Skip to main content

जीवनसाथी

लेखक आकाश खोत यांनी मंगळवार, 27/04/2021 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी इंग्लंडच्या राणीचे पती, प्रिन्स फिलिप यांचा वयाच्या ९९व्या वर्षी मृत्यु झाला. राणीचे पती असूनही त्यांना राजा नव्हे तर प्रिन्सच म्हटले गेले, तो एक वेगळाच विषय. त्यांच्या शाही इतमामात झालेल्या अंतिम संस्काराच्या कार्यक्रमाचे सविस्तर वृत्तांकन झाले. त्यात इंग्लंडच्या राणीचा कोव्हीडच्या मर्यादेमुळे इतरांपेक्षा वेगळे आणि एकटेच बसलेला फोटो पाहुन मन हेलावले. त्या राणीचे स्वतःचे वय ९५ आहे. राणीच्या आणि प्रिन्स फिलिप यांच्या लग्नाला ७३ वर्षे होऊन गेली. ७३. माझ्या वयाच्या दुपटीपेक्षाही काही वर्षे अधिक.

आमचीबी आंटी जन टेस

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 26/04/2021 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमचीबी आंटी जन टेस गावात कायबी काम नव्हतं आजकाल. सगळे निसते बशेल. कोरूनामुळं नाम्याचं रसाचं गुर्‍हाळबी बंद पडेल व्हतं. त्येच्यायच्या त्या कोरूनाच्या. सकाळ संध्याकाळचा आमच्यावाला आड्डा आसा बंद पडेल. वावरातबी कांदे काढेल व्हते, आन या येळेला भाव काय मिळाला नाय. टॅक्टरचा हप्ता घरातून द्यावा लागला, आता बोला. या कोरूनाची आंटी जन टेस करून घ्या, आंटी जन टेस करून घ्या म्हनून मलेरीया डाक्टर आन आशाबाई गावात फिरत व्हती. मलेरीया डाक्टर लई बाराचं हाय बरं का आमच्या आरोग्य शेंटरवरचं. कायम आशाबाईला बरूबर घेवूनच फिरतं लेकाचं.

सध्या मी काय पाहतोय ? भाग ५

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 24/04/2021 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
समांतर :- सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर [ कादंबरी ] आधारित ही मराठी आणि हिंदीत असलेली वेब सिरीज एक मास्टर पीस आहे. मी ही पहिल्यांदा हिंदीत आणि नंतर मराठीत पाहिली. मला मराठीत ही वेब सिरीज अधिकच जास्त आवडली. कुमार महाजन आणि चक्रपाणी यांच्या आयुष्या बद्धल असलेली ही सिरीज तुम्हाला खिळवुन ठेवते.

मनातला राम

लेखक मालविका यांनी बुधवार, 21/04/2021 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
मनातला राम आज रामनवमी ! सगळयांच्या स्टेटस पासून फेसबुक च्या भिंती पर्यंत सगळीकडे रामराया भरून उरलाय . मी कधीच कुठल्या देवाचे फोटो शेअर करत नाही . अशा प्रचन्ड गर्दीच्या दिवशी तर देवळात जावं असं मनात देखील येत नाही . पण आज फेसबुक वर , व्हाट्स अँप वर रामावरच्या लेखांचा पूर आलाय . काही वाचले काही सोडून दिले . त्यातच एक तुळशीबागेतील रामाच्या देवळाचा फोटो आणि छोटासा लेख वाचला . तुळशीबागेतील हे रामाचं देऊळ माझं खरंच आवडतं . एक सारसबागेतील तळ्यातला गणपती आणि दुसरा हा राम मला मनापासून आवडतात . तुळशीबाग म्हटलं तरी डोळ्यासमोर फक्त गर्दी येते .

भाजी

लेखक अक्षरमित्र यांनी मंगळवार, 20/04/2021 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
करोनाकाळात श्रमिकांच्या दु:खांच्या अनेक कहाण्या वाचल्या, पाहिल्या. माध्यमांनी मुख्यत: श्रमिकांचे, गरीबांचे हाल ह्यावर स्टोर्‍या केल्या. चित्रपट केले. सुखवस्तू जनतेने लॉकडाऊन च्या काळात रोज नवीन पदार्थ बनवून त्याचे फोटो सोशल मिडियावर प्रसिद्ध करुन "आठडयातून रविवार येईल का रे तिनदा, भोलानाथ ?" ची मजा देखील लुटली. ही कथा २०२० च्या करोनाकाळात संघर्ष करण्यार्‍या अशाच एका मध्यमवर्गीयाची आहे. (सत्य)कथेत पात्रांची नावे देत नाही. शेवटी मध्यमवर्गीय लाज / अब्रू आड येते म्हणून..... फेब्रुवारीअखेर त्याच्याकडे एका कंपनीचे काम होते. केबल टाकण्याचे.

सुशांत सिंह राजपूत भाग २

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 20/04/2021 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
काही निवडक चॅनल्स आणि मंडळींनी सुशांतसाठी चालु केलेला प्रामाणिक लढा अजुनही सुरु ठेवलेला आहे. हल्लीच आर ठाकरे आणि कंगना यांच्याकडून सुशांत ने आत्महत्या केली असल्याचे सांगितले गेल्याचे माझ्या पाहण्यात आले आहे. असो... वरुण कपूर चा चॅनल मी बराच काळ फॉलो करत आहे.

संदर्भांच्या शोधात

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 20/04/2021 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज बरोब्बर दोन महिने झाले पांढर्‍यावर काळं करून. किंबहुना व्यक्त होण्यासाठी विषयच सापडत नव्हता. आजकालची परिस्थिती बघता "किंबहुना" या एका शब्दावर एक लेखमाला लिहिली जाऊ शकेल हा भाग अलाहिदा! बहुतेक वेळा मी क्रिकेट आणि इतर खेळांबद्दल लिहितो कारण खेळांमधली सकारात्मक ऊर्जा मला भावते. पण सध्या चालू असलेल्या क्रिकेटचा देखील काही संदर्भ लागत नाही हो. आधी त्या अतिभव्य रिकाम्या स्टेडियम्समध्ये उगाच रतीब टाकल्यासारख्या टी-२० आणि वन डे खेळवल्या गेल्या. ते पण एकीकडे विजय हजारे ट्रॉफीसारखी महत्वाची डोमेस्टिक स्पर्धा चालू असताना आणि जुलै - ऑगस्टमध्ये पुन्हा इंग्लंडचा दौरा असताना.

हरिद्वारचा कुंभमेळा आणि भाजप

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 17/04/2021 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
हरिद्वारमधे कुंभमेळ्यात झालेले पहिले शाही स्नान हे सध्या सुशिक्षितांच्या रागाचे निमित्य ठरत आहे. करोनाची दुसरी लाट दररोज शेकडो बळी घेत आहे,दिवसेंदिवस बळींचा आकडा वाढत आहे. असे असूनही कुंभमेळ्याला परवानगी मिळालीच कशी? अगदी वर्तमानपत्रात पूर्ण पान जाहिरात दिली गेली होती दोन दिवसांपूर्वी. येत्या २७ एप्रिलला चौथे शाही स्नान आहे आणि ते करण्याविषयी विचार सुरू आहे. ३० एप्रिलला मेळ्याची अधिकृत समाप्ती आहे. बहुतेक आखाडे शाही स्नानावर ठाम आहेत. साधू म्हणताहेत की कधीतरी मरायचंच आहे तर शाही स्नान करुन,देवाचा आशिर्वाद घेऊन मरु.

आवाज बंद सोसायटी - भाग ४

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 16/04/2021 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
यामागील भाग: http://www.misalpav.com/node/48651 :: आवाज बंद सोसायटी - भाग १ http://www.misalpav.com/node/48652 :: आवाज बंद सोसायटी - भाग २ http://www.misalpav.com/node/48658 :: आवाज बंद सोसायटी - भाग ३ परिणाम ध्वनी, आवाज, गोंगाट तसेच ध्वनी प्रदूषण आदींबद्दल वर आपण चर्चा केली.

लस आणि शेरलॉक

लेखक Bhakti यांनी बुधवार, 14/04/2021 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
“अहो उद्या आपला लसीचा दुसरा डोस आहे” रजनीकाकू उत्साह –भीती मिश्रित आवाजात अशोककाकांना आठवण करून देत होत्या. “हो हो,अग पण बातम्या येत आहेत की लस संपली आहे.काय माहित आपल्या सेन्टरवर काय परिस्थिती असेल.”अशोक काकांना लस मिळेल की नाही धास्ती वाटत होती. “मीना वहिनींना फोन करतेय तर त्यांचा फोनच लागतं नाही,मागच्यावेळी आम्ही दोघींचा लसीसाठी नंबर येऊ पर्यंत चांगला टाइमपास झाला होता,यावेळीही त्या असत्या तर तसाच वेळ गेला असता.” रजनीकाकूंना उद्या वेळ कसा जाईल याचा प्रश्न पडला होता. उद्या लस मिळेल का याचा विचार करत दोघेही रात्री लवकर निजले. दुसऱ्या दिवशी रजनीकाकू पहाटे लवकरच उठल्या एखाद्या दूर गावाला देवाच्