Skip to main content

वाद

आत्माराम की जय

लेखक हर्षद आनंदी यांनी बुधवार, 30/09/2009 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंड्ळी, हिंदु धर्माच्या मान्य तेनुसार "आत्मा" अमर असतो. प्रत्येक आत्मा एका देहाच्या मृत्युनंतर दुसर्‍या देहात प्रवेश करतो.. योनी कुठली का असेना. पण आत्म्याला मरण नाही..

एक पुस्तक वाचताना...

लेखक श्रावण मोडक यांनी रविवार, 20/09/2009 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. आंतरजालावरच एका नव्या संवादाला सुरवात झाली होती. मैत्रीच्या वाटेवरची ती पहिली पावलं. अडखळती. स्वाभाविकच चर्चेचा विषय वाचन, श्रवण, दर्शन या गोष्टींचाच. एका प्रश्नाच्या उत्तरात या मित्रानं त्याच्या वाचनाची यादी सहज समोर ठेवली. मोठी. माझं वाचन खूपच कमी. मग आवडलेल्या पुस्तकांचा विषय निघाला. त्या चर्चेतच उल्लेख झाला 'व्यासपर्व'चा. दुर्गाबाईंचं हे पुस्तक आपल्याकडं होतं हे आठवून गेलं. आपल्या संग्रहातील काही, बर्‍याच किंवा अनेक पुस्तकांचं जे होतं तेच या पुस्तकाचंही झालं होतं. ते कपाटातून गायब होतं. ते गायब झाल्याचं आधीही ठाऊक होतंच.

आणि हो.. मी दि रायडर झालो!

लेखक टारझन यांनी शुक्रवार, 18/09/2009 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , वाचताना घेवयाच्या खबरदार्‍या : १. इनोंचं पोतं घेऊन बसा .. लेख वाचून आपली जळजळ अंमळ वाढू शकते. २. विरामचिन्हे व्याकरण वगैरे आम्ही फाट्यावर मारतो .. आणि हो आपण हे, जाणताच ३. लेख वाचण्यासाठी प्रिरिक्विसाईट माझ्या विडंबणांच्या रिओपनिंगच्या निमित्ताने माझ्या ब्लॉगवर लिहिलेला हा लेख.... जसाच्या तसा इथे स्वतःची बाईक असावी अशी प्रत्येकाची इच्छा असती, माझीदेखील होती,त्यामुळे ११वीत गेल्यावर जेव्हा घरी सायकल आली तेव्हा बाईक कशी आणता येईल हाच विचार मनात होता.

पैशाने पैसा वाढतो.

लेखक सदानंद ठाकूर यांनी रविवार, 05/07/2009 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
पैशाने पैसा वाढतो. जर पैसे मिळवणे हा जन्मसिध्द हक्क प्रत्येकालाच प्राप्त आहे हे तुम्हाला मान्य असेल तर तुम्हाला हेहि मान्य करण्यास हरकत नसावी कि एका सर्टन स्टेज नंतर पैसा सुध्दा पैसे मिळविण्याचे काम करु शकतो. आता हेच पहाना प्रथमतः आपण पैसे ममळवण्यासाठी काय काय करतो ते वेगळ सांगावयाची जरुरि नाही तुम्ही ते केलेलेच आहे व अनुभवले सुध्दा आहे. आता तुम्हि थोडे स्टेबल झाला आहात. थोडी बचतहि करु लागला आहात.

जवाबः शहरातला आणि खेड्यातला मुलगा

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 21/05/2009 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
पाषाणभेद यांनी शहर किती वाईट आणि खेडं किती चांगलं हे इथे सांगितलं आणि मग मी विचार केला का बरं लोकं एवढं चांगलं खेडं सोडून शहरात येत असतील?

जे मला दिसले ते

लेखक दशानन यांनी रविवार, 26/04/2009 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
वाकडा कंपु तिकडी चाल सगळे भरती माल रिते आमची झोळी शब्दांवाचूनी यार प्रतिसादांच्या लढाईमध्ये एकाची वरताण तर दुसरा घासे वहाण ह्या दारातून त्या दारावर प्रतिसाद बद्दल प्रतिसाद शब्दांना विके कोणी शब्दांसाठी लिहतो एकच बाकी +१ सगळे मागोमाग भार लिहतोय कोण भांडतोय कोण शब्दांना वेठिस धरतोय कोण एक खवाट बाकी सुसाट डुप्लिकेट आयडीचा नेहमीच सुळसुळाट एक नारी नाव धरे भारी हवा दिसे तीज विषारी शब्दांत तीच्या जळजळाट फार तळपते सोडून विषय पार !

तिच्या नजरेतून...

लेखक श्रावण मोडक यांनी रविवार, 08/03/2009 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
(तीन महिन्यांनी हा संवाद पुढे आणतो आहे. मधल्या काळात तो (माझ्याचलेखी) अनेक रास्त आणि वाजवी कारणांसाठी मांडलेला नव्हता.)
---
थेट काश्मिरातून प्रा. अस्मा जहांगीर (अर्थातच, वास्तव नाव वेगळे) पुण्यात आल्या होत्या, एका अभ्यासासाठी. स्त्रीविषयक मुद्दे हा विषय अभ्यासाचा. स्त्री (आणि पुरूष) ही केवळ जीवशास्त्रीय घटना आहे की, सामाजिक संकल्पना (सोशल कन्स्ट्रक्ट) आहे असा पहिलाच प्रश्न विचारून ही तरुणी अनेकांची दांडी उडवत असावी.

<<ती>>

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 04/03/2009 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक अबक दुबक अबक दुबक अबक दुबक करीत ती निघाली...... स्वतःशीच हसत पर्सच्या बन्दाशी उगाचच चाळा करत...... रस्त्यातून जाणारांचे श्वास अद्धर राहिले.