मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रीडा

अटरली बटरली.....

बहुगुणी ·
अटरली बटरली..... मला खात्री आहे की वरचं शीर्षक वाचून संपता-संपताच तुम्ही नकळत मनात ते पूर्ण केलं असेल....... डेलिशस! :-) जितकी ही जिंगल तब्बल पाच दशकं भारतीयांच्या डोक्यात घट्ट बसली आहे, तितकीच त्या अमूल होर्डिंग्जवरची 'अमूल गर्ल'! काही वर्षांपूर्वीपर्यंत एक वेळ अशी होती की दर आठवड्याला एक होर्डिंग लागायचं.

फूटबॉल युरो चषक - २०१२ : शुभारंभ आणि गुणतक्ता

छोटा डॉन ·
नमस्कार मंडळी. क्रिकेटचा वर्ल्डकप झाला आणि भारतात दिवाळी साजरी झाली, त्यानंतर सगळ्यांचा जीव लटकवुन ठेवलेले तेंडल्यांचे शतकांचे महाशतक झाले आणि पुन्हा एकदा लोकांनी दिवाळी केली. झालेच तर क्रिकेटचे भारतीय धंदेवाईक व्हर्शन 'आयपीएल' ही झाले. मध्यंतरी बुद्धिबळ विश्वचषकही झाला आणि विश्वनाथन आनंदने तो जिंकुन कमाल केली. सध्या फ्रेंच ओपन स्पर्धेचा धुमाकुळही चालु आहे आणि नदाल नेहमीसारखा क्ले कोर्टवर एकेक प्रतिस्पर्ध्यांना शब्दशः धूळ चारत आहे.

जगज्जेता विशी!

चतुरंग ·
गेल्या १२ वर्षात तो पाच वेळा जागतिक अजिंक्यपदाचा मुकुट डोक्यावरती चढवून आहे (ही 'तपःश्चर्याच' म्हणायला हवी! :)) , जगातले अनेक प्रतिस्पर्धी बुद्धीबळपटू त्याच्या खेळाला वचकून असतात, गॅरी कास्पारोवसारखा त्याचा एकेकाळचा कट्टर प्रतिस्पर्धी आणि नंतरचा सहकारी देखील त्याच्याबद्दल अनुदार उद्गार काढतो तेव्हा तो एका अढळपदाला पोचलाय याची खात्रीच होते! ३१ मे २०१२ ला मॉस्कोतल्या त्रेत्याकोव आर्ट गॅलरीमध्ये 'जन गण मन' वाजलं, आनंदने विजेतेपदाचा चषक उंचावला आणि माझे डोळे भरुन आले!

बुद्धीबळ विश्वविजेता स्पर्धेचे मिपावरील समालोचन आणि चतुरंग, रमताराम यांचे धन्यवाद

सरपंच ·
नमस्कार मित्रहो! मिसळपाववर बर्‍याच घडामोडी घडत असतात. काही घडामोडी या, निव्वळ, सदस्यांच्या उत्साहामुळे होत असतात. अशीच एक घटना नुकतीच घडली आणि त्यामुळे मिसळपाव संकेतस्थळ अधिक समृद्ध झाले. ती घटना म्हणजे, बुद्धीबळ विश्वविजेतेपदासाठी नुकतीच झालेली झटापट. भारताचा विश्वनाथन आनंद आणि इस्राएलचा बोरिस गेल्फंड यांच्या रंगलेला हा सामना. खरं तर बुद्धीबळ या खेळाला भारतात खूप ग्लॅमर नाहीये. मात्र, आपले चतुरंग यांनी या सामन्याच्या निमित्ताने अतिशय सुंदर असे समालोचन करत वाचकांना या सामन्यात अक्षरशः गुंगवून टाकले. रमताराम यांनी त्यांना खूप मोलाची सथ दिली.

अंगणात बाप, दारात माय,

ज्ञानोबाचे पैजार ·
अरे अंगणात बाप अन दारात माय, घरला तुज्या यायला मी खुळा हाय की काय, येड्या, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, घराकडे आलो तर काय काय देशील घराकडे आलो तर काय काय देशील गरम गरम पीठल अन भाकर तू खाशील सोताच्या हातानी भरवणार हाय, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, पोटभर खाल्यावर लै झोप येते पोटभर खाल्यावर लै झोप येते दोघांसाठी खोलीत गोधडी घालते खोलीच दार आतुन लावनार हाय, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, काय हुईल बाजारन जर आली आई काय हुईल बाजारन जर आली आई सांगेन आई ह्यो तुजा जावई, मागन मला घालायाला येनार हाय