मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाद

रिक्षाचालकांचा इलाज

चेतन सुभाष गुगळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
रिक्षाचालकांचा इलाज
प्रवाशांचे हक्क आणि रिक्षाचालकांचे कर्तव्य आपल्या देशात काही व्यवसाय करण्यासाठी सर्वांना मुक्त परवानगी आहे. परंतू इतर काही व्यवसाय करण्यास परवाना पद्धती लागू करण्यात आली आहे. हे व्यवसाय सर्वांनाच करता येत नाहीत. त्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात येते जेणेकरून त्यांच्या व्यवसायात स्पर्धा निर्माण न होता त्यांना नियमित उत्पन्न मिळावे. रिक्षावाहतूकीचा व्यवसाय हा देखील त्यापैकीच एक आहे. त्याचप्रमाणे टॆक्सीवाहतूकीचाही. या व्यवसायातील लोक काळ्या-पिवळ्या रंगातील वाहनांचा उपयोग करतात.

मिपा ओळख २

चेतन ·
प्रसंग दुसरा : मिपाचे सदस्य होउन पंधरा एक दिवस झालेत. भाउ पंधरा दिवस झाले बघ तु सांगितलेले आणि न सांगितलेलं सगळ येड्**सारखं वाचुन काढलं. आता मी पण काहितरी लिहाव म्हणतोय. बहुतेक हा मिपावरचा दुसरा गटणे होणार वाटतं तरी बरं पंधरा दिवसात यानि काही चर्चाप्रस्ताव टाकले नाहित. काय म्हणालास? नाही काही नाही हे आपलं खुदं के साथ बातां. हे ही मिपावरुनच ढापलेलं बर का मी आपला पी.जे केल्याच्या थाटात म्हणालो. तर हा हिरो तेव्ह्ढ्याच थंड्पणे म्हणतो कसा दादा मिपावर दुसरर्‍याचं लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी नाही आहे माहिते ना!

मराठी लेखनावर इंग्रजीचा प्रभाव

मी_ओंकार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार,
मराठी भाषेवरील इंग्रजीचा प्रभाव, इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द, ते शोधताना संस्कृतातील जड शब्दांचा होणारा वापर या आणि अशा बर्‍याच मुद्द्यांवर बर्‍याच ठिकाणी बर्‍याच वेळा काथ्याकूट झालेला आहे. तरीही या नवीन काथ्याकूटास सुरवात करण्याचे मागील काही दिवस विचार घोळत होते. याचा उद्देश वर सांगितल्यापैकी पहिला म्हणजे मराठी भाषेवरील इंग्रजीचा प्रभाव आणि प्रामुख्याने लेखनावरील प्रभाव हा आहे.

नाडी ग्रंथ भविष्य आणि इंडॉलॉजिकल स्टडी

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नाडी ग्रंथ भविष्य आणि इंडॉलॉजिकल स्टडी नाडी भविष्य ताडपत्रावर कोरून लिहिलेले असते. त्याची भाषा तमिळ असते. ताडपत्रवर कोरून लिहिण्याची प्रथा आता अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ताडपत्रे फारच जीर्ण झाल्याने त्यांची डिजिटल पद्धतीने राखण करून त्यातील मजकुराचा अर्थ तज्ञांकडून माहित करून घेण्याचे कार्य अनेक इंडॉलॉजीकल संस्थांतून केले जाते. त्यासाठी भारत सरकार तर्फे नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट्स. डिपार्टमेंट ऑफ कल्चर - मिनिस्ट्री ऑफ टुरिझम अँड कल्चरतर्फे बरेच धन उपलब्ध करु दिले जाते. पहा www.namami.nic.in त्याशिवाय युनेस्कोच्यातर्फे ही अपार धन विविध शोधसंस्थांना उपलब्ध करुन दिले जातो.

पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाध्यक्षांची 'मिसळपावसाठी' एक धावती मुलाखत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
लेखनविषय:

डॊ.गंगाधर पानतावणे          डॊ.गंगाधर पानतावणे आणि प्राचार्य ठाले पाटील डॉ.गंगाधर पानतावणे    सोबत प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील अमेरिकेत होणार्‍या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक, विचारवंत व समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे यांची आम्ही दि.

नाहि चिरा...नाहि पणती....

सौरभ वैशंपायन ·
लेखनविषय:
सैनिक स्वत: स्वतंत्र विचार करत नाहि. त्याने तो करावा अशी अपेक्षाहि नसते. तो शिस्त पाळतो, सज्ज राहतो. काहि ठराविक शब्दांचा उच्चार झाला कि तो यंत्रवत काम करतो. पण त्याचे मन सुद्धा यंत्राप्रमाणेच निर्विकार असेल का? नक्किच नाहि! युद्धाच्यावेळी त्याचा विचारांवर ताबा नसतो, शत्रुला मारायचे या एकाच विचाराने तो पिसाट झाला असतो. पण शीतयुद्धासारख्या परीस्थितीत वर्षानुवर्षे सतत दक्ष अवस्थेत त्याला ’तिष्ठत’ रहावे लागते. कधी आसामच्या किर्र जंगलात, कधी चटके लावणार्‍या थर किंवा कच्छच्या वाळवंटात आणि कधी-कधी सियाचीनसारख्या जगातल्या सर्वात उंच रणभूमीवर हाडं गोठवणार्‍या बर्फाळ थंडीत, तो सज्ज असतो.

(आसपास)

चतुरंग ·
लेखनविषय:
सुंदर 'खयाली पुलाव' पकवणार्‍या संजोपरावांचा हा असा 'आसपास' वावर बघून आम्हाला काही कळेनासे झाले की हे असे अचानक का व्हावे? आणि त्या स्तंभितावस्थेतच विडंबन आमच्या 'आसपास' भटकून गेले!

भाषाशुद्धी, जडजंबाल लेखन, मराठी भाषेचे मूळ

आजानुकर्ण ·
भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे. मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. काही काळ तिने आवाज केला. पुढे तो थंडावत गेला. दरम्यान या चळवळीला पुरस्कर्ते आणि अनुयायी लाभले ते संख्येने मर्यादितच होते. उच्च जात, आणि उच्च नसले तरी त्याच्या जवळपासचे शिक्षण, या दोन प्रमुख मर्यादा. सर्वसाधारण लोकात तिचे हसे झाले. शुद्धीकृत भाषेची विडंबने झाली. तिला अनुयायांपेक्षा पुरस्कर्तेच अधिक लाभले :) म्हणजे अशा शुद्धीकरणाचा तात्त्विक पुरस्कार करणारे. 'तशा' भाषेत आपले लेखन करणारे फार थोडे होते.

उत्तर शोधायचे आहे!

ॐकार ·
ओशो रजनिश यांच्या संत कबीरांवरील प्रवचनांचे भाषांतर वाचण्याचा योग आला. त्यात ओशोंनी पुढील दाखला दिला आहे - एकदा चार बायका एक प्रसिद्ध सूफी संताकडे ज्ञानप्राप्तीकराता जातात आणि त्याने गुरू बनावे अशी विनवणी करतात. त्यांना त्याच्याकडून ज्ञान म्हणजे काय हे समजून घ्याअय्चे असते. परंतु सूफी संत मात्र तयार होत नाही. त्या बायका तश्याच दाराशी भुकेल्या तहानलेल्या बसून राहतात. अखेर त्याला त्यांची दया येते. तो त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवतो. परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या स्त्रीला शिष्या करून घेण्यास तो तयार होतो.

विडंबनाच्या चर्चेवर विडंबन... मद्यविरहित

तळीराम ·
मिसळपावच्या कट्ट्यावरती विडंबन दिले तू मला टोपणनावे `तूटून' पडलो ओळखले का मला चतुरंग मी, मी प्राजू ती सुशील, लाडू, खेचर येती नाव भिन्न परी एकच यु(क्)ती मतामतांचा पूर तेधवा कट्ट्यावर पातला घाला बंदी ! नको विडंबन मद्याचे तर नकोच चिंतन मिसळ खाऊ या कांद्यावाचून सुमारकेशव पाठ फिरवता, झोप उडे आजला