लेखकसंताजी धनाजीयांनी गुरुवार, 26/03/2009 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी,
एक आवाहन!
२८ मार्चला जगातील ८५ देशातील नागरीक रात्री ८:३० ते ९:३० ह्या वेळात जागतिक तापमानवाढीविरुद्ध जनजाग्रुतीसाठी दिवे बंद ठेवणार आहेत. अधिक माहीती येथे वाचा...
http://www.earthhour.in
- संताजी धनाजी
लेखकबिपिन कार्यकर्तेयांनी बुधवार, 25/03/2009 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या घरच्या डिशटिव्हीच्या कनेक्शनचे काहीतरी लफडे झाले आहे. वृत्त वाहिन्यांमधे फक्त झी२४तास आणि आयबीएन-लोकमत या दोनच वाहिन्या उपलब्ध आहेत. 'समथिंग इज बेटर दॅन अज्जिबात नथिंग' या न्यायाने सध्या आयबीएन-लोकमतच बघत असतो. नाविलाज आहे. पण परवा अचानक एक चांगला कार्यक्रम बघायला मिळाला.
'ग्रेट भेट' नावाचा एक कार्यक्रम असतो. त्यात आयबीएन-लोकमतचे सर्वेसर्वा निखिल वागळे हे प्रसिद्ध आणि महत्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती घेतात. परवाच्या कार्यक्रमात अतिशय जुने आणि वरिष्ठ राजकारणी डॉ. एन. डी. पाटिल यांची मुलाखत घेतली गेली.
लेखकप्रकाश घाटपांडेयांनी रविवार, 08/03/2009 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
समाजात काही उपक्रम चालु असतात. काही बंद पडतात काहींचे पुनरुज्जीवन होते. अशाच एका उपक्रमाची माहिती देत आहे. समाजस्वास्थ्य या नुकत्याच चालू झालेल्या ट्रस्टचा मी हितचिंतक आहे. माझे मित्र डॉ प्रदीप पाटील या समाजस्वास्थ्य द्वैमासिकाचे संपादक आहेत. काही सुचना असल्यास स्वागतार्ह आहेत. माझ्यापर्यंत पोहोचवल्यास मी त्या ट्रस्टला पोहोचवीन.
समाज स्वास्थ्य
मानव समुहात राहतो. समाज घडवतो. समाज टिकवतो. समाज टिकवताना तो अनेक प्रश्नांना तोंड देत जगतो. त्या त्या प्रश्नांची सोडवणुक करताना आचार- नीती नियम -संस्कृती उदयास येतात.
लेखकभोचकयांनी मंगळवार, 24/02/2009 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
इंदुरातील मराठी माणसांची सांस्कृतिक चळवळ म्हणून ख्यात असलेल्या सानंद या संस्थेतर्फे सोमवारी (ता.२३) लिटिल चॅम्प्सचा सुंदर कार्यक्रम इंदुरमध्ये झाला. महाराष्ट्रातील मोजक्या शहरात कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच या चॅम्प्सना इंदुरात आणले होते.
सानंद या संस्थेने या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष सुधाकर काळे आणि सचिव जयंत भिसे ही दोन माणसे 'सांस्कृतिक' दृष्ट्या झपाटलेली आहेत. त्यांनी या कार्यक्रमासाठी खूपच कष्ट घेतल्याचे जाणवत होते. या कार्यक्रमात या लिटिल चॅम्प्सने यापूर्वीच सादर केलेली गाणी सादर केली. पण लोकांना त्यांच्या गाण्यांपेक्षाही त्यांना डोळ्यात साठवून घ्यायचे होते.
लेखकविसोबा खेचरयांनी शुक्रवार, 23/01/2009 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो,
आंतरजालावर उत्तमोत्तम पाककृतींचे आज अनेक ब्लॉग्ज उपलब्ध आहेत. तिथे मुशाफिरी करतांना विविध पाककृतींनी नटलेला, खाद्य संस्कृतीची सुंदर उधळण करणारा असा एखादा ब्लॉग सहजच दृष्टीस पडतो आणि डोळ्याचं पारणं फिटतं, जीव तृप्त होतो!
हे सदर केवळ अश्या ब्लॉगांसाठीच!
लेखकनितिन थत्तेयांनी शुक्रवार, 09/01/2009 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर अनेक लेखकांनी गांधी (महात्मा) या विषयावर विपुल लेखन केले आहे. स्वतंत्र भारताच्या वाटचालीवर दूरगामी परिणाम करणर्या नेहरूंवरही लिखान करण्याची शिफारस करतो.
कोणी लिहिले नाही तर मी लिहिन
लेखकघाटावरचे भटयांनी बुधवार, 24/12/2008 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी,
मिसळपाववर सध्या नमस्ते सदा वत्सले मातृभूमे........ लैच फार्मात आहे. हा लेख लिहायच्या टैमाला हा धागा उघडून बरोब्बर ७ दिवस आणि ६ मिनिटं झालेली आहेत, त्याची ३१६६ वाचनं झालेली आहेत आणि त्यावर १४३ प्रतिसाद आहेत. आता गम्मत अशी आहे की माझा इतिहास थोडासा कच्चा आहे (आणि संस्थळांचा, विशेषतः मिपाचा इतिहास तर बिल्कूल झीरो) म्हणून मला तुमची मदत हवीये.