Skip to main content

कथा

दक्षिण घळ भाग ४

लेखक ज्योति अळवणी यांनी गुरुवार, 12/01/2017 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण घळ भाग १ दक्षिण घळ भाग २ दक्षिण घळ भाग ३ दक्षिण घळ भाग ४ दाजींच्या मस्तकात तिडीक गेली . ते यशवंतावर धाऊन गेले. परंतु उतार वयातली त्यांची शक्ती आणि तारुण्यात पाय ठेवणाऱ्या यशवंताची शक्ती यात फरक तर होताच. त्यात बरोबर असलेल्या पोलिसांनी दाजीना धरले. दाजींचे डोळे आग ओकत होते. हात मोकळे असते तर एव्हाना त्यांनी यशवन्ताचा गळा दाबला असता, याची यशवंताला कल्पना आली.

सात खून माफ

लेखक जेपी यांनी गुरुवार, 12/01/2017 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
रेल्वे आपला भोंगा वाजवत फलाट २ वर आली.रात्रीची १० वाजायला आलते. फलाटावर उतरलो तसा फुलारी समोर आला,सलाम ठोकुन माझ्या हातातील बॅगला हात घातला. "राहु दे आतली सुटकेस घे." किडमीडा फुलारी सुटकेस उचलत माझ्या मागे ओढत येत राहीला. मला त्याची पर्वा नव्हती,मरु दे साला.! ** १० वर्ष नंतर पुन्हा स्वत:च्या गावात आलतो. १० वर्षापुर्वी सोडल त्या पेक्षा फार बदलत नव्हत. गाडीत बसताना ताईच्या घरचा पत्ता दिला.

लॉलीपॉप - १

लेखक रातराणी यांनी गुरुवार, 12/01/2017 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी थोडी लवकरच क्लिनिकमध्ये पोचले होते. कर्णिक सरांनी नेहमीप्रमाणे सर्वात आधी येऊन क्लिनिक उघडले होते. बाहेर पावसाची संततधार सुरु होती. सगळ्या वातावरणात एक वेगळीच मरगळ होती. माझ्या कन्सल्टिंग रूममध्ये जाऊन मी उगीच सर्व वस्तू जिथल्या तिथे आहेत की नाही ते पाहून घेतलं. एकवेळ खुर्चीत बसून बघायचीही इच्छा झाली पण मी तिला आवर घातला. एक काऊन्सलर म्हणून खुर्चीत बसायची, समुपदेशन करायची ही काही माझी पहिली वेळ नाही असं स्वतःला बजावलं. पण एकटीनं कुठलीही केस ऐकायची ही नक्कीच पहिलीच वेळ होती. याआधी प्रत्येक केसमध्ये कर्णिकसर किंवा देसाईसर असायचे सोबत. तसं विशेष कधी बोलावंच लागलं नव्हतं मला स्वतःला.

दक्षिण घळ भाग ३

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 11/01/2017 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण घळ भाग १ दक्षिण घळ भाग २ दक्षिण घळ भाग ३ आता उगवतीकडे आकाशाचा रंग बदलायला लागला होता. आप्पाला उशीर होत होता. पण विजयाला एकटे टाकून जाणे शक्य नव्हते. मग मात्र त्याने निर्णय घेतला आणि तो तिच्याजवळच थांबला. बाहेर उजाडत असताना विजया थोडीशी कण्हली आणि तिच्या त्या क्षीणशा कण्हण्याने देखील आप्पाच्या जीवात जीव आला. त्याने तिला बसती केली आणि हळू हळू करून थोड पाणी पाजल. तिने डोळे उघडले आणि आप्पाकडे बघितल. "मी आज मऊ भात आणला होता. पण तो आता गार झाला असेल.

दक्षिण घळ: भाग २

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 11/01/2017 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण घळ : भाग १ "म्हणजे नक्की काय बघणार आहेस तू आप्पा?" दाजींनी त्याला विचारल. "दाजी आपली दक्षिण वेसेकडची घळ आहे ना तिथल्या दरीत मी एक लहानसं खोपट केलं आहे. तसंही गावकरी त्याबाजूला जात नाहीत. उगाच तिथे भुताचा वावर आहे अस कधीतरी कोणीतरी पिकवून दिल आहे. त्याचा फायदा घेऊन मी तिथली जागा निवडली आहे. काल कोण कोण आलेत मला माहित नाही. कारण त्याची वर्दी मला नव्हती. पण तुम्ही काळजी करू नका. आपल्या गावात कोणालाही माझ्या या कामाची खबर नाही.

गैरसमज

लेखक रातराणी यांनी मंगळवार, 10/01/2017 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
गैरसमज होतात. कधीकधी खूप बोललो की आणि कधी खूप कमी बोललो म्हणून. आजकाल माझ्या स्वप्नातपण गैरसमज येतात. म्हणजे मी कुणाला काहीतरी बोलतो. मग समोरचा माणूस स्त्री असेल तर ढसाढसा रडायला लागते आणि पुरुष असेल तर करकचून भांडायला. मग काही वेळानी मी दिसतो. समजूत काढताना. मला तसं म्हणायचं नव्हतं, तुझी ऐकण्यात चूक झालीये, असं काही माझ्या मनात नव्हतं इत्यादी इत्यादी. कधी कधी उलटही होतं, म्हणजे स्त्री भांडायला लागते आणि पुरुष रडायला. पण प्रत्येक वेळेला समजूत मात्र मीच काढतो. कधी चुकूनही असं होत नाही की मी भांडतोय, रडतोय आणि समोरची पार्टी समजूत काढतेय. च्यायला आता पडू दे परत स्वप्न. नाहीच काढणार समजूत.

दक्षिण घळ - भाग १

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 09/01/2017 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ भाग १ गाव सोडून गेल्यापासून यशवंताला तीच ती स्वप्न सारखी पडत होती. परंतु जोवर फक्त स्वप्न होती तोवर ठीक होत. अलीकडे मात्र त्याच्या स्वप्नात त्याचा परागंदा झालेला मोठा भाऊ आप्पा सारखा येत होता. त्यामुळे यशवंता खूपच अस्वस्थ झाला होता. रोजच आयुष्य जगण त्याला अवघड झाल होत. म्हणूनच पडणाऱ्या स्वप्नाचा सोक्ष-मोक्ष लावण्यासाठी यशवंता गावाकडे परतला होता. गावात आल्यानंतर तो त्याच्या पूर्वीच्या मित्राकडे, कृष्णाकडे, गेला होता आणि कसतरी त्याने कृष्णाचं मन वळवल होत वेतोबाच्या देवळापर्यंत जायला. लोकांची नजर चुकवून ते दोघे तिथे गेले होते. "यस्वन्ता मी न्हाई येत तुझ्या संगती यापुढ.

दस दस की मॅच - उत्तरार्ध - कथा ( काल्पनीक )

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 08/01/2017 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
दस दस की मॅच - उत्तरार्ध - कथा ( काल्पनीक ) पहिल्या भागाची लिंक - सुरुवातीला मैदानातच पडलेला एक छोटा दगड घेउन ओली सुकी झाली . ती गबन्याच्या टिमने जिंकली . "आम्ही बॅटिंग करणार ..." सगळी एका सुरात ओरडली . त्यांच्या टीममधली पहिली दोघे फळकुटं फिरवत बॅटिंगला आली. गबन्या आणी बाकीची मंडळी बाजुच्याच एका कट्ट्यावर बुड टेकवुन बसली . आपला नंबर येईपर्यंत तिथे बसुन दुस-या टिमला नावं ठेवायची आणी आपल्या टिमला चीअर करायचं हा उद्योग सुरु झाला .

स्ट्रॅटेजी

लेखक चांदणे संदीप यांनी शनिवार, 07/01/2017 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
आठ - दहा दिवसांपूर्वी व्हाट्सॲपवर आंतरसोसायटी हापपिच क्रिकेट स्पर्धेच आवतान आल. आणि गेलं नाही तर आपल्या सोसायटीची काय इज्जत राहिल? हा प्रश्न प्रत्येक सोसायटीच्या क्रीडाप्रेमी, हौशी क्रीडापटू इ. लोकांना पडला. आणि बघता बघता स्ट्रॅटेजीजना सुरुवात झाली. आमच्या सोसायटीचे हौशी क्रीडापटू कसे मागे राहतील? फक्त क्रिकेटचेच खेळाडू संघात निवडायचे या महत्त्वाच्या स्ट्रॅटेजीपासून आम्ही सुरूवात केली. त्याचं शेवटच्या दिवसापर्यंत काय झालं विचारू नका! शेवटी मॅचच्या दिवशी कॅरम किंवा बुद्धिबळ खेळायला आलं तरी चालतंय ओ, तो पण खेळाडूच असतोय की!