Skip to main content

आमची मुंबई

लेखक सातारकर यांनी बुधवार, 05/11/2008 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
Wikipedia वरती, अनेक ठीकाणी मुंबई (Mumbai) ऐवजी Bombay असा शब्द वापरलेला आहे. कोणी माहीती देता का.. या सदरात मी स्वातंत्र्यवीरांवरील माहीतीची वानवा आहे हे सांगितलेच आहे, तिथेच हेदेखील लिहीले आहे. फक्त तिथे ह्याविषयी सविस्तर लिहायच राहून गेल म्हणून ईथे परत लिहीत आहे. जर मिपावरील प्रत्येकानी थोडे जरी बदलले तरी सगळ्या Wikipedia वरील बदलाला वेळ लागणार नाही. हे करण्यासाठी Wikipedia वर आपल्याला पुढील गोष्टी कराव्या लागतील. १. Wikipedia वर खाते तयार करा (ह्याची सक्ती नाही, ह्याशिवायदेखील काम होत. पण त्या वेळेला आपल्या संगणकाच्या IP ची तिथे नोंद होते) २.

पुस्तक परिचय : कोसळेपर्यंत

लेखक निमीत्त मात्र यांनी रविवार, 02/11/2008 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव घेणाऱ्या महाराष्ट्रातील विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील उन्हाळ्याचे चटके चित्रित करणाऱ्या कवितांची दाटीवाटी असलेला प्रा. राजेंद्र दास यांचा "कोसळेपर्यंत' हा कवितासंग्रह, एका विशिष्ट लयीत सामाजिक आशयाचे भान ठेवून बापूजी (म. गांधी), ज्योतिबा फुले, येशू ख्रिस्त यांच्या दुःखालाही गवसणी घालण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या कविता वाचकाला विचारमग्न करतात. "दुष्काळ' ही अभंग छंदातील कविता अतिशय मर्मभेदक आहे. कोरडी नक्षत्रे। मातीला मरण।। पेटले सरण। जितेपणी।। ही त्यांनी व्यक्त केलेली भुईची भावना अतिशय वेधक आहे.

"झुंजुमुंजु" चा दिवाळी अंक.

लेखक रामदास यांनी बुधवार, 29/10/2008 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
आपले मिपा सदस्य श्री.उदय तानपाठक यांचा दिवाळी अंक "झुंजुमुंजु" प्रकाशीत झाला आहे.श्री. तानपाठक केवळ हौशीपोटी आणि मराठीच्या प्रेमापोटी दरवर्षी हा अंक प्रकाशीत करतात.(दिवाळी अंकाचे अर्थशास्त्र सर्वसाधारणपणे तूटीच्या अंदाजपत्रकाचे असते). आपली नोकरी सांभाळून वेळच्यावेळी ,चुका टाळून,(मराठीतील एका लोकप्रिय दिवाळी अंकात प्रकाशक एक पान घालायचे विसरले आहेत.),रास्त किमतीत हा दिवाळी अंक त्यांनी आणला आहे. आता या अंकाच्या खास गोष्टी.

कहाणी एका जिद्दीची.....

लेखक विकी शिरपूरकर यांनी शनिवार, 25/10/2008 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
खान्‍देशातील जळगाव जिल्‍ह्याच्‍या पूर्वेकडे वसलेले सुमारे 50 हजार लोकसंख्‍येचे तालुक्‍याचे गाव अमळनेर. अवघ्‍या महाराष्‍ट्राची मायमाऊली म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या मातृहृदयी साने गुरूजींची कर्मभूमी आणि वारकरी संप्रदायाची पताका डौलाने फडकावणा-या संत सखाराम महाराजांची अध्‍यात्‍मनगरी. स्‍वातंत्र्य आंदोलकांची आणि अध्‍यात्मिक वृत्तीच्‍या लोकांची दीर्घकालीन परंपरा जशी या शहरात रूजली तशीच या गोष्‍टींपासून शेकडो मैल दूर असलेली किंबहुना समाजाचा अविभाज्‍य भाग असूनही गावकुसाबाहेर राहिलेली आणखी एक संस्‍कृती येथील 'बोरी' नदीच्‍या किना-यावर रूजली आणि वाढलीही.

मराठी तरुणांसाठी नोकरी-उद्योग देणारा वेबमंच

लेखक अभिरत भिरभि-या यांनी बुधवार, 22/10/2008 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी तितुका मेळवावा. महाराष्ट्र धर्म वाढवावा सध्याच्या काळात मराठी तरुणांसाठी रोजगार हा ज्वलंत प्रश्न बनल्याचे दिसते आहे. ही नाराजी ग्रामीण व शहरी अशा दोन्ही स्तरावर जाणवते आहे. बर्‍याचदा आपण आपल्या नोकरी / व्यवसायाच्या निमित्ताने खुल्या झालेल्या जागा दिसतात; पण तुमच्या परिचयाचा कोणी उमेदवार माहिती नसल्याने ही संधी लायक व गरजु तरुणांपासुन वंचित राहते. मिपावर आपण आपली भाषिक/सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी येथे येतो. अप्रत्यक्षपणे येथे नेटवर्क तयार होते.

वाचा आणि थंड बसा

लेखक भोचक यांनी मंगळवार, 21/10/2008 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या 'नई दुनिया' या इंदूरमधील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्रात आलेल्या अग्रलेखाचा मराठी तर्जुमा. वाचा आणि थंड बसा. केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांनी मुंबईत रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी राज ठाकरे यांना मनोरूग्ण असे संबोधले आहे. लालू यांनी संतापाच्या भरात हे वक्तव्य केले असले तरी राज यांना 'मनोरूग्ण' म्हटल्याने त्यांनी केलेले गुन्हेही कायद्याच्या कक्षेत माफ ठरतात हे लालू विसरलेले दिसतात. कारण कायदाही तेच सांगतो. राज यांनी केलेला गुन्हा हा काही कोणत्याही व्याधीतून आलेला नसून ती एक अतिशय नियोजनबद्ध कृती आहे.

आपल कोल्हापुर

लेखक झकासराव यांनी बुधवार, 15/10/2008 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, कोणी जर कोल्हापुरला फिरायला जात असेल तर त्याला काय काय बघाव ह्याची लिमिटेड लिस्ट माहिती असते. ह्यातच जर अजुन काहि भटकंती करणार्‍या लोकाना फार प्रसिद्ध नसलेल्या जागांविषयी माहिती कशी द्यावी?? किंवा मला तरी सगळ्या कोल्हापुरतील जागा माहित आहेत का?? मी प्राथमिक शाळेत असताना आमची एका दिवसाची सहल जात असे. अशा सहलीत मी कात्यायनी, खिद्रापुर अशा फारशा प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणी देखील जावुन आलो आहे. ही ठिकाण बाहेरच्या (कोल्हापुरच्या बाहेरच्या लोकाना जे तिकडे पर्यटनाला येतात) कोणालाच विशेष माहिती नसतात. मग त्याची माहिती कशी मिळेल. आपल्याकडच्या पर्यटन खात्याबद्दल काहि न बोललेलच बर.

माझे सत्याचे प्रयोग

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 02/10/2008 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
टिपः सदर लेखातील हिरव्या रंगातील तिरपी अवतरणे मुस्त सारांश आहे. भाषांतर नाहि मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस पोरबंदरला आजच्या दिवशी जन्माला आला. पुढे हा मुलगा शिकला, आफ्रिकेला गेला. तिथल्या वंशभेदाबरोबर लढला, आफ्रिकेत प्रसिद्धी मिळवून जेव्हा हा माणूस भारतात परतला तेव्हाही भारत पारतंत्र्यातच होता. टिळकांच्या नसण्याने संपूर्ण भारताला एकत्र बांधणार्‍या नेत्याची कमी होती.