Skip to main content

वाद

धुकट सकाळ

लेखक धनंजय यांनी सोमवार, 02/02/2009 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
धुकट सकाळ
(आमच्या गावात नेहमीपेक्षा थोडासुद्धा अधिक बर्फ पडला, तर सगळे काही ठप्प होते. अशा एका सकाळचे हे चित्र) picture (पुढील शब्द वाचण्यापूर्वी, जमले तर ते ऐकावेत - नाहीतर मात्रा/वृत्त या बाबतीत तुम्हाला पटणार नाहीत. **म्हणूनच कविता "वाद" प्रकारात घातली आहे.
Taxonomy upgrade extras

विद्रोही साहित्य संमेलनात उच्चवर्णीय मस्तानी

लेखक कपिल काळे यांनी शनिवार, 24/01/2009 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
कणकवली- सिंधुदुर्ग येथे ३१ जानेवारीला होणारया १० व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या २५ पानी अध्यक्षीय भाषणातील काही पाने काल आमच्या हाती लागली. त्या पानांचा गोषवारा तसेच तिथे मांडले जाणारे काही ठराव इथे देत आहे. पान क्र. १. आज दहाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना मला विशेष आनंद होत आहे. कष्टकरी समाज जो वंचित होता तो आता मुख्य प्रवाहात येण्यासाठी संघर्ष करत आहे. बाबासाहेबांच्या, फुल्यांच्या शाहूंच्या उपकारातून आपला समाज कधीच मुक्त होवू शकत नाही. आपण ज्या समाजातून वर आलो त्या कष्ट्करी समाजाचे प्रतीक म्हणून आपण ह्या संमेलनाचे उद्घाटन गाढव पूजनाने करतो.

आजची मुक्ताफळे (Quote of The Day)

लेखक एकलव्य यांनी शुक्रवार, 09/01/2009 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
काल माझ्या एका जीवलग मित्राने quote of the day असा मथळा देऊन एक वाक्याचा विरोप पाठविला. त्यावर झालेली चर्चा आणि देवणघेवाण येथे मांडत बसत नाही. पण झाले असे की ते वाक्य उगाचच मनात रेंगाळत राहिले. बर्‍याचदा असेच कोणाचे तरी, कोठेतरी ऐकलेले एकच वाक्य मनात घोळत राहते. कधी मन मोहरून जावे असे तर कधी विचारात पडावे असे. कधी अंगाचा भडका उडावा असे तर कधी हसून हसून गडाबडा लोळावा असे. तर कधीकधी उगाचच आवडून जावे असेही. तसेही अलिकडे आपण जगतो ते Sound Bites च्या जगात.

जाहीर विचारणा आणि आवाहन

लेखक घाटावरचे भट यांनी बुधवार, 24/12/2008 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी, मिसळपाववर सध्या नमस्ते सदा वत्सले मातृभूमे........ लैच फार्मात आहे. हा लेख लिहायच्या टैमाला हा धागा उघडून बरोब्बर ७ दिवस आणि ६ मिनिटं झालेली आहेत, त्याची ३१६६ वाचनं झालेली आहेत आणि त्यावर १४३ प्रतिसाद आहेत. आता गम्मत अशी आहे की माझा इतिहास थोडासा कच्चा आहे (आणि संस्थळांचा, विशेषतः मिपाचा इतिहास तर बिल्कूल झीरो) म्हणून मला तुमची मदत हवीये.

इरफान हुसैन

लेखक एकलव्य यांनी मंगळवार, 09/12/2008 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
अंग मोडेपर्यंत आणि डोक्याचा भुगा होईपर्यंत काम करून आता कोठे घरी आलो. लिहायचे खरे तर जीवावर आले आहे... पण हा लेख तुमच्यापर्यंत पोहचवाच असे वाटले म्हणून दोन चार ओळी टंकतो आहे. भारतातील आधुनिक दहशतवादाचे मूळ दुखणे तसे जुनेच आहे. पाकिस्तान हा दहशतवादाचा महाप्रचंड कारखाना आहे... पॉलिटिकली करेक्ट हवे असेल असेल तर पाकिस्तानचे सध्याचे स्वरूप घातक आहे असे म्हणा हवे तर. पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे अगदी जन्मापासून पाकिस्तान अगदी असेच गुण उधळणार याची आणि याचीच लक्षणे दिसत होती. इंग्रजांनी फाळणीला छुपे प्रोत्साहन दिले ते ही अशीच फळे यावीत याच हेतूने.

सुमारांच्या तावडीत...

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 05/12/2008 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर एकदाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (तसे हे पद केवळ राजकीय सोयीचेच, आवश्यक तर नाहीच) ठरले. शत्रूंने चढवलेल्या एका भीषण हल्ल्यातून देशाच्या आर्थिक राजधानीला सावरण्याची वेळ जेव्हा होती तेव्हाच ही राजधानी असलेले राज्य नेतृत्त्वहीन ठेवण्याची किमयाही देशाच्या राजकारण्यांनी साधून घेतली. मुंबईवरील, देशावरील हल्ल्यानंतरचा गेला आठवडा उबग आणणारा ठरला तो राजकारण्यांच्या, आणि केवळ त्यांच्याच नव्हे तर प्रशासकांच्याही, सुमारपणानेच गाजला. राज्यकर्त्यांची कोंडी कशी झाली होती त्याचे हे काही दाखले - १. एखाद हादसा - माजी उपमुख्यमंत्री आर. आर.

अनाम वीरा ...

लेखक मैत्र यांनी मंगळवार, 02/12/2008 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
काल झी वर लहान मुलं अतिशय शांत आणि गंभीर पणे देशभक्तीची गाणी सुरेख म्हणत होती... आणि त्यातच एक होतं - अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत तिथे चिरा ना कुणी बांधिला पेटली न वात... कुसुमाग्रजांचेच शब्द ते! साधे सुधे नव्हेत. पण अजूनही हेच घडतं आणि आजही घडते आहे. गेल्या काही दिवसातल्या प्रतिसादात सर्व शहीदांना अभिवादन करताना मला पुन्हा पुन्हा वाटत होतं की तीन मोठ्या अधिकार्‍यांचा जो राष्ट्रीय गौरव होतो आहे त्यात कदाचित बाकी लहान पदावरच्यांवर थोडा अन्याय तर होत नाही?

डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर...२

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 28/11/2008 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
(आधीच्या भागात – मुंबईवरील हल्ल्याने पुढे येत असलेल्या नव्या परिस्थितीचे आजवरचे आकलन या वरवरच्या मुद्याला धरून तयार झाले आहे, त्याच्या खोलात जाण्याचा विचार याआधी झाला नाही, कारण या वरवरच्या आकलनापोटी हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मानून तो सोडवता येईल असा एक भ्रम तयार झाला होता...) हा युद्धाचा नवा प्रकार आहे. मुंबईच्या हल्ल्यातून या संघटनांच्या हाती एक जबरदस्त प्रभावी हत्यार आले आहे. कसे ते पाहू. १. याआधी होणाऱ्या "दहशतवादी" हल्ल्यांसाठी संबंधित संघटनांना काटेकोर आणि तपशीलवार नियोजन, साधनस्रोतांची उपलब्धता आणि त्यासाठी आवश्यक संघटन उभे करावे लागत असे.