय पहायला भेटतय ते. आणि आजच घरी सांगून ठेवा. परवा निघू आपण. मी जवळचं स्टेशन बघून टिकीटस काढून ठेवतो. हे घे तेज्या तुझा नकाशा.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: अनुत्तरित

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 03/02/2017 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
aa त्याचं विचित्र वागणं आता सगळ्यांनाच माहिती झालं होतं. दिवसभर समुद्रावर भटकणार्‍या मोहनला लोक एव्हाना वेडा म्हणायला लागले होते. एकटा मुरुगप्पाच रोज रात्री मोहनला आपल्या घरी घेऊन जाई, जेवायला घाली आणि मुलासारखं थोपटून झोपवी. मित्रत्वाच्या व्याख्येपलिकडे जाऊन तो मोहनला जपत होता; बायकोचा रोष ओढवूनही. एका अशाच संध्याकाळी मुरुगप्पा मोहनला शोधत किनाऱ्यावर आला. मोहन वाळूत घर बनवत होता.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: हे बंध रेशमाचे

लेखक बोलघेवडा यांनी शुक्रवार, 03/02/2017 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
aa "अरे नुसती मजा. तुला सांगतो. हि अशी...उंssच लाट यायची..." नातू ‘आ’ वासून ऐकतोय. “पाण्याची?” "मग!!! इथल्यासारखं नाही... शंख, शिंपले, खेकडे, मऊ, मऊ वाळू... अगदी मुबलक!!" "बर आता चला हं.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: लाटा

लेखक निओ यांनी शुक्रवार, 03/02/2017 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
aa एका तपानंतर आज ती भेटली. त्याच्याविषयीच्या प्रेमाबद्दल, जगाबद्दल भरभरून बोलली. रडली. तिच्या प्रेमसागराला पौर्णिमेचं भरतं आलं होतं. सर्व सीमा ओलांडणारं. तो सुन्न होऊन ऐकत राहिला. तिच्याविषयी आकर्षण असणाऱ्या भूतकाळात शिरला. तारुण्याच्या नकळत्या वळणावर त्यांची चूकामूक झाली होती. आज ती प्रेमाचा सागर असूनही त्याची तहान भागवू शकत नव्हती. सागर जवळ असूनही तो किनाऱ्यावरच्या वाळूसारखा कोरडा राहिला. तिने प्रयत्न सोडले नाहीत.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: पैलतीर

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 03/02/2017 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
aa “या वयात असली थेरं?" सुनेचे जळजळीत शब्द आठवून आजोबांना कससंच झालं. बायकोच्या माघारी इकडंतिकडं न बघता मुलाला एकट्यानं समर्थपणं वाढवलं या कौतुकावर, अभिमानावर एका क्षणात पाणी पडलं असं वाटून राहिलं. मुलानं त्यांना पंचाहत्तरीला कौतुकानं स्मार्टफोन दिला होता. नातवानं कसा वापरायचा शिकवला आणि त्यांच्यासाठी नवीन विश्वाचं दार उघडलं.

शतशब्दकथा स्पर्धा२०१७: हत्त्या

लेखक शब्दबम्बाळ यांनी शुक्रवार, 03/02/2017 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaaa "काय रे, आज चहा बदललास चक्क?" हॉटेलात आल्या आल्या पत्रकार अनिशने हसत आपल्या इन्स्पेक्टर मित्राला विचारले. "हम्म..." किंचित उदास स्वरात उत्तर आले "ऑल ओके?" "हो" तोच स्वर "ठीके, अरे परवाच्या त्या नवविवाहितेच्या हत्येच्या केसच काय झालं, काही प्रोग्रेस?" विषयाला हात घालत अनिश बोलला. "कबुली जबाब दिलाय तिच्या नवऱ्याने आजच" खिन्न नजरेने त्याच्याकडे पाहत इन्स्पेक्टर देसाई बोलले. "वाटलंच होत मला!