Skip to main content

क्रीडा

ये रे माझ्या मागल्या........

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 10/12/2014 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
"माझं ऐक - बोलिंग घे..... ओव्हरकास्ट आहे". २७५ शनिवार पेठ पुणे ह्या ठिकाणी बिल्डिंगच्या मध्ये असललेल्या साधारण ५० X १५० फुटी फर्शीच्या मैदानवर पिवळ्या स्मायलीच्या बॉलनी खेळताना ते ढोपरायेवढं कार्टं आपल्या गुडघ्यायेवढ्या कॅप्टनला सूचना करत होतं. आता त्या शेंबड्या पोराच्या ह्या आगावपणामध्ये त्याच्या (मुद्दामच उल्लेख केलेल्या) राहत्या ठिकाणाने दिलेल्या जन्मसिद्ध अधिकाराइतकाच वाटा होता आजकाल सगळीकडूनच मिळणार्‍या क्रिकेटच्या ज्ञानाचा! लहान असताना रबरी चेंडू प्यांटवर आम्हीदेखील घासला होताच... पण ह्यांचे म्हणजे नेणत्याचे घासणे | "वन लेग स्टंप" गार्ड काय घेतील.....

शांततेनंतरचं वादळ - Thunder down under

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी गुरुवार, 04/12/2014 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
"We must dig in and get through to tea. And we must play on." भावुक झालेला ऑझी कर्णधार मायकेल क्लार्क आपल्या धाकट्या भावासारख्या सहकार्‍याला श्रद्धांजली वाहत होता. तेव्हा फक्त मॅक्सविलच्या शाळेत उपस्थित ऑझी पंतप्रधान, आजी-माजी क्रिकेटपटू, ह्यूज कुटुंबीय आणि चाहत्यांचेच नाही तर क्रिकेट आवडणार्‍या / नावडणार्‍या जगभरातल्या कुठल्याही सहृदय माणसाचे डोळे पाणावले असतील. २५ नोव्हेंबरपासून सगळं क्रिकेटविश्व हादरलंच होतं. कारणही तसच आक्रीत. आत्तापर्यंत असे शेकडो बाऊन्सर्स टोलवलेला आणि झेललेला फिल ह्यूज सिडनीच्या मैदानावरच एका विचित्र अपघाताने कोसळला.

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ११

लेखक चतुरंग यांनी रविवार, 23/11/2014 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
रसिकहो माफ करा, आज धागा काढायला उशीर झाला. अकरावा डाव. आनंद ५.५ वि.४.५ गुणांनी मागे. काळी मोहोरी घेऊन आज तो काय करणार? कोणते नवीन वेरिएशन मॅग्नुसला विचारात पाडेल? चुका करायला भाग पाडेल? आज आनंद जिंकला तर सामना पूर्ण पणे झुकेल आज हरला तर संपलेच! आज बरोबरी झाली तर परवाच्या डावाची उत्कंठा काहीच्या काही शिगेला पोचेल. चला डाव बघूयात. कृपया पट टाका.

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १०

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 21/11/2014 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
५-४ असा एकागुणाने आनंद मागे. १२ डावांपैकी आज दहावा डाव. दहाव्या आणि बाराव्या डावात आनंदची पांढरी मोहोरी. सस्पेन्स याहून जास्त काय असू शकतो? आज विशीला सुलतानढवा करावा लागणार. कोणते ओअपनिंग? कोणत्या हिकमती?

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ९

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 20/11/2014 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
आठव्या डावात आनंदने निर्णायक विजय खेचून आणणे आवश्यक असताना नीरस बरोबरी झाली. मधल्या एका विश्रांतीनंतर आज नवव्या डावात आनंद 'डू ऑर डाय' परिस्थितीत आहे. काळी अथवा पांढरी मोहोरी न बघता त्याने विजयासाठीच प्रयत्न करणे आवश्यक आहे अन्यथा सामना पुरे १२ डाव देखील होणार नाही अशी (चेन्नै साधार) भीती वाटते! :( काळ्या मोहोर्‍यांकडून खेळताना आनंदने कायम बरोबरीचे ध्येय ठेवल्यासारखे आतापर्यंतच्या डावांत वाटत आले आहे. आज आनंद पुन्हा एकदा जोमदार प्रयत्न करेल अशी आशा ठेवूयात आणि डावाकडे वळूयात. अजून १५ मिनिटे आहेत. तोवर कोणीतरी पट लावा रे!! :)

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ८

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 18/11/2014 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
कालचा डाव तुफान झाला. कार्पोव कोर्चनॉयच्या सर्वात जास्त खेळींच्या डावापाठोपाठचा दुसर्‍या क्रमांकाचा! शेवटी अर्थातच मॅग्नुसने विनाकारण ताणले. त्याने टाटा स्टील स्पर्धेत एका खेळाडूवर घोडा-हत्ती वि. हत्ती अशा काँबिनेशनने मात लावली होती त्यामुळे तो कालही आशावादी होता. परंतु काल आनंद त्याला पुरुन उरला. शब्दशः "कुठे आनंदचा ऐरावत आणि कुठे मॅग्नुसची तट्टाणी!" अनुभवायला मिळाले!! ;) चला आजचा आठवा डाव कमालीचा रंगतदार होणार. आनंदसाठी जिंकणे जवळपास अनिवार्य. कारण आता उरलेल्या पाच डावात त्याची पांढरी मोहोरी तीन वेळा असणार आहेत.

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ७

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 17/11/2014 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या डावातल्या सिसिलिअन नंतर आनंदने पुन्हा एकदा बर्लिन डिफेन्स निवडलाय! हा मॅग्नुसचा बालेकिल्ला समजला जातो त्यामुळे आनंदने कोणते विरिएअशन सुट्टीच्या दिवसात तयार केले आहे हे बघायची उत्सुकता आहे. आनंद वेगाने खेळतोय त्यामुळे तयार होऊन आलाय हे नक्की. आज त्याला किमान बरोबरी करावीच लागेल अन्यथा सामन्याचे पारडे बरेचसे मॅग्नुसच्या बाजून झुकेल हे नक्की. चला डाव बघूयात.

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ६

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 15/11/2014 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज यायला उशीर झालाय. डाव सुरु होऊन जवळपास तास झालाय. कालचा डाव बरोबरीत गेला. आज मॅग्नुस निकराचा प्रयत्न करतोच आहे. डाव सिसिलिअन ने सुरु झाला.

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ५

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 14/11/2014 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्‍या विश्रांती सत्रानंतर आज पाचवा डाव खेळला जाईल. आनंदला जर सामना जिंकायचा असेल तर आजचा डाव अनेक कारणांनी अतिशय महत्त्वाचा आहे. एकतर गुणसंख्या २-२ अशी समान आहे आणि आनंदची आज पांढरी मोहोरी आहेत. शिवाय उद्याचा डाव सहावा आहे तिथे सामना निम्मा संपतो.

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ४

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 12/11/2014 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या तीन डावातच दोन डाव निकाली निघालेत यापेक्षा जास्त उत्सुकता ताणणारे अजून काय असू शकते? आज चौथा डाव मॅग्नुस पांढर्‍या मोहोर्‍यांनी खेळणार. कोणती सुरुवात असेल ई४ का अजून काही? डाव सुरु व्हायला जेम्तेम एक मिनिट आहे चला बघूयात !