तुम्ही किती व्यवस्थित आहात?

आजकाल व्यवस्थितपणाचा रोग खूप पसरू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील बरेच (***) टक्के लोक आजकाल व्यवस्थित होऊ लागले आहेत. कित्येक लोकांना तर कळतही नाही कधी आपण व्यवस्थित झालो आणि कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो व पुन्हा अव्यवस्थित होणे फार अवघड होऊन बसते. ही खालची प्रश्नावली तुमची आत्ताची लेव्हल कळण्यासाठी उपयोगी पडेल. खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमधे तुमचे उत्तर "अ" असेल तर प्रत्येकी १००० गुण, "ब" असेल तर प्रत्येकी १०० गुण व "क" असेल तर प्रत्येकी १ गुण धरा व शेवटी बेरीज करा. प्रश्नावली सोडवण्याआधी: हे पान प्रिंट करा व नीट ठेवून द्या.

जहालभाषाचिकित्सक

जहालभाषाचिकित्सकची पार्श्वभूमी सांगाल का? प्रत्येक देशाचे, भागाचे, तिथे राहाणाऱ्या लोकांचे काही विशेष गुणधर्म असतात. तिथल्या जमिनीच्या मातीतून आणि नद्यांच्या पाण्यातून माणसांच्या नसानसांत वहातात. त्यातूनच त्या प्रांताची एक प्रतिमा तयार होते. महाराष्ट्राची तशी प्रतिमा फार मऊ मुलायम नाही असं नक्कीच म्हणता येईल. गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचं वर्णन करताना मंगल, पवित्र वगैरे नमन करून झाल्यावर पहिली ओळ कुठची वापरली तर 'राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा' आणि 'अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा' असं म्हटलेलं आहे.

शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत

शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत
नमस्कार श्रोतेहो. आज आपल्या स्टूडीओमध्ये ग्रामीण भागातले शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी आलेले आहेत. त्यांच्या कादंबर्‍या, लेख, कथा, निबंध प्रसिद्ध आहेतच तसेच कवितांचे पीक ते जोमाने दर हंगामात घेतात. पंचक्रोशीतील इतर शेतकवी त्यांच्या उत्पादनातून नेहमीच प्रेरणा घेत आलेले आहेत. त्यांच्या शेतसाहित्याविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत.

पत्रिका

दर रविवारप्रमाणे हाही रविवार आला किंवा 'उजाडला' म्हणा. कारण रविवारी उन्हं वर आल्याशिवाय योगेशराव कधी उठल्याचं आठवत नाही असं त्यांच्या सौ. योगिनीबै वेळ मिळेल तेव्हा आणि येईल त्याला, तिला ऐकवत असत. तर, आजच्या रविवारी काहीतरी मस्त मेनू ठरवावा हा विचार करत योगेशराव हॉलमधल्या सोफ्यावर लोळत पडले होते. खरंतर मेनू काय ठरवावा यापेक्षा तो आपल्या अर्धांगिनीला कसा सांगावा याचा विचार अधिक चालला असावा. कारण रविवारचा असा काही प्लान ऐकला की योगिनीबैंचा ठरलेला ट्रॅक होता, तो वाजायला सुरु व्हायचा. म्हणजे,'मी माझा सैंपाक करुन घेते, मग आणा काय हाडं चघळायला आणायची असतील ती !! रविवार म्हणजे मेलं नुसतं वाढीव काम.

गँग्ज ऑफ वासेपुर

'अनुराग कश्यप डोक्यावर पडला आहे' इथपासून ते 'येवढा चित्रपट लोकांनी का नाकारला?' अशा दुसर्‍या टोकाच्या प्रतिक्रियेपर्यंतच्या गप्पा 'गँग्ज ऑफ वासेपुर' ह्या चित्रपटाबद्दल ऐकत होतो. स्वतः अनुराग कश्यप आणि ज्यांना चित्रपटातले नक्की कळते (आसे आम्हाला वाटते) अशा दोन चार समीक्षकांनी देखील वासेपुरचे कौतुक केल्याने, आता नक्की भानगड आहे तरी काय हे बघणे आलेच होते. काल मग एकदाचा हा चित्रपट पाहिला. चित्रपटाची कथा म्हणाल तर एका वाक्यात संपणारी आहे.

(टुकार, बेक्कार आणि बकवास गाणी)

(टुकार, बेक्कार आणि बकवास गाणी) सध्या काही धागे वाचण्याचा आणि ते वाचून कंटाळा येण्याचादेखील कंटाळा आला आहे. बरेच चित्रपट येतात जातात, बर्‍याचदा गाणी बकवास की चित्रपट अधिक बकवास हा प्रश्न पडतो. पिच्चरमध्ये चांगली सोन्ग्स असतात आणि बकवास, टुकार आणि टाकावू सोन्ग्स ही असतात आणि का असतात असे होते.. मला एक librari बनवायची आहे, असली गाणी चुकूनही पुन्हा ऐकणार नाही याची काळजी घेण्यासाठी. मिपाकर मदत करतील अशी अपेक्षा आहे माझ्याकडून कांही गाणी, १) मै तो रस्ते से जा रहा था.. २) मेरे बाप का बेटा मुझे भाई बोलता..

डास व त्याचे चावणे

आज या धाग्याच्या निमित्ताने एका सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडत आहे. विषय आहे डास व त्याचे चावणे. हसू नका किंवा धाग्याला नाक देखील मुरडू नका. त्याचप्रमाणे हा धागा एकोळी-बहूओळी, गणपतीला स्वेटर, गुलाबजामाच्या पाकाचे काय करायचे, सोफा, फुडप्रोसेसर कसा घ्यावा असा वर्गीकृत करू नका. डास, त्याच्या चावण्याने होणारे आजार, मलेरिया या कारणांमुळे सरकारे, महानगरपालिका, पालिका, ग्रामपंचायती, गल्या, कॉलन्या, आपली घरे व पर्यायाने आपण सर्वसामान्य जनता वैतागून त्याचप्रमाणे हादरून जातात.

नियती ? नाय नाय टेंपोवरती!

लेखनविषय:
प्रेरणा : नियती ( http://www.misalpav.com/node/21857) रक्ताळलेल्या प्रार्थना या अत्यंत प्रभावी कवितेतून इथे पदार्पण करणार्‍या हजाक या कविश्रेष्ठांची ही दुसरी कविता नक्की कोणत्या त्रासामुळे अशी निर्मिती होते?

वेताळाचे प्रश्न

बर्‍याच काळाने आमचा नान्या सक्रिय राजकारणात परत आला, आणि आमचा आनंद बाटलीत मावेनासा झाला. तोबताबड आम्ही आमच्या चौपाटीवरती प्यार्टी आयोजीत केली. सगळी चौपाटी सजली होती, बार टेंडर, कॅप्टन, वेटर सगळे नवीन धुतलेले कपडे घालून सेवेला हजर झाले होते, मात्र नान्याच्या चेहर्‍यावरती उदास उदास भाव दाटून राहिले होते. गप्प गप्प नान्या काय मला बघवेना. शेवटी गुमसुम मध्ये २ पेग झाल्यावरती मी नान्यावरती सरळ डाफरलोच. मी :- नान्या, काय मयतीला जौन आला बे ? असा का बसला आहेस ? नाना :- पर्‍या काय सांगू तुला ? मला ४ दिवस झाले वेताळाने पकडले आहे.
Subscribe to प्रश्नोत्तरे