भेळ पुराण ...
मुरमुरे ,त्यात चुरलेल्या शेवपुरीच्या कडक पुऱ्या आणि बारीक शेव त्यावर लाल तिखट आणि खजुराची चटणी एव्हडेच घालून मुंबईची भेळ तयार होते ..पण चविष्ट असते (च असे नाही पण ;) ) पुण्यातली भेळ मात्र साग्रसंगीत मुरमुरे ,पापडी .भावनागरी ,एक नंबर शेव ,पापडी ,गाठी शेव , खारेदाणे, तिखट बुंदी ,मिरीचीचा ठेचा ,काळे मीठ, चिंच खजुराची चटणी वर कांदा टोमाटो हे सगळे मिश्रण एका स्टीलच्या पातेल्यात मोठ्या चमच्याने एकजीव केले जाते आणि त्यावर पुन्हा भुरभूरलेली बारीक शेव,कोथिंबीर आणि कांदा...