Skip to main content

कथा

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: कर हा करी धरिल्यावरी

लेखक नूतन यांनी शुक्रवार, 10/02/2017 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaaa पदवीधर झाल्यावर मॊठ्या हौसॆनॆ विपणन विषयात व्यवस्थापनशास्त्राची पदवी घॆतली. आता लठठ पगाराची नॊकरी चालुन यॆईल या भ्रमात हॊता. पण काही अर्ज नकारघंटा घॆऊन तर कधी याचंच पटलं नाही म्हणून, शॆवटी बॆकारीचा शिक्काच माथी आला. एका पहाटॆ ‘खॆड्याकडॆ चला’ असं कुणीतरी कानात मंत्रून गॆलं. बहरलॆली फुलशॆती बघुन मन तृप्त हॊतं खरं, पण आपलॆ हॆ काळॆ, दणकट हात या पलिकडॆ काहीच करु शकत नाहीत.

पळवाट - भाग २

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 10/02/2017 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
पळवाट - भाग १ बेडवर पडल्या पडल्या शरूनं इतका वेळ आणलेला खंबीरपणाचा उसना आव गळून पडला. झोपायला म्हणून गेलेलं कुणीही झोपलं नव्हतं. सगळेच भूतकाळाची वर्तमानाशी सांगड घालायचा प्रयत्न करत होते. पण असं झालेल्या चुका दुरुस्त करून पुन्हा मनमोकळं जगता येत असतं तर आणखी काय हवं जगायला? "काकू, आज मी जरा एका मैत्रिणीकडे जाऊन येणार आहे. दुपारपर्यंत येईन. माझी वाट बघू नको जेवायला." दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आवरता आवरता शरुनं काकूला सांगितलं. आपण घर सोडून आलोय या गोष्टीचं शरूच्या चेहऱ्यावर जराही वैषम्य दिसत नाही.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: देवाची काठी

लेखक स्मिताके यांनी शुक्रवार, 10/02/2017 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
aaa "हा पाहिलास फोटो? पेपरात छापला होता म्हणे.. आजी आणि तिची मैत्रीण." "आणि हे मागे काय ग आई? " " भूकंप झाला होता ना त्यावेळी...” "मग?" "तुझी आजी हिमतीची. तिच्या घरचं कोणीच वाचलं नाही. या मैत्रिणीच्या आईला विचारलं तिने, तुमच्या बरोबर राहू का, म्हणून. त्यांचं घर तरी कुठे वाचलं होतं? कष्ट उपसले आणि निभावलं कसं तरी. गावची शाळाही कोसळली होती, पण दोघी दूरच्या शाळेत चालत जात.” "आणि हा फोटो?

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: मैफल

लेखक सिरुसेरि यांनी शुक्रवार, 10/02/2017 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
a निळकंठबुवा बिदरकर ..संगीत क्षेत्रातील एक गुरुतुल्य व्यक्तीमत्व . बुवांचे नाव घेताच अनेक जाणकार गायक, वादक , रसिक श्रोते कानाची पाळी पकडत . एक निर्माता आपल्या शास्त्रीय संगीतावरील चित्रपटामध्ये बुवांनी गावे यासाठी इच्छुक होता . पण चित्रपटसंगीतातील बंधनांमुळे बुवा राजी नव्हते . अखेरीस आर्थीक गरजांमुळे ते तयार झाले .

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: आम्ही येतोय

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शुक्रवार, 10/02/2017 06:57 या दिवशी प्रकाशित केले.
a तो संदेश सर्वात आधी नासाच्या उपग्रहांनी पकडला. “आम्ही येतोय.” फक्त दोनच शब्द होते संदेशात. “आपण शांततेच्या मार्गाने बोलणी करू.” संयुक्त राष्ट्रसंघ “सर्व देशांनी आपापले क्षेपणास्त्र अवकाशाच्या दिशेने वळवावेत.” अमेरिका “जगाचा अंत जवळ आलाय.” व्हॅटिकन “ते आपले मित्र असावेत.” भारत “ही भारताची चाल.” पाकिस्तान काही दिवसांनी परत एक संदेश मिळाला- “लढायला तयार रहा.” यावेळचा संदेश पृथ्वीच्या अगदी जवळून आलेला. जगभरातलं सैन्य अन शस्त्रास्त्रं खडबडून

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: इमारत,संदर्भ चित्र: भग्न इमारत आणि दोन मुली

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 10/02/2017 06:54 या दिवशी प्रकाशित केले.
aaa "चल ना वं बिगी बिगी..उशीर होऊ राह्यला शाळेले" "मले त याचंच नव्हतं..भेव लागते मले..दोन-चार त पोट्ट्या असतेत तिथं.." "येतीन अजून पाय तू" "कोन म्हन्ते?" "माय सांगे..लय इनंत्या केल्यावर हे जागा देल्ली सरपंचानं..देत नौता सरपंच..पोरीले कायले शाळा पाहिजे म्हने?" "मंग?" मास्तरीन बायनी पिछा नाय सोडला..मंग द्याच लागली त्याले...

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: साथ

लेखक विअर्ड विक्स यांनी शुक्रवार, 10/02/2017 06:47 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaaa ती आमच्यातली नव्हती पण अल्पावधीतच मी तिचा झालो होतो.आमच्यातील नाते तिच्या पोटी नवा आकार घेत होते. मायभूमीहून तीला निरोप आला कि तिची माय आजारी आहे. माईला नि मायभूमीतील अनेक सैनिकांना तिच्या कुशल हातांची गरज होती. ३० जानेवारी - विमानतळावर भरलेल्या मनाने सोडलेला हात;काहीतरी चुकतंय असे सतत सांगत होता. ती नि मी हेच माझे विश्व होते, पण जग बदलत होते ! एका अध्यादेशाने तिचे परतीचे दोर कापले गेले होते. साथ सुटली होती.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: पाऊलखुणा?

लेखक बरखा यांनी शुक्रवार, 10/02/2017 06:42 या दिवशी प्रकाशित केले.
aa 'आज महीना होऊन गेला आमच्या भेटीला'. तिचा फोनही बंद आहे. तिच्या मर्जी शिवाय तिच्या घरी जायचे नाही अशी ताकीद आहे. काय करावे कळत नाहीये ? मी मात्र रोज ठरल्यावेळी ईथे येतो, समुद्रकिनारी तासन तास तिची वाट बघतो. आज अचानक ती आली! बराच वेळ काहीच बोलत न्हवती. मी फक्त तिच्याकडे बघत होतो. मन एकदम गत आठवणीत गेल.

उल्फत

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 09/02/2017 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ता काळोखाचा. मध्यरात्रीचा. रिकामा भयाण भेसूर. कानात इयरफोन. सुपरबास. पाठीवर सॅक आणि बोचरी थंडी. हे वातावरण किती गूढ आहे. मला नेहमी वाटायचं, एखाद्या झाडामागे एखादं भूत आपली वाट बघत थांबलं असेल तर.. पावले झपाझप. शक्यतो मी झाडाकडे बघतंच नाही. शहरातला हा भाग एखाद्या स्मशानासारखा शांत आहे. फार दूरवर उंच इमारती रात्रभर चकाकत राहतात. हा रस्ताही चकाकतोय. पण माणूस इथं औषधाला नाही. उड्डाणपुलाखालून जाणारा खुश्कीचा मार्ग मी नेहमी स्विकारतो. पण फक्त दिवसा. झोपडपट्टीतून जाऊन रेल्वेरुळ ओलांडायचा, मग छोट्याश्या पायवाटेवरुन झाडंझुडपे तुडवत बसस्टॉप गाठायचा.

मोबियस...प्रकरणे ४-५

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 08/02/2017 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
ही वाळू अशीच वर्षभर इकडे तिकडे हलत असते. हा प्रवाहच तिचा प्राण असतो. ती कधीच थांबत नाही. कुठेच! पाण्यात असो किंवा हवेत, ती आपली वहातच असते. सामान्य जीव वाळूत तग धरु शकत नाही. आणि हे जंतूंनाही लागू आहे...