Skip to main content

क्रीडा

बॉम्बे डक - आगरकर निवृत्त!

लेखक फारएन्ड यांनी सोमवार, 21/10/2013 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
२००३ मधली ब्रिस्बेन कसोटी. भारताचा स्कोर ऑस्ट्रेलियाच्या स्कोरच्या पुढे नेऊन व स्वतः शतक मारून दादा नुकताच आउट झालेला. आगरकर खेळायला आला. मग एक दोन बॉल्स नंतर एक रन काढला आणि जणू शतक मारल्यासारखे बॅट उंचावून सर्वांना दाखवली. स्वतःच्याच अपयशाबद्दल इतक्या सहजतेने सेन्स ऑफ ह्यूमर दाखवणारा खेळाडू क्वचितच कोणी असेल. येथे बॅट दाखवण्याचे कारण म्हणजे त्यापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अजित आगरकर त्यांच्या विरूद्ध सलग ७ वेळा शून्यावर आउट झाला होता. त्यातील चार वेळा 'गोल्डन डक' म्हणजे पहिल्याच बॉलवर! तेथेच त्याला 'बॉम्बे डक' नाव पडले.

दि मद्रास टायगर वर्सेस दि मोझार्ट ऑफ चेस

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 21/10/2013 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
जगातल्या तमाम बुद्धीबळ वेड्यांची दिवाळी यावर्षी सुरु होणार आहे तारीख ९ नोव्हेंबर २०१३, हॉटेल हाएट रीजन्सी, चेन्नैला! 1 ६४ घरांच्या साम्राज्याचं विजेतेपद पाचव्यांदा राखण्यासाठी सज्ज असलेल्या आपल्या लाडक्या विशीला भिडतोय मॅग्नुस कार्लसन! हा विश्वविजेतेपदाचा सामना अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. एकतर हा भारतात होणारा पहिलाच विश्वविजेतेपदाचा सामना आहे.

( चला नांगरूया शेत सारे )

लेखक मोदक यांनी मंगळवार, 15/10/2013 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे लाडके लोककवी हभप श्री धनाजीराव यांच्या काव्यजीवनातील चरणकमलांचे तंतोतंत अनुकरण करण्याच्या आमच्या छोट्या प्रयत्नांचे हे पुढचे पाऊल. चल परत नव्याने सुरू करू सारे या काव्यातून पेरणीचा मनोदय व्यक्त करणार्‍या धनाजीरावांनी नांगरणीवर काहीच भाष्य केले नसल्याने धनाजीरावांच्या गोधडीला ठिगळ लावण्याचा हा प्रयत्न गोड मानून घ्यावा.. *************************************************** बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे वरच्या अंगाची दोन मोठी ढेकळं माझ्या मोंगर

आमचे असतील लाडके (सच्याची २००वी कसोटी)

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 04/09/2013 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वीची (पूर्णपणे काल्पनिक) गोष्ट बरंका. तेव्हा ना पृथ्वीवर कोणीच राजा नव्हता. लोकं आपाआपली कामं जबाबदारीनी करायची. सचोटी, प्रामाणिकपणा, नीतिमत्ता वगैरे प्रकार तेव्हा खरोखरच अस्तित्वात होते. पण अर्थातच हे सगळं फार दिवस टिकलं नाही. लोकं षड्रिपूंच्या आहारी जाऊ लागली. खोटं बोलू लागली, एकमेकांचा द्वेष करू लागली, चोर्‍या मार्‍या करू लागली... म्हणजे थोडक्यात "वाईट" वागू लागली. आणि तेव्हा अर्थातच माणसांचं देवांशी डायरेक्ट कनेक्शन होतं. म्हणून मग काही जाणते नेणते लोक सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले "हे चतुरानन, तुझीच ही लेकरं आता अधर्माचरण करत आहेत.

Come on बारक्या.....fight!

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी गुरुवार, 29/08/2013 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
आज २९ ऑगस्ट - आपला राष्ट्रीय क्रीडा दिवस. लहानपणी .. म्हणजे लपाछपी, चोर - पोलीस, आप्पारप्पी, लगोरी वगैरे खेळांतून "ग्रॅज्युएट" होऊन "स्पोर्ट्स" ह्या प्रकारांत गणले जाणारे खेळ खेळायला लागलो तेव्हा......त्या पांढरे कपडे घालून तांबड्या चेंडूनी खेळायच्या खेळानी वेड लावलं आणि आयुष्यात पहिल्यांदा हिरव्यागार मैदानांवर पाऊल पडलं. कपिल देवसारखी अॅक्शन करणं... "वन डाऊन" बॅट्समन असल्यामुळे हेल्मेटखाली संजय मांजरेकरसारखी पट्टी बांधणं वगैरे चावट उद्योग चालू होते. अझरुद्दीन, इम्रान, रिचर्ड्स वगैरे हीरोज होते... शाळेतून पळून जाऊन मित्राच्या घरी टीव्ही बघणं व्हायचं... सगळं यथास्थित चालू होतं.

कपिल व गांगुलीने निवडलेले एकदिवसीय क्रिकेटचे भारताचे सर्वकालीन सर्वोत्तम संघ

लेखक श्रीगुरुजी यांनी शनिवार, 17/08/2013 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
भारताचा महान अष्टपैलू खेळाडू कपिलदेव याने नुकताच त्याच्या मतानुसार एक-दिवसीय क्रिकेटमधील भारतातील सर्वकालीन सर्वोत्तम १२ खेळाडूंचा संघ निवडला. त्याच्या सर्वकालीन सर्वोत्तम एकदिवसीय संघात खालील खेळाडू आहेत. धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सचिन, सेहवाग, गांगुली, कोहली, अझरूद्दीन, युवराज सिंग, झहीर खान, श्रीनाथ, हरभजन, कुंबळे, रविंद्र जडेजा (१२ वा खेळाडू) त्याच्यापाठोपाठ गांगुलीने देखील स्वत:च्या मताने भारताचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघ निवडला.

बोल एनिथिंग बट अ नो बॉल ...

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 14/04/2013 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
कालच दि. १३ एप्रिल २०१३ रोजी आय पी एल मधे बंगलोर व चेन्नई संघात टी २० चा सामना झाला. The game is not finished unless the last ball is bowled.या क्रिकेट मधील कुठेही लिखित न झालेल्या नियमाचा प्रत्यय आला. शेवटच्या चेडूवर २ धावा जिकण्यासाठी चेन्नईला हव्या होत्या.आर पी सिंग ने रवींद्र जडेजाला चेडू टाकला .त्याने तो थर्ड मॅनच्या दिशेने उंचावून मारला. थर्ड मॅनला असलेल्याने तो झेलला. झाले. बंगलोरच्या खेळाडूनी हवेत उंच उड्या मारून सेलेबब्रेशन करायला सुरूवात देखील केली. छोट्या पडद्यावर नवेच द्ष्य दिसू लागले. इकडे पिवळा ड्रेस वाले चेनाईकर ही आनंदाने मैदानाकडे अर्थात विजयी मुदद्रेने धाव घेउ लागले.

नायक क्रमांक एक

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 02/04/2013 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

उस सिक्सर की गूंज!

लेखक फारएन्ड यांनी बुधवार, 06/03/2013 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
पाक विरूद्ध सचिनने सेन्च्युरियन वर मारलेल्या त्या प्रसिद्ध सिक्सला व त्या विजयाला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल काही आठवणी... गेली अनेक वर्षे भारत-पाक मॅचेस म्हणजे जोरदार टीआरपी असलेले इव्हेण्ट्स झाले आहेत. पण सध्याच्या तुलनेत पूर्वीच्या मॅचेस म्हणजे अमर अकबर अँथनी च्या तुलनेत एखादा युरोपियन आर्ट मूव्ही!

एंड्युरो ३

लेखक बाळ सप्रे यांनी गुरुवार, 14/02/2013 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
जिममधे विकास सरांनी विचारेपर्यन्त "एन्ड्युरो३" स्पर्धेमधे भाग घेइन असं कधी वाटलच नव्हतं. एन्ड्युरो३ विषयी खूप ऐकुन होतो. गेले ८-१० महिने निखिल शहा आणि पुणे रनिंग ग्रुपमुळे धावण्याची आवड निर्माण झाली होती. स्टॅमिनाही बर्‍यापैकी वाढला होता. या ग्रुपची ओळखही विकासनीच करुन दिली होती. तेव्हापासुन १० वेळातरी अर्धमॅरॅथॉन (२१किमी) धावलो होतो. एकदा मॅरॅथॉन आयोजनाचा अनुभवही घेतला होता. निखिल सायकलिंग्,रनिंग, ट्रेकींगमध्ये खूपच माहीर आहे. बर्‍याच स्पर्धा त्याने जिंकल्याही आहेत. पण त्याचे खरे वेड आहे ते या सगळ्या गोष्टींच इतरांना वेड लावण्यात.