पुष्पा २: द रूल् - संक्षिप्त ओळख वगैरे
एकाच आठवड्यात हा सिनेमा मी दोनदा पाहीला. पहिल्यांदा कुटुंबीयांसमवेत हिंदीत एका थेटरात; चार दिवसांनी मित्रांसमवेत तेलुगूत दुसऱ्या एका थेटरात.
पुष्पा १: द राइज् आवडलेला होताच. पुष्पा २: द रूल् अधिकच आवडला.
इतर कोणत्याही लोकप्रिय तेलुगु सिनेमातल्यासारखाच या सिनेमातही प्रचंड मसाला आहे. पराकोटीची साहस दृष्ये, मादक शैलीतील गाणी, कमालीचे इमोशनल प्रसंग आणि शेवटचा अनपेक्षित ट्विट यांनी सिनेमा भरलेला आहे.
पृथ्वीतलावरील कोणतेही काम अशक्य नसलेला पुष्पा (अल्लू अर्जुन), तोंडी लावण्यापुरतीपेक्षा किंचित अधिक, पुष्पाची पत्नी श्रीवल्ली (रश्मिका मादन्ना), पुष्पाचा जिवलग साथीदार केशव (जगदीश प्रताप भंडारी) आणि इतर कलाकार हे सिनेमाला, "पुष्पा खूपच महान आहे" हे दाखवण्यात मदत करतात.
आपल्या पत्नीवर निरतिशय प्रेम करणारा, तिची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यास तयार असलेला पुष्पा, "मुख्यमंत्र्यांसोबत आपल्या नवऱ्याचा फोटो घरात असावा" या तिच्या इच्छेखातर राज्याचा मुख्यमंत्री बदलून टाकतो!
हिंदी सिनेमातील कमालीच्या सेक्युलर कथा-दृश्यांच्या पार्श्वभूमीवर, बाहुबली, पुष्पा, कांतारा इत्यादी सिनेमांतील हिंदू धर्म-परंपरेतील, विशेषतः देवळांतील प्रसंगांचे चित्रण मनाला खूप भावते.
याच सिनेमात शेवटी पुष्पा ३: द रॅम्पेज् या पुढच्या सिनेमाची बीजे रोवली आहेत.
सिनेमाप्रेमी मिपाखरांनी, आधी पाहिला नसल्यास हा सिनेमा अवश्य पहावा आणि इथे प्रतिक्रिया लिहायला अशी शिफारस करतो.
(तेलुगु चित्रपट प्रेमी) - द्येस्मुक् राव
वाचन
5771
प्रतिक्रिया
0