राजीव मल्होत्रा - हिंदूफोबिया
मी निरीश्वरवादी माणूस आहे. माझा देवावर विश्वास नाही. देवावर विश्वास नसण्याचं कारण काही सिनेमांत दाखवलं जातं तसं (अष्टविनायक, देऊळ बंद) देवावरच्या रागापोटी नाही, तर देव असल्याचा, मला स्वत:ला पटेल असा शास्त्रसिद्ध पुरावा उपलब्ध नाही म्हणून. देवाचं अस्तित्व असू शकतं, या थिअरीला (सिंद्धांताला) मान द्यायला माझी ना नाही. उद्या मानवजातीला काही पुरावा गवसलाच, तर मी आनंदाने (म्हणजे नाईलाजानेच, पण पद्धत आहे बोलण्याची) माझी मतं बदलेन. पण निरीश्वरवाद्यांमध्ये सुद्धा एकवाच्यता नसते, हे मला जाणवायला काही काळ गेला. आज परिस्थिती अशी उद्भवली आहे, की बहुतेक निरीश्वरवादी माझ्या डोक्यात जाऊ लागले आहेत. निरीश्वरवाद हा विवेकवादाच्या धर्तीवर आलेला निष्क़र्ष असायला हवा, आणि स्वत:ला निरीश्वरवादी म्हणवणारे विवेकाहून कोसो दूर आहेत. एखाद्या संप्रदायाचा भाव वाढावा, त्यातील वाईट/चुकीच्या पद्धती/विचारसरणींवर पडदा पडावा आणि लोकांना त्यातील सांप्रदायिक भावना चांगली वाटावी यासाठी कित्येक चांगल्या रुढी/प्रथा संप्रदायाच्या चौकटीत आणल्या जातातच. सांप्रदायिकतेवर चिकित्सा करताना या ब-यावाईट गोष्टींचं नीट वर्गीकरण करून नंतर मग फक्त वाईटावर टिकेची झोड उठवायला हवी. तसं न करता सरसकट सगळ्या संप्रदायालाच नावं ठेवून मोकळं व्हायचं हे काही बरोबर नाही. असा पवित्रा ठेवला तर संवाद अशक्य आहे.
संवाद घडवून आणण्यासाठी पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष करणं, चर्चा-वादांतील शिष्टाचार पाळणं हे आवश्यक असतं. दुर्दैवाने आपल्या टीव्हीवर दिसणा-या कोणत्याही चर्चांमध्ये ब्रेन स्टॉर्मिंग होताना दिसत नाही. एकमेकांवर कुरघोडी करून स्वत:ची लोकप्रियता वाढवायची यातच सगळ्या बाजूचे विचारवंत रमलेले असतात. यात माझ्या स्वत:च्या आवडीचे विचारवंतही येतातच.
राजीव मल्होत्रांचे विचार कोणाला पटोत ना पटोत (मला बहुतेक पटतात), ते चर्चा-वादाचे शिष्टाचार पाळून संवाद साधतात, समोरच्याची संपूर्ण बाजू ऐकून घेतात, आणि मगच बोलतात - हे मान्य करायलाच हवं. सभ्य शब्दांत समोरच्याची चड्डी काढणं हे काही सोपं काम नसतं. आणि तरीही कोणी वाकड्यात शिरलाच, तर मुद्दा मांडूनच त्याला उभा आडवा करायला ते अजिबात कचरत नाहीत. आपला मुद्दा योग्य असेल तर बाकी चाळे करायची गरज नाही, ही त्यांची भूमिका त्यांच्या आचरणातून दिसून येते. या कारणासाठी मला राजीव मल्होत्रा हे व्यक्तिमत्त्व अतिशय आदरणीय वाटतं.
हिंदूफोबियावरला त्यांचा हा व्हिडिओ पाहा.
त्यांचे इतर अनेक व्हिडिओज् तुम्हाला त्यांच्या यूट्युब वाहिनीवर पाहायला मिळतील. तिथेच त्यांनी केलेल्या कार्याची आणि लिहीलेल्या पुस्तकांचीही माहिती मिळेल.
अशा माणसांना प्रसारमाध्यमांत प्रामुख्याने स्थान मिळायला हवं. पण प्रसारमाध्यमं तसं करत नसल्याने हे काम आपण करायला हवं. तुमची त्यांच्या विचारांबद्दलची आणि खुद्द त्यांच्याबद्दलची मतं प्रतिक्रियांमधून कळवा. जर तुम्हाला त्यांचं म्हणणं पटलं, तर व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम, लिंक्ड.इन, ट्विटर, टेलिग्राम, गुगल प्लस, तुमचे स्वत:चे ब्लॉग्ज, मिसळपाव.कॉम, ऐसीअक्षरे.कॉम, मनोगत.कॉम, मायबोली.कॉम आणि इतर जितकी सामाजिक प्रसारमाध्यमं आहेत, त्या सर्वांवर तुमच्या वैयक्तिक पातळीवर प्रचार करा आणि लोकांनाही प्रचार करण्यास उद्युक्त करा.
- कौस्तुभ अनिल पेंढारकर.
5 फेब्रुवारी 2017
वाचने
5526
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
राजीव मल्होत्रा हिन्दू फोबिया
व्हिडीओ मोठा आहे
राजीव मल्होत्रा, अभ्यासपूर्ण
राजीव मलहोत्रा प्रभावी आहेत.
In reply to राजीव मलहोत्रा प्रभावी आहेत. by गामा पैलवान
बिन्डोकपणाचा कळस आहे तो सुहेल
(लई लांब) क्लिप पाहिली
In reply to (लई लांब) क्लिप पाहिली by अनरँडम
+१
In reply to +१ by मिहिर
हो. या सर्व बाबतींत मी नक्कीच
In reply to हो. या सर्व बाबतींत मी नक्कीच by वडापाव
चढला???
In reply to हो. या सर्व बाबतींत मी नक्कीच by वडापाव
जाता जाता