मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रकटन

ऑनलाईन कट्टा - शनिवार २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ)

मनो ·
मिसळपावकर श्रीरंग_जोशी यांनी सुचवल्याप्रमाणे ऑनलाईन कट्टा हा झूम ऍप द्वारे करण्याचा प्रयोग या विकांताला करणार आहोत. आत्तापर्यन्त प्रचेतस, भक्ती, श्रीरंग जोशी, चित्रगुप्त यांनी जमेल असे सांगितले आहे, श्री. अरविंद कोल्हटकर याना उद्या मी स्वतः विचारून पाहतो. एकंदरीत वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्वान मंडळींच्या भेटीची ही संधी जरूर साधावी. तांत्रिक बाबी - ०) शनिवार दिनांक २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ) अमेरिकेत २२ मे, सकाळी ९.०० (pst) आणि १२.०० (est) १) झूम अँप फोनवर किंवा लॅपटॉपवर असेल तर उत्तम. फक्त ब्राऊसरमधून देखील झूम वापरता येते, पण थोडे गैरसोयीचे आहे.

मन आणि मांस

अनुस्वार ·
मनाला मांस असते का? आपल्या सगळ्याच अवयवांत मग अगदी मेंदूपासून ते पायाच्या करंगळी पर्यंत मांस असते. आणि मन, ते कशाचे बनलेले असावे? कुठे पडला, ठेच लागली, वार झाला की माणूस जखमी होतो. थोडक्यात आपल्या मांसाला धक्का लागतो. कधी एखादा लचकाही तुटतो. पुढे जखम भरते म्हणजे गमावलेले किंवा बिघडलेले मांस पूर्ववत होते. जखमा मनालाही होतात असं ऐकलंय मी. अनुभवलं सुद्धा! मग तेव्हा कोणत्या मांसाला धक्का लागतो आणि मन जखमी होते? जखमी व्हायचं असेल तर मांस असणे आवश्यक आहे. म्हणजेच मनाला मांस आहे. आपल्यात नाही एवढेच. आपल्या प्रियजनांच्या जखमांनी आपल्या ही मनाला वेदना का व्हाव्यात?

ऊन हळदीचे आले.....

सरनौबत ·
ऊन हळदीचे आले..... मे महिन्यातली दुपार. कामानिमित्त डेक्कनला जायचं होतं. ऊन नुसते मी (खरंतर आम्ही!) म्हणत होते. कमी गर्दी म्हणून कर्वे रोड ऐवजी प्रभात रोडने निघालो. उन्हाने जीव हैराण झाला होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. थंडगार नीरा प्यावी असा विचार आला... आणि अचानक तो दिसला!!! सगळे विसरून मी पहातच राहिलो. उन्हाच्या तडाख्याचा विसर पडला. दुपारचा तीव्र सूर्यप्रकाश पिवळ्या फुलातून खाली पडेपर्यंत कोवळा होऊन जात होता. झाडाखालची जमीन तर पिवळी धमक झाली होती. वाहवा! हाच तो राजवृक्ष बहावा. फुलांनी गच्च बहरून आलेला बहावा पाहून मन अगदी मोहरून गेलं.

तर...

अनुस्वार ·
मळभ हटले की सूर्य सापडतोच असं नाही. तोवर रात्रही झालेली असू शकते. प्रकाश वाट्याला आला की तो मनाप्रमाणे नसतो उधळायचा. आपलं मन म्हणजे खोल गुहा- उभी की आडवी ते नाही माहीत. कदाचित दोन्हींच मिश्रण असावं. त्यामुळेच तर कधी खूप खोलात गेल्यासारखं वाटतं तर कधी खूप मागे. कुठून आणायचा मग इतका सारा प्रकाश, स्वत:चं मन पादाक्रांत करायला? बरं गुहेचं हे भारी असतं नाही- बाहेरून कितीही आग लागू देत, आतला अंधार अचल, अविरत आणि जवळपास अजिंक्य! म्हणून सूर्य माथ्यावर असला की डोक्यात अंधारात चाचपडायचं बळ आणि अनुभव दोन्ही गोळा करावा. ज्यांनी वचन दिलं नाही त्यांना गृहीत का धरावं? उद्या पृथ्वी फिरलीच नाही तर...

तदेव कर्म कुर्वीत ह्येन आत्मा संप्रसीदति

सुबोध खरे ·
तदेव कर्म कुर्वीत ह्येन आत्मा संप्रसीदति कोव्हीड काळातील तीन अनुभव १) आमचे एक कौटुंबिक परिवार( family friend) मित्र. नवरा आणि बायको उच्च शिक्षित आणि दोघेही बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर. माझी पत्नी त्यांची फॅमिली डॉक्टर. आमची मैत्री बऱ्याच वर्षांपासून १३-१४ पेक्षा जास्त. एक दिवस हि मैत्रीण माझ्या पत्नी कडे आली आणि सांगू लागली, आमच्या बाबांचे इच्छापत्र (will) केलेले आहे. त्यावर त्यांनी हे इच्छापत्र (will) मानसिक सुस्थितीत असताना केलेले आहे अशी डॉक्टर म्हणून तुझी सही पाहिजे.

कटितटपीतदुकूलविचित्र.....

आजी ·
"शब्द हे शस्त्र आहेत", हे वचन आपण सगळेच नेहमी ऐकतो. शब्द हे जपून वापरा, ते फार सामर्थ्यवान असतात. त्यांचा अर्थ तर काही वेळा माणसाच्या मनाचा (माझ्या मते जीभेचाही) चेंदामेंदा करतो. मला अनेक शब्द कोड्यात टाकतात. त्यांचे अर्थ तर मला कळत नाहीतच पण त्यांचे उच्चारही कठीण वाटतात. काही शब्द उच्चारताना तर जीभ वळतच नाही."चटईला टाचणी टोचली" किंवा "काळे राळे,गोरे राळे,राळ्यात राळे मिसळले." सारखी अवघड शब्दरचना नाही हं! पण अनेक शब्दांचे उच्चार आणि अर्थ मला गोंधळात टाकतात. माझी एक लहानपणीची मैत्रीण होती. ती खूप सावकाश शब्द उच्चारायची.

पुस्तक परिचय - फुले आणि मुले

चांदणे संदीप ·
लॉकडाऊनसारख्या नीरस काळात घरात बसून काय करावे हा प्रश्न दर दोन दिवसांनी वळवाच्या पावसासारखा गडगडत धावत येतो. घरातली कामे, पाककृतींचे प्रयोग, मुलांसोबत खेळ-मनोरंजन, चित्रपट या सगळ्यांचाही काही काळानंतर तिटकारा येतो. घरातली पुस्तकेही परत परत वाचून झालेली असल्यामुळे ती हातातही धरवत नाहीत. काय नवीन करायचं हा प्रश्न सतत छळत असतो. माझंही आजच्या रविवारी असंच झालं. अशातच एक पुस्तक हाती आले. आचार्य अत्रे यांचे "फुले आणि मुले." नावावरूनच लक्षात येतं की हे पुस्तक लहान मुलांसाठी आहे. आधी कित्येक वेळा वाचलं असलं तरी आता मुलांना वाचून दाखवायच ह्या हेतूने वाचायला घेतलं तर शेवटचं पान वाचूनच खाली ठेवलं.

आभार

विनायक प्रभू ·
नमस्कार, सतत दर ३०सेकंदाला कानावर पडणार्‍या 'ब्रेकींग न्यूज' ने सुन्न झालेल्या मनाला काहीतरी दुसरा विषय द्यावा म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन काँग्रेस समोर दिलेल्या भाषणाची प्रत काल वाचायला सुरुवात केली. ते त्यांच्या राष्ट्रीय नेत्यानी दिलेले भाषण अशीच भूमिका मनात असल्याने वाचताना थोडा सैलावून वाचत होतो. अचानक एक ओळखीची वाचावी अशी फ्रेज 'a once-in-a-generation investment' डोळ्यासमोर आली आणि मी भारतात परत आलो. आरोग्य -शिक्षण -रोजगार या क्षेत्रातल्या येऊ घातलेल्या काही बदलांबद्दल पुढे बरेच काही लिहिले होते पण मला हे नक्कीच जाणवले की हे आपल्याला काही नवे नाही.

कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची

पाषाणभेद ·
कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची चेहरापुस्तकावर पोळी आणि चपाती यापैकी योग्य मराठी शब्द कोणता यावर वाद झडत असतांना इतिहासाची पाने चाळतांना काही ऐतिहासीक पुरावे हाती लागले. त्यातील एक संदर्भ म्हणजे, संस्कृतग्रंथ "भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) . सदर ग्रंथ संत पाषाणभेद ( जन्मसाल: उपलब्ध नाही, मृत्यू: शके १६६१ किंवा ६२) यांनी लिहीलेला आहे. ( "भुकंबलीतम: - वेदोपदेश" ग्रंथ प्राकृतात अनुवाद दगडफोड्या यांनी "भुकबळी" या नावाने केला आहे. (रचनाकालखंड उपलब्ध नाही.) (सदर दोनही ग्रंथांची उपलब्धता अतिशय दुर्मीळ आहे.

मुंबई सागा: काल, कथा आणि कलेचे मातृभगिनी एकत्रीकरण

सुरिया ·
डॉन लोकांना मुंबईचे प्रेम अफाट. कींबहुना डॉन फक्त मुंबईवरच राज करतात, ऐकलात का कधी चैन्नैचा डॉनाण्णा कींवा कोलकात्याच्या डोनबाबू? भाई किंवा डॉन शोभतो मुंबईतच. मग अशा ह्या मुंबैतल्या बॉलीवुडाला मुंबैच्या गँगस्टरांचे प्रेम जरा जास्तच. कसा का असेना, काही का करेना आणि कसा का मरेना, पिक्चरमध्ये त्याला हिरो बनवणे म्हणजे गल्ल्याची फुल्ल वसूली.