मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाषा

'साहित्य विश्व' संकेतस्थळाचे अनावरण

देवदत्त ·
मराठी साहित्यसंपदा ही तशी प्राचीन. इतिहासकारांच्या मते मराठीचा वापर असणारे शिलालेख इ.स.च्या १०व्या आणि ११व्या शतकातले आहेत तर मराठीतली पहिली ग्रंथरचना १३व्या शतकातली आहे असेही म्हणतात. गेली वर्षानुवर्षे मराठीतील बहुरंगी साहित्य कथा, कादंबरी ,कविता, संतवाणी वगैरे अनेक प्रकारातून आपल्यासमोर येत आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, रणजित देसाई, शिवाजी सावंत, गो.नी. दांडेकर, तसेच न. चिं. केळकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि वा. म.

लिहा आणि कमवा - ऑनलाईन डिजीटल लायब्ररी.

II विकास II ·
http://www.sahityasampada.com/ ह्या संस्थेचा स्टॉल संमेलनात पाहीला. या संकेत स्थळाद्वारे आपण पुस्तके ऑनलाईन वाचु शकतो. जर तुम्ही लेखक असाल तर तुम्ही ह्या कंपनीशी करार करुन पैसे देखील कमावु शकता. नोंदणी शुल्कः १५ रु मासिक शुल्कः ३० रु अधिक माहीती साठी पत्ता: fuzzysoft@gmail.com sahityasampada@gmail.com दुरध्वनी: ०२४०-२३४७६३२ ९४२२२ ०९४८६ टिपः ह्या कंपनीशी माझा/मिसळपावचा कोणताही संबध नाही अथवा कोणताही प्रकारचा मोबदला मला/मिपा ला मिळत नाही.

मराठी सॉफ्टवेअर उपकरण - घरपोच फुकट सी डी

II विकास II ·
मराठी सॉफ्टवेअर उपकरण घरपोच फुकट सी डी - सौजन्य भारत सरकार ०१ मराठी भाषेचे ट्रू-टाईप फॉन्ट्स व कि-बोर्ड ड्रायव्हर ०२ मराठी भाषेचे ट्रू-टाईप मल्टीफॉन्ट कि-बोर्ड इंजिन ०३ मराठी भाषेचे युनिकोड आधारीत ओपन टाईप फॉन्टस ०४ मराठी भाषेचे युनिकोड कि-बोर्ड ड्रायव्हर ०५ मराठी भाषेचे विभिन्न प्रकारचे फॉन्टस आणि स्टोरेज कोड परिवर्तक ०६ भारतीय ओपन ऑफीस(ओपन सोर्स) मल्टीप्रोटोकॉल संदेशवाहकचे मराठी स्थानीकरण ०७ मराठीचे अक्षर जोडणी तपासणीस ०८ मराठी-इंग्रजी शब्दकोश ०९ मराठी डेकोरेटिव्ह (अलकांरीक फॉन्ट) डिसाईनर उपकरण १० मराठी डाटाबेस सॉर्टीग ११ मराठी टंकलेखन सहाय्यक १२ मराठी मायक्रोसॉफ्ट शब्द उपकरण १३ मराठी मायक

सावध ऐका (मागल्या) हाका!

भोचक ·
पदार्थाची चव लिहून सांगता येत नाही, तो अनुभवाचा भाग आहे, तद्वतः इंदूरी हाकांचे विश्व हा खास अनुभवाचाच भाग आहे. आता लेखाची सुरवातच खाद्यपदार्थाच्या शब्दाने व्हावी हा खास इंदुरी असल्याचा अपरिहार्य नि अटळ परिणाम आहे. पण तो अट्टल खवय्या असल्याची साक्षही आहे. इंदुरात आल्यावरही इथल्या हाकांमध्ये भिजले नाहीत नि त्या हाका तुमच्या जिभेत भिजल्या नाहीत, तर तुम्ही 'इंदौरकर' कधीच होऊ शकणार नाही. इथल्या भय्याचा उच्चार तुम्ही कोणत्या वेळी, कोणासमोर नि कसा करता यावरही तुम्ही इंदौरी आहात की नाही हे ठरते.

मला मेघदुताचा पुढील दुवा हवा आहे.....विदग्ध वरील .

डावखुरा ·
http://vidagdha.wordpress.com/meghadoot_purna/ प्रस्तुत दुव्यावर मेघदुत आहे मराठी रसग्रहणासहित पण क्रमशः आहे .... तरि यापुढिल दुवा अथवा सम्पुर्ण मेघदुतचे मराठी रसग्रहण कोणाकडे उपलब्ध असल्यास देण्याचे करावे ....... धन्यवाद!!

पुरावा मिळाल्याशिवाय नाडी ग्रंथांवर माझा विश्वास बसणार नाही.

शशिकांत ओक ·
दुर्दैवाने तुमची नाडीवर जितकी ठाम श्रद्धा आहे तितकाच माझा अविश्वास अवैज्ञानिक सत्यावर आहे. तेव्हा तुम्ही कितीही जेरीला आणलंत तरी मला पुरावा मिळाल्याशिवाय माझा विश्वास बसणार नाही.
राजेश घासकडवी जी आता कसे बोललात... मग आपले व माझे पटेल... जर सत्यनिष्ठेने पुरावा मिळवाल तर मग बदलाल की नाही का तरी ही नाहीच... मी पुराव्यानेच नाडी ग्रंथांना अवैज्ञानिक, थोतांड, खोटे ठरवायचा चंग बांधून गेलो... पुराव्यासाठी जंग जंग पछाडून तमिळींना हाताशी धरून, इंडॉलॉजीच्या ताडपत्रांच्या तज्ञांनी पारखून जे ठरवले, समजले.

मराठी ५० वर्षांनंतर कशी असेल?

समीरसूर ·
एक प्रसंगः आमच्या कंपनीच्या बसमध्ये एका बाकावर दोन मुली आणि एक मुलगा असे तीन मराठी वीर बसले होते. मी स्थानापन्न होत असतांना ऐकलेला संवाद असा: एक मुलगी: अगं ते खलबत्त्यात कुटून घ्यायचं. दुसरी: खलबत्ता म्हणजे? पहिली: तुला खलबत्ता माहित नाही? तुला माहिती आहे का रे? शुंभः (नंदीबैलासारखी मान हलवत) नाही. पहिली: अगं खलबत्ता म्हणजे कुटण्यासाठी एक लोखंडाचं भांडं असतं आणि एक जाड वजनदार असा लोखंडी रॉड असतो. त्याला बत्ता म्हणतात आणि ज्या भांड्यात कुटतात त्याला खल म्हणतात. मिक्सर वापरात येण्याआधी कुटण्यासाठी खलबत्ता वापरत असत. अजूनही खेड्यांमध्ये वापरतात.

पुस्तकविश्व.कॉम - मराठी वाचकांसाठी नवीन संकेतस्थळ. BETA 1.0

नीलकांत ·
नमस्कार, मराठी पुस्तकांच्या चाहत्यांसाठी आपल्याला आवडलेल्या पुस्तकांवर चर्चा करण्यासाठी, आपल्याला आवडलेल्या पुस्तकांवर परिक्षण लिहीण्यासाठी आणि आपल्यासारखी आवड निवड असलेल्या लोकांशी मैत्री करण्यासाठी अनेक नवीन सुविधा घेऊन नवीन संकेतस्थळ आकार घेत आहे त्याचे नाव आहे पुस्तकविश्व.कॉम ( www.pustakvishwa.com). मराठी पुस्तकांना आणि साहित्यविश्वाच्या घडामोडींना वाहलेले हे संकेतस्थळ अतिशय उत्तम व्हावे यासाठी लोकायत टीम काम करते आहे. पुस्तक परिक्षण, समान आवडी निवडी असलेल्या लोकांशी मैत्री आणि पुस्तक विषयांवर चर्चा आदी या संकेतस्थळाचं स्वरूप असेल.

लोकसत्ता मधील हा लेख मिळेल का कोणाकडे?

भारद्वाज ·
नमस्कार मिपाकरांनो :H :-H :wave:, माझे, माझ्या मित्रांसोबत, 'हिंदी ही राष्ट्र भाषा आहे की नाही' यावरून वाद चालू आहेत. हिंदी राष्ट्रभाषा नाही असे माझे म्हणणे आहे. मात्र माझ्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ माझ्याकडे काही नाही. त्यामुळे हिरीरीने मत मांडता येत नाहीये. मला आठवतेय की लोकसत्तेत काही महिन्यांपूर्वी (साधारणतः त्या अबू आझमीचे शपथविधी प्रकरण घडले त्यावेळी) सदर लेख आला होता ज्यात "हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून कुठेही उल्लेख नाही" असा मुद्दा फार व्यवस्थित मांडला होता. दुर्दैवाने मला लेखाचे आणि लेखकाचे नाव आठवत नाहीये. लेखक बहुदा सुनील चावके असावेत.