मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गजावरील राणी

हृषिकेश पांडकर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
परवाच्या दुपारी टळटळीत उन्हात 'पित्तशामक नीरा' घशाखाली सारत असताना किलकिल्या डोळ्यांनी या वाड्याला न्याहळत असताना हे दृश्य दिसले.एप्रिल महिन्याचा दिवस असूनही टांगलेला आकाशकंदील येथे साजऱ्या होणाऱ्या वार्षिक दीपावलीच्या साक्ष देत होता.त्या खाली नजर टाकली आणि आश्चर्य वाटले. पुण्यातील सगळ्यात जुनी पेठ म्हणून आपण जिचे वर्णन वाचतो ती हि कसबा पेठ.पुणेरी खोचकपणा,टोपी,कोट धोतर आणि अनुनासिक आवाज,तिरकसपणा,ओतप्रोत भरलेला उपहास,पुणेरी पगडी आणि टांगा या गोष्टींचे उगम स्थान आणि पर्यायाने केंद्रबिंदू.छत्रपती वास्तव्यास येऊन गेले,पेशवे सरले,टिळक,गोखले,आगरकर वावरले,त्याबरोबर गोरा साहेबाची इथून परतला आता फक्त जुन्या आठवणी अंगाखांद्यावर मिरवत री-डेव्हलोपमेंटची' वाट बघत असलेले काही जुने वाडे राहिलेले दिवस ढकलत आहेत. वाड्याच्या माडीला लावलेल्या लोखंडी गजांवर असलेली इंग्लंडच्या राणीची कोरीव प्रतिमा साहेबांच्या पुण्याची आठवण करून देत होती.एकसंध आणि मजबूत कठड्यावर असलेली राणीची प्रतिमा पाहून १५० वर्ष गोऱ्यांनी हुकूमत राखली आणि जाता जाता अनंत ठिकाणी आपली छाप सोडून गेले त्यातीलच हा एक भाग. गोरे परतून आता ७० वर्ष होतील पण त्यांनी सोडलेल्या या पाऊलखुणा पाहताना वेगळीच मजा येते.असा कधी रिकामा वेळ मिळाला तर एकदा या पुणे ११ किव्वा पुणे ३० च्या जुन्या पुण्यातून पायी फिरा, IT हब किव्वा विद्येचे माहेरघर असणारे हे आताचे पुणे पूर्वीपासूनच गडगंज श्रीमंत होते याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही :) 1 हृषिकेश पांडकर ११-०४-२०१७

वाचने 5792 वाचनखूण प्रतिक्रिया 14

अभ्या.. 11/04/2017 - 13:53
अरे वा, हे डायकास्टचे पॅटर्न वापरायची फॅशन परत आलीय बरंका. फॅब्रिकेशन करणारे लोक आता हे जुन्या टाईपचे डेकोरेटिव्ह्, फ्लोरल आणि व्हिक्टोरिअन स्टाईलचे डायकास्ट पॅटर्न वापरुन गेट, कंपाउंड साठी डिझाइन्स बनवत आहेत. बाकी हे राणीचे पॅटर्न सोलापुरात लै ठिकाणी पाहिलेले आहे. काही नवलाई नाही त्यात.

अभ्या.. 11/04/2017 - 16:00
पुणेरी पगडी आणि टांगा या गोष्टींचे उगम स्थान
टांगा पुण्याचे इनोव्हेशन हाय काय? तरीच. पुणेरी घोडा कुणाच्या बरोबरीने पाय कसा उचलणार म्हणा. ;)

असल्या वाड्यांमधल्या (तसल्याच ) लोकांकडे कामाला जायचा योग नै आलेला दिसत तुमच्या आयुष्यात! आला,तर परत हा असला लेख नै लिहिणार टुम्ही! ;)

असल्या वाड्यांमधल्या (तसल्याच ) लोकांकडे कामाला जायचा योग नै आलेला दिसत तुमच्या आयुष्यात! आला,तर परत हा असला लेख नै लिहिणार टुम्ही! ;)