मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रीडा

वर्ल्डकप क्लासिक्स - १९७५ - फायनल - वेस्ट इंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया

स्पार्टाकस ·
वर्ल्ड कप क्लासिक्स - १९७५ - फायनल - वेस्ट इंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया २१ जून १९७५ लॉर्डस्, लंडन मिडलसेक्स काऊंटीचं आणि इंग्लिश क्रिकेटचं माहेरघर असलेल्या ऐतिहासिक लॉर्डसच्या मैदानात वेस्ट इंडी़ज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकपची फायनल मॅच रंगणार होती. पाकिस्तानविरुद्धच्या एकमेव मॅचचा अपवाद वगळता सेमी फायनल गाठण्यास वेस्ट इंडीजला फारसे प्रयास पडले नव्हते. सेमी फायनलमध्ये त्यांनी न्यूझीलंडला १५८ मध्ये गुंडाळत दिमाखात फायनल गाठली होती. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला असला तरी पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या मॅचेस जिंकून ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये आली होती.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९७५ - सेमीफायनल - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड

स्पार्टाकस ·
१८ जून १९७५ हेडींग्ली, लीड्स यॉर्कशायरमधल्या हेडींग्लीच्या ग्राऊंडवर पहिल्यावहिल्या वर्ल्डकपमधली पहिली सेमी फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले होते ते पारंपारीक प्रतिस्पर्धी असलेले ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड! वर्ल्डकपपूर्वी १९७४-७५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या अ‍ॅशेस सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ४-१ असा फडशा पाडला होता. इंग्लंडची अशी वाताहात होण्यास कारणीभूत होते ते म्हणजे ऑस्ट्रेलियाचे ते दोघे खतरनाक बॉलर्स - डेनिस कीथ लिली आणि जेफ्री रॉबर्ट थॉमसन! पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये लिली वन डे मध्ये ५ विकेट्स घेणारा पहिलाच बॉलर ठरला होता.

वर्ल्ड कप क्लासिक्स - १९७५ - वेस्ट इंडीज विरुद्ध पाकिस्तान

स्पार्टाकस ·
१९७५ च्या पहिल्यावहिल्या वर्ल्डकपपासून २०१५ मधल्या वर्ल्डकपपर्यंत प्रत्येक वर्ल्डकपमध्ये अनेक थरारक आणि रोमांचक मॅचेस झाल्या. अशाच काही निवडक मॅचेसविषयी... ************************************************************************************* ११ जून १९७५ एजबॅस्टन, बर्मिंगहॅम वॉरीकशायरमधल्या एजबॅस्टन मैदानात वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान यांच्यात ग्रूप बी मधली मॅच होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये पदरी पराभव पडल्यामुळे सेमीफायनल गाठण्यासाठी ही मॅच जिंकणं पाकिस्तानसाठी अत्यावश्यक होतं. परंतु मॅचच्या दिवशी सकाळीच पाकिस्तानचा कॅप्टन आसिफ इक्बाल दुखापतीमुळे मॅचमध्ये खेळण्यास असमर्थ ठरला.

तो राजहंस एक !

चिनार ·
२००४-०५ चा तो काळ. भारतीय क्रिकेट संघ बऱ्यापैकी स्थिरावलेला. आता या संघात नवीन कुणी नको असं वाटायचं. आणि तो आला ! बलाढ्य शरीर, पिंजारलेले लांब सोनेरी केस, डोळ्याला गॉगल,आणि विकेटकीपरचे हेल्मेट ह्या अवतरामुळे त्याचा चेहरा कधी नीट दिसताच नव्हता. तो म्हणे भारताचा नवीन विकेटकीपर होता. नाव -महेंद्रसिंग धोनी! भारतीय क्रिकेटला विकेटकीपरची समृद्ध आणि लांबलचक अशी परंपरा लाभली आहे. दर दोन-तीन महिन्याला नवीन कोणीतरी यायचा. त्याच कारण म्हणजे भारतात विकेटकीपर हे नेहमीच एक स्वतंत्र संस्थान असायचं. त्यांचा काम म्हणजे चेंडू थोपवणं एवढंच! ह्या संस्थानिकांच्या हाती एकदा जरी बॅट दिली की संस्थाने खालसा व्हायची.

स्ट्रॅटेजी

चांदणे संदीप ·
आठ - दहा दिवसांपूर्वी व्हाट्सॲपवर आंतरसोसायटी हापपिच क्रिकेट स्पर्धेच आवतान आल. आणि गेलं नाही तर आपल्या सोसायटीची काय इज्जत राहिल? हा प्रश्न प्रत्येक सोसायटीच्या क्रीडाप्रेमी, हौशी क्रीडापटू इ. लोकांना पडला. आणि बघता बघता स्ट्रॅटेजीजना सुरुवात झाली. आमच्या सोसायटीचे हौशी क्रीडापटू कसे मागे राहतील? फक्त क्रिकेटचेच खेळाडू संघात निवडायचे या महत्त्वाच्या स्ट्रॅटेजीपासून आम्ही सुरूवात केली. त्याचं शेवटच्या दिवसापर्यंत काय झालं विचारू नका! शेवटी मॅचच्या दिवशी कॅरम किंवा बुद्धिबळ खेळायला आलं तरी चालतंय ओ, तो पण खेळाडूच असतोय की!

चेंडूफळीच्या गोष्टी !

चिनार ·
"२००३ वर्ल्डकप क्रिकेटचा अंतिम सामना. भारत वि ऑस्ट्रेलिया! भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारलेली. स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले. तेवढ्यात ऑस्ट्रलियन ओपनर्स ऍडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन मैदानात येत आहेत. भारतीय कप्तान सौरव गांगुली संघासोबत चर्चा करतोय. आज एक नवीन बॉलर भारतातर्फे पदार्पण करतोय. गांगुलीने त्याच्या हातात नवीन चेंडू सोपवला. कोण हा नवीन बॉलर? ह्याचे नावही फारसे ऐकलेले नाही. अजून कॅमेरा त्याच्यावर गेला नाहीये. दुरून तो रन-अप घेताना दिसतोय. हळूहळू कॅमेरा त्याच्या जवळ जातोय. अरे देवा !! भारताचा नवीन बॉलर !!!!................मी !!

आठवणी दाटतात: किस्से क्रिकेटचे

स्पार्टाकस ·
.inwrap { background: url(https://lh3.googleusercontent.com/Lp_d4i7_2MsOm0urqKpCOtvWkKCpcWUtKx9R26oyRLUdsXVNFLWI9fchPBYuB1tDK0x-MqG1Ew=w320-h331-no); background-size: 100%; background-repeat: repeat; } हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छच्या रणापासून ते अरुणाचलच्या जंगलापर्यंत पसरलेल्या भारतासारख्या विशाल देशाला एकत्रं आणणार्‍या ज्या काही मोजक्या गोष्टी आहेत त्या म्हणजे भारतीय सैन्य, राजकारण आणि क्रिकेट!

एक स्वप्न पूर्ण झाले!

चतुरंग ·
जगज्जेता मॅग्नुस कार्लसन आणि आव्हानवीर सेर्गे कार्याकिन यांच्यातला जागतिक बुद्धीबळ विजेतेपद सामना नोवेंबर ११ ते ३० दरम्यान न्यू यॉर्क इथे होईल अशी घोषणा फिडेने एप्रिल २०१६ मध्ये केली आणि सामना बॉस्टनपासून तीन तासांच्या अंतरावर होतोय आणि तो प्रत्यक्ष बघायला जाता येणे शक्य आहे या विचाराने माझ्या आनंदाला पारावार उरला नाही! विशी यावेळच्या सामन्यात असता तर 'आनंद' द्विगुणित झाला असता हे खरेच परंतु हेही नसे थोडके!