वर्ल्डकप क्लासिक्स - १९७५ - फायनल - वेस्ट इंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया
वर्ल्ड कप क्लासिक्स - १९७५ - फायनल - वेस्ट इंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया
२१ जून १९७५
लॉर्डस्, लंडन
मिडलसेक्स काऊंटीचं आणि इंग्लिश क्रिकेटचं माहेरघर असलेल्या ऐतिहासिक लॉर्डसच्या मैदानात वेस्ट इंडी़ज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकपची फायनल मॅच रंगणार होती. पाकिस्तानविरुद्धच्या एकमेव मॅचचा अपवाद वगळता सेमी फायनल गाठण्यास वेस्ट इंडीजला फारसे प्रयास पडले नव्हते. सेमी फायनलमध्ये त्यांनी न्यूझीलंडला १५८ मध्ये गुंडाळत दिमाखात फायनल गाठली होती. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला असला तरी पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या मॅचेस जिंकून ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये आली होती.
मिसळपाव
नमस्कार मंडळी.