उंटांची चालच तिरकी!
सचिनला लगाम घालण्यासाठी ऑस्ट्रेलियाने ब्रेटलीचे अस्त्र काढले तेव्हा त्याला ऑस्ट्रेलियातच धू धू धुवून सचिनने वाळत घातला होता! गेल्या तीन आठवड्यांखाली विक अॅन झी इथे झालेल्या टाटा स्टील बुद्धीबळस्पर्धेत आनंदने लेवॉन अरोनियनला ज्या जीवघेण्या पद्धतीने पिसला ते बघून मला सचिन-ब्रेटली सामन्याची आठवण न होती तरच नवल. ह्या विजयाने आनंदने भल्याभल्यांची तोंडे बंद केली. स्पर्धेत विजेता ठरलेल्या मॅग्नुस कार्लसनने देखील 'माईंड ब्लोइंग' असं या डावाचं वर्णन केलं.
अरोनियन आणि आनंदमधली 'दुश्मनी' जुनी आहे. लेवॉनविरुद्ध आनंदचा स्कोअर तसा डावाच आहे.
मिसळपाव