Skip to main content

आस्वाद

मोहरवणी..!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 02/04/2008 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, अहो आम्ही हलकट कोकणी माणसं! स्वत:च्या वाडीतला आंबा मुंबईला किंवा अमेरीकेत पाठवायचा आणि शेजारच्या वाडीतल्या कैर्‍या चोरून त्याची मोहरवणी करायची आणि त्याच्यासोबत गरमागरम भात जेवायचा, याचंच तिच्यायला आम्हाला कवतिक! मोहरवणी हा खास कोकणातला पदार्थ. आज मी तुम्हाला मोहरवणीची पाकृ शिकवणार आहे. सध्या कैर्‍याआंब्यांचे दिवस आहेत, तेव्हा कैर्‍यांची मस्तपैकी मोहरवणी करून पाहा आणि तिच्यासोबत गरमागरम भात जेऊन झोपा दोन तास निवांत! म्हणजे मग पुन्हा संध्याकाळी देवगडात हलकटपणे गजाली करत हिंडायला मोकळे!

अनोखे वंशवृक्ष

लेखक सृष्टीलावण्या यांनी बुधवार, 02/04/2008 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
कर्नाटकातल्या हुलिकल गावातील एक दलित जोडपं, तिमक्का आणि तिचा नवरा बिक्कालु चिकैय्या. लग्नाला बरीच वर्ष झाली तरी त्यांना मूल होईना. एव्हाना शेजारी पाजारी आणि सग्यासोयर्‍यांनी तिमक्काला 'वांझ' म्हणून दूषणं द्यायला सुरुवात केली होती. एकाकीपणाची भावना घेरू लागलेल्या या जोडप्याने मग अखेर निर्णय घेतला मूल दत्तक घ्यायचा. मूल दत्तक घेण्यात काय एव्हढं विशेष. विशेष होते कारण तिमक्काने पालनपोषण करून मोठ्ठं करण्यासाठी निवडली ३०० वडाची रोपटी. १९५० च्या आसपास ह्या जोडप्याने लावलेल्या त्या रोपट्यांनी आता चांगलाच आकार घेतला आहे. कर्णाटकातील राष्ट्रीय महामार्ग क्र.

वसंतोत्सव - चेरि ब्लॉसम (वॉशिंग्टन डिसी)

लेखक एकलव्य यांनी मंगळवार, 01/04/2008 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेतील वास्तव्याने मला काय दिले याचा हिशेब कधी मांडायचाच झाला तर पोटोमॅक नदीकाठी तासोनतास केलेल्या भटकंतीचा क्रम अगदी वरचा असेल.
अथांग पाण्यात डोलणार्‍या नावा, अफाट आकाश, पानाफुलांनी लगडलेली झाडे आणि हिरवेगार गालिचे अशा या परिसरात मी अनेकदा स्वतःला विसरून जातो. माझ्या जीवनसखीलाही निसर्गामध्ये हरवून जायला आवडते त्यामुळे जरा कोठे संधी मिळाली आम्ही वॉशिंग्टनच्या त्रिस्थळी धाव घेतो. ही त्रिस्थळे म्हणजे नॅशनल मॉल, टायडल बेसिन आणि पोटोमॅक नॅशनल पार्क.

गाण्यांच्या शोधात

लेखक ॐकार यांनी सोमवार, 31/03/2008 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी बर्‍याच गाण्यांचा विचार डोक्यात घोळत असतो. विचार घोळवावा लागतो. गाणी एकरूपच असतात, ती घोळवावी लागत नाहीत. एखाद्या गाण्याचे शब्द, लय, ताल, राग, सुरावट लक्षात राहण्यामागे कारण काय असेल? जास्त विचार केला तर अनेक शास्त्रीय कसोट्या सांगता येतील. त्या कसोट्यांची रसिकतेला मात्र काही गरज नाही. अंतर्बाह्य असतं ते गाणं. त्यात शब्द , ताल , सूर , लय काहीच वेगळं नसतं. सगळं एकजीव असतं. उदाहरणं अनेक आहेत . असा बेभान हा वारा हे गाणं ऐकताना मी नेहमी मला एका चित्राचा कोपरा समजत आलो आहे. ते चित्र इतकं सजीव आहे की मला ते अगदी तसंच शब्दात बांधणं जमत नाही.

उत्तर शोधायचे आहे!

लेखक ॐकार यांनी सोमवार, 31/03/2008 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
ओशो रजनिश यांच्या संत कबीरांवरील प्रवचनांचे भाषांतर वाचण्याचा योग आला. त्यात ओशोंनी पुढील दाखला दिला आहे - एकदा चार बायका एक प्रसिद्ध सूफी संताकडे ज्ञानप्राप्तीकराता जातात आणि त्याने गुरू बनावे अशी विनवणी करतात. त्यांना त्याच्याकडून ज्ञान म्हणजे काय हे समजून घ्याअय्चे असते. परंतु सूफी संत मात्र तयार होत नाही. त्या बायका तश्याच दाराशी भुकेल्या तहानलेल्या बसून राहतात. अखेर त्याला त्यांची दया येते. तो त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवतो. परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या स्त्रीला शिष्या करून घेण्यास तो तयार होतो.

रविवार विशेष

लेखक सृष्टीलावण्या यांनी रविवार, 30/03/2008 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
वैदर्भी बोली खरेतर संस्कृतशी अधिक जवळीक असणारी. मात्र तिची खुमारी पाहायची असेल तर बुवा उपाध्यांची भगवत् गीता वाचावी. भगवत् गीतेशी एव्हढा लडिवाळपणा करण्याची हिंमत दुसर्‍या कोणत्या भाषेची वा बोलीची झाली असेल असे वाटत नाही. बुवा लिहितात - पार्थ म्हणे गा हृषीकेशी, या युद्धाची ऐशीतैशी, बेहत्तर आहे मेलो उपाशी, पण लढणार नाही. धोंड्यात जावो हि लढाई, आपल्या बाच्याने होणार नाही, समोर सारेच बेटे, जावाई, बाप, दादे, काके. अरे लढाई असते का सोपी .. मारे चालते कापाकापी, कित्येक लेकाचे संतापी मुंडकी ही छाटती.

संडे स्पेशल (खांडवी)

लेखक स्वाती राजेश यांनी बुधवार, 26/03/2008 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
खांडवी (हा एक कोकणातील खाद्यप्रकार आहे.) साहित्यः २ वाट्या तांदळाचा रवा (इडली साठी आपण विकत आणतो तो रवा घ्यावा) २ वाट्या भरून गुळ ४ वाट्या पाणी १/४ टी.स्पून मीठ १ टे.स्पून तेल १/२ टी.स्पून वेलची पूड १/२ वाटी ओल्या नारळाचा चव १ मोठा तुकडा आलं किसून २ टी.स्पून साजुक तूप ताटाला लावून घ्यावे. १.प्रथम तांदळाचा रवा भाजून घ्यावा. तो गार होऊ द्यावा. २.पातेल्यात पाणी घेऊन ते गॅसवर ठेवावे.
Taxonomy upgrade extras