क्रीडा
शूट यू बासटर्ड
गेली तीन वर्ष सलग लीग च्या सेमीजपर्यंत धडक दिली होती . . पण प्रत्येक वेळी तिथून बाहेर पडलो होतो . . कधी वेळकाढू खेळ . . कधी ऐनवेळी केलेल्या चुका . कधी सामन्याच्या आदल्या दिवशी झालेली इंज्युरी . काहीना काही कारण . पण बाहेर पडलो होतो . .
स्वस्तिक फुटबाल क्लब .
हा आमचा क्लब . आम्ही ५-६ जणांनी सुरु केलेला . . रोज फुटबाल खेळायचो . . आणि सहज बोलता बोलता ठरलं कि लोकल लीग मध्ये पण टीम उतरवू . . ६ जण होतोच . आणखी ५-६ जण इकडून तिकडून मिळवले . . झाला क्लब सुरु . .
यातले सहा जण म्हणजे . . म्हमद्या .
एक परंपरा
एक परंपरा
शनीवार आमची शाळा अर्धा दिवस असायची. त्या दिवशी शनीवार होता. शाळेची वेळ ११.३०-२.३. पण त्या दिवशी शाळा दहाC मिनिटे लवकर सोडण्यात आली. कारण २.३० वाजता एक क्रिकेट सामना सुरु होणार होता. एखाद्या क्रिकेट सामन्यासाठी शाळेची वेळ अधिकृतरीत्या बदलणं हि काही साधीसुधी गोष्ट नव्हे, पण तसा निर्णय घेतला गेला कारण २.३० वाजता सुरु होणारा सामना साधासुधा नव्हता, तो होता विश्वकप १९९६ चा उपान्त्यपूर्व सामना. आणि प्रतिस्पर्धी होते भारत वि. पाकिस्तान!!!
आम्ही धावत घरी आलो. आपली पहिली ब्याटिंग होती. सचिन आणि सिद्धुनी सावध सुरुवात केली. त्यांचा जम बसला असा वाटताक्क्षणिच सचिन आउट झाला. छातीतली धडधड वाढली.
पारंपारिक प्रतिस्पर्धी
तुम्ही कधी साप आणि मुंगुसाला भांडताना बघितले आहे? दोघेही जीव खाउन लढतात. कारण ती अस्तित्वाची लढाई असते. आजवर कधी पाहण्याचा योग आला नसेल तर अजुन बरोब्बर ५ दिवसांनी, रविवार, १५ फेब्रुवारी २०१५ रोजी, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजल्यापासुन बघा, २ देशातले २२ खेळाडु साप आणि मुंगुसासारखे लढणार आहेत. हा केवळ त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे तर २ देशांच्या अस्मितेचा सुद्धा प्रश्न आहे.
गलित आहे गात्र अजुनी
कविवर्य सुरेश भटांच्या फेमस आव्हानाला समस्त पुरुषजातीचे उत्तर...
तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?
अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला
अजुन मी विझले कुठे रे ? हाय !
तुमच्या घराण्यातील अथवा परिचयातील कतृत्ववान अथवा दखल घेण्याजोग्या व्यक्तींची माहिती द्या
नमस्कार,
आपल्या (तुमच्या) चालू अथवा मागच्या पिढीमध्ये अथवा परिचयात कतृत्ववान अथवा दखल घेण्या जोग्या व्यक्ती असू शकतात पण काही ना काही कारणाने त्यांच्या बद्दल लिहावयाचे, दखल घ्यावयाचे राहून जाऊ शकते. तर दुसर्या बाजूस अगदी प्रसिद्ध व्यक्तीबद्दलसुद्धा प्रत्यक्षात पुरेशा माहितीचा अभाव आढळून येतो अथवा माहितीत गॅप्स राहून जातात. या धाग्याच्या निमीत्ताने अशा आपल्या परिचयातील व्यक्तींबद्दल लिहिते करण्याचा हा छोटासा प्रयत्न. लगेच वेळ नसेल तर भविष्यात तरी लेखन करू इच्छित असाल अशी आपल्या परिचयातील नावे किमान नोंदवून ठेवावीत.
धोनीच्या निवृत्ती निमित्ताने
गेल्या काही क्रिकेट खेळाडुंच्या निवृत्तीनंतर असे लेख आणि प्रतिक्रिया वाचण्यात आल्या की झाले .. आता क्रिकेट जग बुडले. क्रिकेट बघण्यात काही राम राहिलेला नाही. अरेरे, माझा प्रियतम खेळाडू त्याचे नाव इथे टाका> कसोटी / एक दिवसिय /व-वीस (टी-ट्वेंटीचे मराठी रुपांतर) सोडून आता निवृत्त्त जीवन जगणार. आपले इतके दिवस कमावलेले पैसे मनसोक्त भोगणार, आपल्या कुटुंबासमवेत, मुलांबरोबर, मित्रांसमवेत मजा करणार. माझे काय व्हायचे आता ? कोणाला दूरचित्रवाणीवर मी रात्र रात्र जागून, (दिवसा सामना असेल तर) हातातले काम बाजूला टाकून क्रिकेट खेळतांना पाहणार ?
तो आणि आम्ही
Virat ची Adelaide ची innings बघितली .... १९९९ च्या Pakistan विरुद्ध ची आठवण ताजी झाली. आज एक वर्ष होऊन गेले त्याला retired होऊन . कित्येक आठवणी चित्रपटा प्रमाणे डोळ्यासमोर तरळल्या .
साल १९८७ , तुम्ही शाळेतून धावत पळत घरी येता , पाठीवरचे दप्तर ही न काढता T .V. लावता. हुश्श …!!! तो खेळत असतो . आई ने काय पानात वाढलंय तुमचे लक्ष नसते कारण तुमचे सगळे लक्ष त्याच्याकडे , भारताला जिंकायला ४१ runs बाकी …. आणि .... umpire च्या चुकीच्या निर्णयामुळे तो बाद होतो. आपण तो सामना १६ runs ने हारतो. ती त्याची शेवटची test innings असते . सामना अर्थातच पाकिस्तान विरुद्धचा बंगलोरचा .
मिसळपाव