फिटनेस अॅप आणि गॅजेट्स
नमस्कार मंडळी.
व्यायामाच्या धाग्यावर उदंड प्रतिसाद झाल्याने "फिटनेस अॅप आणि गॅजेट्स" च्या वापराबद्दल नवीन धागा काढत आहे. गोड मानून घ्या. ;) (एस रावांनाही बरेचदा लिहितो लिहितो म्हणून सांगितले होते.)
सर्वप्रथम, आपण आपल्या आनंदासाठी व्यायाम / सायकलिंग करतो मग त्याचे असे रेकॉर्ड ठेवणे किंवा ट्रॅक ठेवणे अनेक जणांना पटत नाही. मात्र महिन्याच्या शेवटी किंवा एखाद्या मोठ्या राईड नंतर "आपले आत्तापर्यंत इतके इतके किमी झाले..!!" ही भावना जबरदस्त असते.
मिसळपाव
नमस्कार,
गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत.