Skip to main content

वाद

शीर्षक सुचत नाही - २

लेखक बेसनलाडू यांनी रविवार, 17/02/2008 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
'पाडणे' जरी मी तुझे चुकवले होते तोंडावर अमुचे काव्य अपटले होते 'त्या' विडंबनाचे दुःख कराया हलके का उगीच नवखे शब्द प्रसवले होते? लक्षात ठेव ते शेर दोन फसलेले (तू मुळात नुसते शब्द बदलले होते) राहिल्यात मागे नकोनकोशा ओळी ते घाव मी जरी सर्व विसरले होते थेंबातलि कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! नको तुला रे शंकाच तुझ्या कवनाची! बघ खुळे पुन्हा ते लोक हासले होते!!

व्हॉट्स राँग विथ यू मि. राज?

लेखक इनोबा म्हणे यांनी शनिवार, 16/02/2008 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्ताच्या राजू परुळेकर यांनी घेतलेली राज ठाकरे यांची मुलाखत. राज यांनी उपस्थीत केलेल्या परप्रांतीयांच्या मुद्दयावरुन मिडीयावाल्यांनी केलेला पक्षपातीपणा,गुंड उत्तर भारतीय आणि त्यांचे गुंड नेते.महाराष्ट्राला मिळणारी सापत्न वागणूक...आणि बरेच काही (कट्टर मराठी) -इनोबा

मलमूत्र व संस्कृती

लेखक आजानुकर्ण यांनी शुक्रवार, 14/12/2007 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
चौगुले साहेबांच्या विनोदांना उडवण्यावरून मोठी धुळवड झाली आणि वातावरण तंग झाले. अनेकांनी तर त्यांना मलमूत्र ही गलिच्छ वस्तू आहे हे समजू लागल्यापासून मलमूत्र विसर्जनच कायमचे बंद करून टाकले आहे की काय अशी शंकाही माझ्या मनाला चाटून गेली. कित्येकांनी व्यक्तिगत निरोपाद्वारे चौकशी करून चौगुल्यांचे तथाकथित ओंगळ लेखन तुम्हाला कसे आवडते हा प्रश्न केला? मी जबाबदारीने वागावे व उगाच ट ला ट जोडू नये अशीही आगंतुक सूचना झाली. पण हा प्रसंग व काही दिवसांपूर्वी वाचलेले लेख यांच्या घुसळणीतूनच मनात काही विचार आले. फार दिवसांपूर्वी वाचलेल्या एका कथेतील काही भाग आठवतो.

कन्नडा हाडु

लेखक आजानुकर्ण यांनी बुधवार, 28/11/2007 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैवाने काही लोकांच्या मते जगातील सर्वोत्कृष्ट साहित्य उजवीकडून डावीकडे लिहिण्यात येणार्‍या एका भाषेत निर्माण झाले आहे. मात्र आपल्याच इतर भारतीय भाषाभगिनींमधील अनेक साहित्यकृतींकडे सामान्य जनतेचे दुर्लक्षच झाले आहे. हाय! उदा. कन्नड भाषेतील खालील लोकप्रिय गाणे पहा. (बहुतेकांना नुसतेच पहावे लागेल, वाचता येणार नाही. पुन्हा एकदा हाय!) आम्हाला संपूर्ण कल्पना आहे की कन्नड भाषेतील उच्चारांचा गोडवा देवनागरीमध्ये उतरणे शक्य नाही. उदा पत्नी आपल्या पतिला "री" अशी जी गोड लाडिक हाक मारते त्याची री मराठीत ओढता किंवा लिहिता येणे सर्वस्वी कठीण. पण व्याभिचारी आस्वादाला आमचा पाठिंबा आहे.

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

लेखक आजानुकर्ण यांनी गुरुवार, 15/11/2007 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.

खरी मजा आली ती तोडल्यावर!

लेखक गुंडोपंत यांनी रविवार, 21/10/2007 07:20 या दिवशी प्रकाशित केले.
उपक्रमावर विकासरावांनी एक चर्चा सुरू केली आहे, नियमांविषयी! त्याला मी प्रतिसाद दिला. पण नंतर वाटले की हा तेथे फारसा योग्य नाही. म्हणून काही बदल करून येथे द्यावी असे वाटले. मिसळ हीच खरी बंड! त्यामुळे इथेच ते योग्य आहे असे!! :))) आपण ही वेळोवेळी नियम तोडले असतील. काही खरच योग्य नियमही असतील व काही मट्ठ नियम. कधी राग येवून तोडले असतील तर कधी तरी उगीच! मी हे अनेकदा उगाचही तोडलेत. क्वचित प्रसंगी त्याचे वाईटही वाटले आहे. मी वेळो वेळी तोडलेल्या नियमांची नि समाजिक संकेतांची एक छोटीशी यादी दिली आहे खाली. मी तरूण होतो त्यावेळी मनसोक्त जे तोडलेत, हे त्यातले काही नियम! १.

मला आवडणारे आंतरजालावरील असामान्य प्रबोधनात्मक असे काहीसे करणारे अस्सल लेखक

लेखक सहज यांनी शुक्रवार, 21/09/2007 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपट किबोर्ड, उठू दे अक्षरे, दाब बटणे, दीपव डोळे, कीटव कान, जाळ ती बॅन्डवीड्थ अश्या अतीप्रगत आंतरजालाच्या ऋतूमधे प्रतिभेच्या अगणीत छत्र्या (पावसाळ्यात नाही का ते एका प्रकारचे मश्रूम) न उघडतील तर नवलच. कोणी काहीही लिहले तरी ते कूठल्या न कूठल्या एका तरी साहीत्यप्रकारात फीट होतेच नाही का.

मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक

लेखक चित्तरंजन भट यांनी मंगळवार, 18/09/2007 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
सगळेच लेखक आणि कवी चांगले असतात. पण जे माझ्या कंपूतले ते जरा भारीच आहेत. मी प्रियाली, टग्या ह्यांना माझ्या कंपूतले समजतो म्हणून त्यांचं लिखाण, प्रतिसाद मला भारीच वाटतात. आम्ही प्रत्यक्षात भेटलो नसलो तरी आमची मांडवली झाली आहे. त्यामुळेच टग्याची टगेगिरी मला भलतीच आवडते आणि व्यासंगी प्रियालीचे अभ्यासपूर्ण लेख मला भलतेच रंगतदार वाटतात. तसे सगळेच कवी बरे लिहितात. पण "माझ्याएवढं चांगलं कुणी लिहू शकत नाही," हे मी माझ्या तोंडून तर म्हणू शकत नाही ना. समजून घ्या. फार त्रास होतो हो. जाऊ द्या.