मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ५

चतुरंग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या चारही भागाचे दुवे http://www.misalpav.com/node/21605 http://www.misalpav.com/node/21686 http://www.misalpav.com/node/21734 http://misalpav.com/node/21765 http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012 या संकेतस्थळावर पट आणि चालींचे विश्लेषण दिसते. http://moscow2012.fide.com/en/ या ठिकाणी डावाचेच थेट प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो. पण खेळाडू बघता येणे ही मौज काही वेगळीच असल्याने हे संस्थळही जरुर बघावे. आज शेवटचा बारावा डाव. अजून कोंडी फुटलेली नाही. दोघेही साडेपाच-साडेपाच गुण घेऊन बरोबरीत आहेत. आनंद डाव जिंकून चौथ्यांदा विजेतेपद राखेल का मिळालेल्या पहिल्यावहिल्या (आणि कदाचित शेवटल्या) संधीचा पुरेपुर फायदा उठवण्याच्या जिगरीने बोरिस काही अफलातून चमत्कार करुन आनंदला धूळ चारेल आणि विजेतेपदाचा मुकुट त्याच्याकडून काढून घेईल? का पुन्हा एकदा बरोबरी होऊन सामना टायब्रेकर मध्ये ढकलला जाऊन प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणली जाईल? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी चला बघूयात डाव बारावा! -चतुरंग

वाचन 26903 प्रतिक्रिया 0